By : Polticalface Team ,16-03-2024
या प्रसंगी बोलताना म्हणाले. बारामतीकरांची घराणेशाही किती दिवस चालवायची. ? बारामती लोकसभा मतदार संघ म्हणजे कुणाचा सातबारा नाही, गेली ४० वर्षा पासून तुम्ही पवार कुटुंबाला मतदान केले.
आता या वेळी मला मतदान करा असे आवाहन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी यवत येथील मतदारांना केले आहे.बारामती लोकसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याने बारामती पुरंदर दौंड इंदापूर या मतदार संघात जोरदार चर्चा सुरू झाली असून राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.
दि १५ मार्च २०२४ रोजी दुपारी ४ वा जे सुमारास त्यांनी भेट दिली. यवत येथील शिवसैनिकांनी फटाक्यांच्या धुमधडाक्यात त्यांचे स्वागत केले. श्री काळभैरवनाथ मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यवत पंचक्रोशीतील मतदार नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित दर्शवली होती. शिवसैनिक नेते श्रीपतीराव दोरगे यांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना शाल पुष्पहार श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी शिवसेना नेते श्रीपती दोरगे यांनी विषयाच्या अनुषंगाने प्रास्ताविक केले. तसेच शेतकरी संघटनेचे खंडू भाऊ दोरगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. गेल्या अनेक वर्षा पासून दौंड तालुक्यातील प्रलंबित विविध प्रश्नां बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत यवत परिसरातून नक्कीच आघाडी मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले.माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तत्पूर्वी पुरंदर. दौंड. इंदापूर. बारामती तालुक्यात शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला असुन महत्वाचे प्रश्न मार्गी लावले असल्याचे उपस्थितांनी सांगितले. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीबारामती लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्या नंतर मतदार संघातील जनतेकडून जागो जागी स्वागत करण्यात येत आहे.
गेली ४० वर्षे निवडून दिले परंतु बारामती शहर वगळता. इतर तालुक्यात कोठेही विकास झालेला दिसत नाही. या वेळी ननंद-भावजय पवार कुटुंबियातच होणार का निवडणूक.? गेली ४० वर्षे विरोधात पडणारी सुमारे ५ लाख ८० हजार मतदारांना त्यांच्या आवडीचा उमेदवार मिळावा. या उद्देशाने मी ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. असे शिवतरे यांनी सांगितले, मतदार हा राजा आहे ४० वर्ष मतदान करून काय केला विकास. फक्त बारामती शहराचा झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना भेटीसाठी बोलावले होते या भेटीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी काही आदेश दिला असे विचारले असता. थांबा,,, असे दबक्या आवाजात त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खऱ्या अर्थाने या निवडणुकीत तिसरा पर्याय म्हणून विजय शिवतारे यांच्याकडे पाहिले जात आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेनापती अजित दादा पवार यांनी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या शिलेदारांशी हात मिळवणी केली असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला असल्याने. भारतीय जनता पार्टीचे तत्पूर्वीचे उमेदवार सौ. कांचनताई राहुल कुल यांच्याकडे भावी खासदार म्हणून पाहिले जात होते. बारामती लोकसभा मतदार संघाची परिस्थिती पाहता. कांचनताई कुल यांनी बंडखोरी केल्यास परिस्थिती बदलू शकते अशी चर्चा मतदारांकडून व्यक्त केली जात आहे.
विजय शिवतारे बोलताना म्हणालेसुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हेच चाललंय ना..अरे बारामती हा देशातला एक लोकसभा मतदारसंघ आहे. सतत बारामतीचा खासदार पाहिजे. पुरंदर, इंदापूर, दौंड, भोर चा का नको? का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं ? परंतु इतर तालुक्यांना काय मिळालं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. दौंड तालुक्यातील मतदार जनतेने कायमच विरोधी पक्षाला आघाडी दिली आहे.दौंड तालुक्याच्या विकासासाठी या वेळी माझा विचार करून इतिहास घडवा. एकदा मला मतदान करा.असे आवाहन देखील शिवतारे यांनी केले. बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून. दौंड तालुक्यातील यवत, चौफुला, वरवंड, केडगाव, पारगाव. या महत्त्वाच्या गावातील मतदारांशी संवाद साधला. या वेळी शिवसेना पुरंदर तालुकाध्यक्ष दिलीप यादव, श्रीपतराव दोरगे. शिवसेना नेते. शेतकरी संघटनेचे खंडू भाऊ दोरगे. युवा नेते गणेश यादव, इंदिरानगर येथील गणेश वाघमारे यां सह यवत परिसरातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :