यवत माणकोबा वाडी जिल्हा परिषद शाळेत. जागतिक महिला दिन साजरा. नारी प्रबोधनाचे दिले महिलांना धडे.
By : Polticalface Team ,09-03-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ८ मार्च २०२४ -जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परीसरातील महिलांना दिले प्रबोधनाचे धडे. शुक्रवार दि ८ मार्च जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने माणकोबा वाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशालीताई आबणे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँ साहेब. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. अहिल्यादेवी होळकर. रमाई आंबेडकर. यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून. कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी डॉ प्रांजल पवार, संगीता वाळके, निलिमा कांचन, रेणुका कांचन प्रामुख्याने उपस्थित होत्या. मानकोबा वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यपिका स्वाती माने यांनी उपस्थित मान्यवारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
या वेळी परीसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशालीताई आबणे यांनी मनोगत व्यक्त केले. बोलताना त्या म्हणाल्या, राजमाता जिजाऊ मासाहेब. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. अहिल्यादेवी होळकर रमाई आंबेडकर या सर्व महामातांनी तत्पूर्वी रूढी परंपरेला धक्का देऊन. आदर्श सुसंस्कार घडवले. स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचे व स्वराज्य कारभाराचे धडे दिले. क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रेरणादायी विचार घेऊन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू करुन. महिलांना शिक्षणाची दारे खुली केली. पूर्वकालीन इतिहास पाहता पतीचे निधन झाल्या नंतर (पत्नी) सती जाण्याची परंपरा मुडीत काढुन. राजे मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर यांनी राज्य कारभार चालवण्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांनी कष्ट करून गवऱ्या विकून कुटुंबातील मुला बाळांना संभाळ करत पतीच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आर्थिक रक्कम पाठली. या महामातांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून उद्याची युवा पिढी घडविण्याचे कार्य महिलांनी जोपासले पाहिजे. चूल आणि मूल यातुन बाहेर पडुन महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे. असे प्रबोधनात्मक आवाहन वैशालीताई आबणे यांनी उपस्थित महिलांना दिले. या प्रसंगी मानकोबावाडी परिसरातील व शेतकरी कुटुंबातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दौंड येथील डॉ.प्रांजल पवार यांनी महिलांच्या आरोग्या संदर्भात मार्गदर्शन केले बोलताना त्या म्हणाल्या (*महिलांनी आहार आणि आरोग्य या संदर्भात जागरूक राहिले पाहिजे. दिवसेंदिवस महिलांनी व किशोरी वयातील मुलींनी उपवास केल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अधिक कमी दिसून येत आहेत. त्यामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुलींच्या जन्माचे स्वागत करा. असा मोलाचा सल्ला डॉ प्रांजल पवार यांनी दिला* )
*महिलांचे सबलिकरण* या विषयी बोलताना संगीता वाळके मॅडम यांनी महिलांना विविध शासकीय योजनाची माहिती दिली. *तसेच आजकाल महिला आबला नारी राहिल्या नाहीत. सर्वच क्षेत्रात महिलांना समान संधी उपलब्ध आहे. पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांत महिलांनी आपली प्रगती केली आहे. उपस्थित महिला व तरुणींचा आत्मविश्वास वाढवून अधिक बळकट बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.*
यवत मानकोबावाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती माने यांनी *मुलींना शिक्षणातील विविध संधी* या विषयी माहिती दिली. *मुलगी शिकली, प्रगती झाली* हे लक्षात घेऊन आपल्या मुलींना चांगले शिक्षण द्या, मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता मुलीच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे. असे आवाहन उपस्थित महिलांना केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये
महिलांसाठी संगीत खुर्ची, उखाणे, फळ्यावरील हत्तीला शेपूट काढणे, चित्रातील महिलेला टिकली लावणे. या सारखे खेळ घेऊन उपस्थित विद्यार्थी मुली व महिलांनी मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा करुन सर्वांनी स्नेहभोजानचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री विक्रम लांडगे सर यांनी केले. श्री संदीप साळवे सर यांनी उपस्थित मान्यवारांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मनोहर बापू खताळ, यवत ग्रामपंचायत सदस्य सौ. नंदा बिचकुले, सामाजिक कार्यकर्ते मल्हारी बिचकुले, शिक्षण प्रेमी श्री मारुती बिचकुले तसेच श्री धुळाजी भिसे, अंगणवाडी सेविका सुवर्णा शिवतरे, मदतनीस लालूबाई गायकवाड. शिलाबाई कऱ्हे, सुस्मिता मोरे, कोमल बिचकुले, रेखा बिचकुले, सोनाली बिचकुले, सुनीता बिचकुले, स्वाती बिचकुले, मुक्ता लकडे, आशा खताळ,सोनाली दोरगे,ताई काळे, काजल लकडे. प्रीती बिचकुले, तनुजा बिचकुले, कल्याणी बिचकुले, स्वराली बिचकुले, सोनाली बिचकुले. तसेच परीसरातील महिला पालक, तरुणी, मोठया संख्येने उपस्थित होत्या.
मनकोबा वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आगळा वेगळा उपक्रम राबवित आला असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी शिक्षकांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी गट शिक्षणाधिकारी श्री महाजन साहेब, विस्तार अधिकारी श्री खैरे साहेब आणि केंद्रप्रमुख पवार साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.