पुणे सोलापूर महामार्गावरील मौजे सहजपुर गावच्या हद्दीत आयशर टेम्पो आणि 407 टेम्पोच्या भिषण अपघातात. दोघांचा मृत्यू. एक गंभीर जखमी.
By : Polticalface Team ,14-03-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १३ मार्च २०२४ दौंड तालुका पुणे सोलापूर महामार्गावरील मौजे सहजपुर ता दौंड जिल्हा पुणे येथील गावच्या हद्दीत म्हेत्रेवस्ती येथे पुणे सोलापूर महामार्गावर दि, १३/०३/२०२४ रोजी आयशर टेम्पो आणि 407 टेम्पोचा भिषण अपघात झाला. असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.
त्यामध्ये प्रमोद अशोक चव्हाण वय ४१ वर्ष रा यवत चोभेमळा ता दौंड जिल्हा पुणे. यांच्या ताब्यातील पांढरे रंगाचा 407 टेम्पो नं एम एच १२ एस एक्स २४६३ हा सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे चालवीत घेऊन जात असताना तसेच इसम नामे अनिल नागनाथ भोसले वय 40 रा कोंडी जि सोलापूर याने त्याचे ताब्यातील आयशर टेम्पो नं MH 12 LT 2905 हा भरधाव वेगात चालवून महामार्गाच्या मध्ये भागातील डिव्हाडर तोडून 407 टेम्पो नं MH 12 SX 2463 यास जोरदार धडक देऊन भिषण अपघात प्रमोद अशोक चव्हाण वय 41 वर्षे रा यवत चोभेमळा ता दौंड जि पुणे व स्वतःचे गंभीर दुखापतीस कारणीभूत होऊन सदर अपघातामध्ये दोघे मयत झाले आहेत.
या अपघातामध्ये आयशर टेम्पो चालकाने त्यांच्या ताब्यातील वाहन वेगाने चालवीत हलगर्जी पणामुळे दोन इसम जागीच ठार झाले असून. नामे रामदास अंकुश जाधव रा माळवाडी हडपसर पुणे यांना गंभीर दुखापत होऊन जबर मार लागला असल्याचे यवत पोलिसांनी सांगितले.
वाचक क्रमांक :