By : Polticalface Team ,03-04-2024
या वेळी यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व सदस्य सदानंद दोरगे यांच्या हस्ते भावी खाजदार सुनेत्रा ताई पवार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कुंडलिक खुटवड यांनी उपस्थित मतदारांना महत्वाच्या सूचना दिल्या. माजी आमदार रमेश थोरात यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीनुसार आपले मत व्यक्त केले.
झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डाडर यांनी संघटनेच्या वतीने बारामती लोकसभा मतदार संघाच्या भावी खासदार सुनेत्रा ताई पवार यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी बोलताना म्हणाले यवत येथे मतदारांशी संवाद कार्यक्रमा संदर्भात आम्हाला कोणीही सांगितले नसल्याची खंत व्यक्त करत झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने इंदापूर पुरंदर दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सुनेत्रा ताई पवार यांना जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनेत्रा ताई पवार यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधला या वेळी बोलताना त्यांनी सांगितले मी आपल्याकडे मतदान मागण्यासाठी आले असून महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाला मतदान करा अशी विनंती करत आहे.
खरं सांगायचं म्हटलं तर पहिल्यापासूनच दौंडकर जनता दादांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. मतदारांची संवाद दौरा करत असताना आम्ही सगळीकडे फिरत होतो तेव्हा लोक बोलताना म्हणाले दादांमुळे तो निधी तालुक्याला मिळाला आहे विकास कामांची यादी वाचून प्रत्येक ठिकाणी झालेला विकास लोक सांगत होते. दादांच्या कामाची पद्धत सगळ्यांनाच माहित आहे दादांनी जी आत्ताची भूमिका घेतलेली आहे त्यांचे एवढेच म्हणणे आहे की केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये एकच विचाराचं जर सरकार असेल आणि एकच विचाराची माणसं असतील तर विकासात्मक कामे करणे अधिक सोयीचे होते. आपल्याला माहित आहे की केंद्रातील योजना तळागाळापर्यंत पोचवायचे असतील तर त्याच विचारसरणीचा खासदार असेल तर नक्कीच आपल्याला जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिक सोयीस्कर होईल. त्यामुळे दादांनी मोदीच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं ठरवलं असून त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे मला महायुतीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडले असल्यामुळे माझे चिन्ह घड्याळ आहे यावेळी आपण सगळ्यांनीच जास्तीत जास्त घड्याळाला मतदान करून महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे दादांचा विकास कामावरती जास्त भर आहे विकास करणे हा त्यांचा मूळ हेतू राहिलेला आहे यासाठीच घड्याळाला मतदान करा म्हणजे महायुतीला मतदान विकासाला मतदान आपल्याला परत एकदा नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना पाहायचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा ताई पवार यांनी आपल्या भाषणातून प्रतिक्रिया व्यक्त केली पुढे बोलताना त्या म्हणाल्या यवत येथील विद्या विकास मंदिर शाळेचा प्रश्न निवडणुकी नंतर मार्गी लावू असे आश्वासन भावी खासदार सुनेत्रा ताई पवार यांनी यवतकरांना दिले आहे.
वि का सोसायटीचे माजी चेअरमन अण्णा दोरगे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारांचे आभार व्यक्त केले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार रमेश थोरात. जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे. वैशाली नागवडे. दौंड पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे कुंडलिक खुटवड यवत ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे, रमेश यादव, पापाभाई तांबोळी, पंडित दोरगे, दत्तात्रय दोरगे, संतोष दोरगे संजय दोरगे, बाळासाहेब चोभे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे तालुका अध्यक्ष अनिल नागणे टिलु मानकर, बाबासाहेब पवार आदी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :