काळेवाडी येथील जमीन खरेदी व्यवहारात.फसवणूक झाल्याने. गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या. हिंगणीबेर्डी येथील धक्कादायक घटना. १६ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,14-03-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १४ मार्च २०२४ दौंड तालुक्यातील मौजे काळेवाडी ता दौंड जिल्हा पुणे. हद्दीतील जमीन गट नंबर २०६ या मधील दोन एकर शेत जमीन खरेदी विक्री व्यवहारात 30 लाख रुपयांची फसवणूक झाल्याने लक्ष्मण हरिभाऊ कोऱ्हाळे. याने काळेवाडी गावच्या हद्दीतील जमीन गट नं 206 मधील लिंबाच्या झाडास रशीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि,12/03/2024 रोजी घडली असल्याची माहिती दौंड पोलीस ठाणे अंमलदार पो हवा बांपू रोटे यांनी दिली.
फिर्यादी भरत हरिभाऊ कोऱ्हाळे वय 33 वर्ष रा हिंगणीबेर्डी ता दौंड जिल्हा पुणे. यांच्या फिर्यादी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.193/ 2024 भा.द.वि.कलम 306, 323, 504, 506, 34 अंन्वेय आरोपी 1) भगवान रामचंद्र खोमणे, 2) महेश बबन शेंडगे, 3) अशोक सिताराम जाधव, 4) संदीप भगवान खोमणे, 5) राहुल भगवान खोमणे, 6) संजय रामचंद्र खोमणे, 7) रोहीत संजय खोमणे, 8) संभाजी रामचंद्र खोमणे, 9) तानाजी रामचंद्र खोमणे, सर्व रा. ज्योतीबा नगर, हिंगणीबेर्डी ता.दौड जि.पुणे 10) श्रीकात अनंता कानगुडे, 11) नथुराम खंडु शेडगे, 12) बायडाबाई आनंता कानगुडे, 13) मारुती बबन शेडगे, 14) अकुंश साधु शेडगे, 15) आकाश गंगाराम शेडगे, सर्व रा. पुणे 16) बाळासाहेब चौधरी (पुर्ण नाव माहीत नाही) रा.कानगाव ता. दौड जि.पुणे यांच्या विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेच्या अनुषंगाने दौंड तालुका हिंगणीबेर्डी परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
जानेवरी सन 2021 मध्ये गावातील नथुराम खंडु शेडगे, बायडाबाई आनंता कानगुडे, अनुसया खंडु शेडगे यांची काळेवाडी येथील जमीन गट नं. 206 मधील 2 एकर शेत जमीन विकायची असल्याची माहिती (एजंट) महेश बबन शेडगे याने फिर्यादीच्या कुटुंबाला सांगीतले. वडील हरिभाऊ बाबा को-हाळे यांनी (एजंट) महेश शेडगे याचे समक्ष त्यांचेशी चर्चा करुन सदरची शेत जमीन एकरी 1400000/-रुपये(चौदा लाख रुपये) प्रमाणे विकत घ्यायचे ठरले. तसेच इतर सर्व खर्च आम्हीच करायचा असे ठरले होते. त्या प्रमाणे मी व माझा भाऊ लक्ष्मण हरिभाऊ को-हाळे.आणि वडील हरिभाऊ को-हाळे. यांनी 30.लाख रुपये जमीन खरेदी करीता आमच्या बैंक खात्यातुन कॅश स्वरुपात त्यांना दिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दि.18/01/2022 रोजी त्यांनी दुय्यम निबंधक केडगाव येथे सदर शेतजमीन त्यांनी माझी पत्नी सौ.गिता हिचे नावावर साठेखत व कुलमुत्यार पत्र करुन दिले.
सदर जमीन भोगवटा 1 ची तहसीलदार यांची मंजुरी आल्या नंतर जमीनीचे तुम्हाला खरेदी खत करुन देतो असे सांगितले. एक वर्षा नंतर सदर जमीनीची तहसीलदार दौड यांचेकडुन विक्रीची परवानगी घेतली आहे. दि.07/10/2023 रोजी तुम्ही केडगाव येथे या तुम्हाला खरेदी खत करुन देतो असे सांगीतल्या प्रमाणे फिर्यादी यांची पत्नी सौ.गिता भरत को-हाळे, वडील हरिभाऊ को-हाळे, भाऊ लक्ष्मण को-हाळे व (एजंट) नामे महेश बबन शेडगे. तसेच नथुराम खंद्र शेडगे, बायडाबाई आनंता कानगुडे, अनुसया खंडु शेडगे. व अशोक सिताराम जाधव असे आम्ही केडगाव येथे गेलो त्यावेळी दुय्यम निबंधक ऑफिसचे बाहेर त्यांनी आम्हाला सदर जमीनीचे खरेदी खताचा दस्त दाखविला व त्यावर फिर्यादी यांची पत्नीच्या सह्या घेतल्या. एक आठवडयाने आमचे गावामधील भगवान रामचंद्र खोमणे यांनी सदर जमीन विकत घेतली असल्याचे फिर्यादीच्या कुटुंबाला समजले असल्याने ऑनलाईन पोर्टलवर जावुन चेक केले असता आमचे खरेदी खत झाले नसुन. साठेखत व कुल मुकत्यार पत्र रद्द झाले असल्याचे निर्दशनास आले, सदर व्यक्तींनी फिर्यादीच्या कुटुंबाची फसवुन केली असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने दि.25/01/2023 रोजी रितसर यवत पोलीस स्टेशन येथे फसवणुकी बाबत तक्रार दाखल केली असून. मे,दिवाणी कोर्ट दौड येथे रितसर दावा दाखल केला आहे, असे नमूद करण्यात आले आहे. 1) भगवान रामचंद्र खोमणे, 2) महेश बबन शेंडगे, 3) अशोक सिताराम जाधव, 4) संदीप भगवान खोमणे, 5) राहुल भगवान खोमणे, 6) संजय रामचंद्र खोमणे, 7) रोहीत संजय खोमणे, 8) संभाजी रामचंद्र खोमणे, 9) तानाजी रामचंद्र खोमणे, सर्व रा. ज्योतीबानगर, हिंगणीबेडी ता दौंड जिल्हा पुणे 10) श्रीकांत अनंता कानगुडे 11) नथुराम खंडू रोडगे.12) बायडाबाई अनंता कानगुडे 13) मारुती बबन शेंडगे 14) अंकुश जाधव लंडने 15) आकाश गंगाराम हेडगे. 16) बाळासाहेब चौधरी (संपूर्ण नाव माहित नाही) राहणार कानगाव तालुका दौंड जिल्हा पुणे. यांनी वेळोवेळी फिर्यादीच्या कुटुंबाला तुम्ही या जमिनीत यायचे नाही. शेतातून जायचे नाही असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या कुटुंबाला मानसिक त्रास देऊन जीवन जगण्यास असाह्य केले असे नमूद करण्यात आले आहे.
दिनांक 12/03/2024 रोजी सायंकाळी 06:19 वा जे सुमारास फिर्यादीचा भाऊ (लक्ष्मण हरिभाऊ कोऱ्हाळे) याने फोनवर सांगितले.की अशोक सिताराम जाधव याने माझ्याकडे बघून का थुंकला. असे विचारले असता. त्याने मला मारहाण केली आहे. वरील सर्वांच्या सततच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करणार आहे असे लक्ष्मण हरिभाऊ कोऱ्हाळे याने फिर्यादीला सांगितले. त्यावर फिर्यादीने भाऊ लक्ष्मण यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु दि 12/03/2024 रोजी रात्री 11:27 वाजे सुमारास लक्ष्मण हरिभाऊ कोऱ्हाळे.याने वरील सर्वांच्या सततच्या त्रासाला कंटाळून व जमीन खरेदी व्यवहारात आमच्या कुटुंबाची फसवणूक केल्याने त्यांचे नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करीत असल्या बाबत. गावातील हिंगणीबेर्डी ग्रामपंचायत नावाचे व्हाट्सअप ग्रुप वर चिठ्ठी टाकली. गावातील लोकांच्या मदतीने त्याचा शोध घेतला असता 11:45 वाजे सुमारास फिर्यादीचा भाऊ लक्ष्मण हरिभाऊ कोऱ्हाळे याने काळेवाडी गावच्या हद्दीतील जमीन गट नंबर 206 मधील लिंबाच्या झाडास वरील सर्वांचे सततच्या त्रासाला कंटाळून रशीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून आले. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दौंड पोलीस स्टेशन दाखल आमदार गटकुल. स पो ई गोसावी पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.