रंगपंचमी व एकनाथषष्ठी निमित्त यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात. हरिनाम कीर्तनासह श्री साई भंडारा. मोठ्या उत्साहात साजरा.

By : Polticalface Team ,01-04-2024

रंगपंचमी व एकनाथषष्ठी निमित्त यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात. हरिनाम कीर्तनासह श्री साई भंडारा. मोठ्या उत्साहात साजरा. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०१ एप्रिल २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे. येथील भाविक भक्तांसाठी श्री काळभैरवनाथ मंदिरात. रंगपंचमी व एकनाथषष्ठी निमित्त श्री क्षेत्र शिर्डी निवासी साई बाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे. तसेच यवत येथील साई भक्त दरवर्षी प्रमाणे यवत पंचक्रोशीतील भाविकांना साई पादुकांचे दर्शन व्हावे हि संकल्पना ठेवून. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. उत्सवाचे हे २० वे वर्ष असुन. पंचक्रोशीतील भाविक भक्तांकडून गुरुपौर्णिमा निमित्त.श्री साईबाबा पालखी सोहळा. पारंपरिक भजनी मंडळ टाळ मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी पालखी मिरवणूक सोहळ्यात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होत. पालखी सोहळा मिरवणूक दरम्यान गावातील महिला व नागरिकांनी श्री साईबाबा पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला. होळी. धूलवड. रंगपंचमी हा पारंपरिक उत्सव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसेच ग्रामदैवत नवनाथांची. मढी येथील यात्रा महोत्सव. दरवर्षी प्रमाणे रंगपंचमी निमित्ताने यवत येथील श्री कानिफनाथ मंदिर यवत येथे. स्थानिक मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रंगपंचमी व एकनाथषष्ठी निमित्त श्री काळ भैरवनाथ मंदिर येथे प्रथम दिनी श्री साई पादुकांचे आगमन. झाले. या प्रसंगी धार्मिक परंपरा जपत पुजा करुन. रात्री ह.भ.प दिपक महाराज मोटे यांचे. वारकरी संप्रदाय प्रमाणे किर्तन झाले. या वेळी सांप्रदायिक कीर्तनाच्या माध्यमातून यवत पंचक्रोशीतील भाविकांचे लक्ष वेधले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे कांकड आरती, रुद्र अभिषेक. श्री साई सच्चरित पारायण, श्री साई सत्यनारायण महापुजा , माध्यांन्ह आरती.भजनी मंडळांनी उत्कृष्ट गायन करुन. संतांची या संगती मनो मार्गि गती. अकळावा श्रीपती येणे पंथे. या उक्तीप्रमाणे उपस्थित भाविक भक्तांचे श्रद्धास्थान श्री साईबाबा श्रद्धा शबुरी भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. तसेच रात्री ह.भ.प. राहुल महाराज राजगुरु यांचे.सुश्राव्य किर्तन संपन्न झाले‌. या प्रसंगी श्री साईबाबा यांचे जीवनातील प्रत्येक अनुभुतीचा साक्षात्कार देऊन. उपस्थित भाविकांचे लक्ष वेधले होते. या वेळी गायनाचार्य ह.भ.प.गजानन महाराज सोमटकर ह.भ.प. संतोष महाराज कोलते. मृदुंगाचार्य ह भ प शुभम कदम महाराज. ह.भ.प.बबनराव(आण्णा) राजगुरू, ह.भ.प. तुषार महाराज वाघमारे. ह भ प. सोनबा बापू कुदळे महाराज. रघुनाथ दादा महामुनी. पल्लवीताई भिसे.भारतीताई. कल्याणी ताई. यांसह यवत परिसरातील विविध भजन मंडळांनी कीर्तनात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमाची शोभा वाढवली. कल्पना स्पीकर व मंडप यांच्या वतीने श्री काळभैरवनाथ मंदिर येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्री साईनाथ पादुकांचे आभिषेक करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या पारंपारिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री साईचरण सेवा मंडळ. यवत यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रामुख्याने दिलीप शेठ यादव. यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सदानंद दोरगे. निलेश जैन. राहुल अवचट. अमोल चव्हाण. बजरंग पवार. शनी शहा. गणेश रजपूत. अमोल भट. अविनाश यादव. सागर यादव. आदी यवत पंचक्रोशीतील महिला साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.