By : Polticalface Team ,27-03-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २७ मार्च २०२४ दौंड शहर व ग्रामीण भागातील दहशतीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढू लागले आहेत.काही दिवसापूर्वी दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी मौजे गिरीम ता दौंड जिल्हा पुणे येथील एका इसमाने गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने. हातात तलवार घेऊन धुमाकूळ घातला होता. तत्पूर्वीचे दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सदर इसमावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. त्याच प्रमाणे दिनांक २६ मार्च २०२४. रोजी दौंड शहरात घटना घडली असल्याचे समोर आले आहे. गुन्हेगारांच्या दहशतीला आळा घालण्यासाठी तत्पूर्वीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव. यांनी कर्तव्य बजवत कामगिरीने केली होती. दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अनधिकृत व बेकायदेशीर अवैध धंदे चालवणाऱ्या महाठकांचे धाबे दणाणले होते. कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गई केली नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
त्याच प्रमाणे कर्तव्य बजावणारे कार्यक्षम दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके. यांना गोपनीय बातमी दारा मार्फत खबर मिळाली की दौंड शहरातील नगरमोरी चौकत एक इसम हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी तत्काळ दखल घेऊन दौंड पोलीस गुन्हे शोध पथकाला सुचना व आदेश देऊन सदर घटना स्थळी जाण्यास सांगितले होते.
या अनुषंगाने दौंड पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पोचले असता या प्रसंगी इसम नामे. तुषार दत्तात्रय जावरे. राहणार सिद्धार्थनगर दौंड शहर ता दौंड जिल्हा पुणे. हा आपल्या ताब्यात धारदार तलवार बाळगून दौंड शहरात व परिसरात दहशत निर्माण करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले.
दौंड पोलीस गुन्हे शोध पथकाने
इसम तुषार दत्तात्रय जावरे वय २० रा.सिद्धार्थनगर दौंड याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे धारदार तलवार मिळून आले असल्याने
दौंड पोलीस स्टेशन येथे इसम तुषार दत्तात्रय जावरे याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून. पुढील तपास पोलिस नाईक अमीर शेख. हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड श्री स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संतोष डोके. गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सुभाष राऊत. पांडुरंग थोरात. नितीन बोरडे. विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते यांनी केली.
वाचक क्रमांक :