यवत पोलीस स्टेशन हद्दीतील संवेदनशील गावांमध्ये पथसंचलन घेऊन पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा दिला इशारा.
By : Polticalface Team ,13-03-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ११ मार्च २०२४ येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुक २०२४ या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन हद्दीतील राजकीय दृष्ट्या संवेदनशील गावांमध्ये यवत पोलीसांचे शक्ती प्रदर्शन व पथसंचलन घेण्यात आले आहे. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील संवेदनशील गावांमध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. याची दक्षता घेऊन. यवत पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा इशारा. पोलीस पथकाने पथसंचलन घेऊन देण्यात आला आहे.
येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया कालावधीत गावामध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता निर्भय व शांततामय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडावी.
याची दक्षता घेऊन. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील. यवत. केडगाव. वरवंड. पाटस. या राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्त्वाचे अ वर्ग गावांमध्ये शक्ती प्रदर्शन पथसंचलन घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.
दि १२ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजे सुमारास यवत पोलीस स्टेशन ते यवत गाव बाजार पेठेतुन पोलीसांनी शक्ती प्रदर्शन पथसंचलन घेण्यात आले. या मध्ये यवत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख. उपनिरीक्षक ०४ पोलीस अंमलदार २० तसेच सी आय एस एफ कंपनीचे ३४ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
सदर पथसंचलन गाव फेरीचा कार्यक्रम मा पंकज देशमुख. पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण. मा संजय जाधव. अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग. मा स्वप्निल जाधव. उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड. यांच्या मार्ग दर्शनाखाली मा नारायण देशमुख यवत पोलीस निरीक्षक. यांच्या नेतृत्वाखाली यवत पोलिसांनी गावांमध्ये पथसंचलन घेण्यात आले.
वाचक क्रमांक :