By : Polticalface Team ,15-03-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १४/०३/२०२४ रोजी दौंड तालुका *यवत पोलीस ठाणे हद्दीतील, मौजे दहिटणे ता.दौंड, जि. पुणे गावचे हद्दीत ओढ्याचे कडेला काही इसम मानवी जिवीतास हानीकारक व नशाकारक विषारी गावठी हातभट्टीची दारू गाळण्याची भट्टी चालवीत असल्याची खबर पोलिसांना मिळताच यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला, त्या ठिकाणी इसम नामे १) रामभाऊ संपत शेखावत वय ५५ वर्ष रा कुसेगाव ता.दौंड. जि पुणे. २) प्रकाश पुनमचंद गुडदावत वय २३ वर्षे रा. देवकरवाडी ता.दौंड जि.पुणे. ३) बिरता नंदराज बिरावत वय. २२ वर्षे रा.देवकरवाडी ता. दौंड जि.पुणे. ४) प्रिय प्रकाश बिरावत वय २३ वर्षे रा.देवकरवाडी ता.दौंड जि.पुणे या इसमांनी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी आपले कब्जात गावठी हातभट्टीची दारू तयार करणेचे एकुण ११,००० लिटर कच्चे रसायन, १०५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व साधने साहित्य असा *एकुण २,९०,७५०/-रु किमतीचे* मानवी जिवीतास हानीकारक तसेच नशाकारक विषारी गावठी हातभट्टीची दारू गाळण्याची भट्टी चालवीत असताना मिळून आले असल्याने.
सदर आरोपी विरुध्द यवत पोलीस स्टेशन गु र नं २६७/२०२४ भा द वि कलम ३२८,३४ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ख) (ग) (च) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.
सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री स्वप्निल जाधव. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यवत पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार निलेश कदम गुरु गायकवाड. महेंद्र चांदणे रामदास जगताप. अक्षय यादव संतोष कदम सोनल शिंदे सुवर्ण गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.
(यवत पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदेशीर हातभट्टी दारू भंट्टींवर यवत पोलीसांकडून काही दिवसा पासून धडक कारवाई होत असल्याने सर्व सामान्य नागरिकांकडून होणा-या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या होटेल ढाबे वाल्यांचा नंबर कधी लागणार अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. तसेच पुणे सोलापूर हायवे सेवा मार्गावर रात्रीच्या वेळी कंटिनर ट्रक टेम्पो फोर व्हीलर गाड्या मोठ्या प्रमाणात उभ्या असतात त्यामुळे सदर ठिकाणी सेवा मार्गावर रात्रीच्या वेळी भिषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यवत पोलिसांनी दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे )
वाचक क्रमांक :