वंचित बहुजन आघाडीला वेगळे ठेऊन इंडिया आघाडी सत्तेत येऊ शकणार नाही, नंतर वंचितला दोष देऊ नका. भिम सैनिकांचा एल्गार,

By : Polticalface Team ,05-04-2024

वंचित बहुजन आघाडीला वेगळे ठेऊन इंडिया आघाडी सत्तेत येऊ शकणार नाही, नंतर वंचितला दोष देऊ नका. भिम सैनिकांचा एल्गार, दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०५ एप्रिल २०२४ राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान व लोकशाही धोक्यात असल्याचे बोलले जात आहे मात्र संविधान निर्मात्यांच्या वारसाला बाजूला ठेवून संविधान वाचवण्याची वलगणा करीत आहेत हि मोठी शोकांतिका आहे, राज्यातील फुले शाहू आंबेडकर विचार धारेतील एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. या शिवाय राज्यातील निवडणूका पूर्ण होऊ शकणार नाहीत अशी परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी स्वाभिमानी वारसा जपला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. प्रस्थापित भाजपाला थांबवण्या बाबत इंडिया आघाडी कमकुवत असुन ठोस भूमिका घेऊन शकणार नाही. मात्र ती जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेत असताना राज्यातील प्रस्थापित पक्षांना ती नकोशी वाटत असल्याचे दिसून येत आहे. शोषित पिढीत वंचित बहुजन समाजातील सर्व सामान्य घटकांची मते चालतात पण त्याचा नेता मात्र प्रस्थापित पक्षांना नकोशी वाटत आहे आंबेडकरी पक्ष संघटना कदापी मोठ्या होऊ नये तसे झाले तर प्रस्थापितांची डोके दुखी वाढल्या शिवाय राहणार नाही, याची सर्वात जास्ती धास्ती प्रस्थापितांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे वंचित बहुजन आघाडीला कमकुवत जागा देऊन झुलवत ठेवण्याचे राजकारण इंडिया आघाडीच्या वतीने केले जात आहे. हे कदापी भीम सैनिक अनुयायी बहुजन समाज बांधव सहन करणार नाही. गेली अनेक वर्षापासून न्याय हक्काची लढाई सुरू आहे, संघर्ष आमच्या जीवनातील पूर्वीपासून असलेला महत्वाचा एक भाग आहे, जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे.त्याच पार्श्वभूमीवर भारतीय राज्य घटनेतील हक्क अधिकार अंन्वेय तरतुती नुसार वंचित बहुजन आघाडी कार्यरत असून राज्यातील शोषित पिढीत वंचित मागास प्रवर्गातील प्रत्येक उमेदवाराला प्रतिनिधित्व करण्याची संधी बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे, त्यामुळे राज्यातील प्रस्थापित पक्षांची चांगलीच धांदल उडालेली दिसून येत आहे, वंचित बहुजन आघाडी पक्षाचा एकच नारा आहे, जा बहुजनांनो तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला उद्याची शासनकर्ती जमात बनायचं आहे, संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे, हे नाकारता येणार नाही, त्यामुळे शोषित पिढीत वंचित बहुजन समाजाकडून कदापी दुर्लक्ष होणार नाही याची जाणीव प्रस्थापितांना आहे,इंडिया आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव ठाकरे, या पक्षांनी योग्य भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा दहा वर्षा पासून सत्येत बसलेला बकासुर ( इडी सीबीआय ) यांचा वापर करून तुम्हाला गिळुन टाकल्या शिवाय राहणार नाही. हे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वीच सांगितले आहे. समोर असलेल्या बलांड्या शत्रूला पराजीत करायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवून इंडिया आघाडी सत्तेत येऊ शकणार नाही. हे माहीत असताना देखील, वंचित बहुजन आघाडी बाबत दलाल गोदी मिडिया खोट्या नाट्या बातम्या देऊन भाजपाची बी टिम म्हणून वलगणा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र सत्य काय आहे ते दाखवत नाहीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव ठाकरे, या पक्षाचे दोन समोह गट निर्माण होऊन भाजपाच्या वळचणीला जाऊन बसले आहेत, तसेच काँग्रेस मधील काही दिंगज मंडळी जीव वाचवण्यासाठी भाजपामध्ये गेली आहेत, निवडणूकी नंतर हे भाजपात जाणार नाहीत याची हमी कोणी घ्यायला तयार नाही, या शिवाय तुमच्या पक्षाचे घड्याळ चिन्ह व धनुष्यबाण तुमच्या पासून दुरावले आहेत, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उध्दव ठाकरे, आपण या २०२४ लोकसभा निवडणुका हारलात तर वंचित बहुजन आघाडीला दोष देऊ नका, फुले शाहू आंबेडकर वादी शोषित पिढीत वंचित समाजातील प्रत्येक घटक या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीकडे लक्षपूर्वक पाहत असुन बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे लक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हाच आमचा पक्ष अशी धारणा निचित करुन ठेवली आहे, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे, वंचित बहुजन आघाडी भाजपाला थांबवल्या शिवाय राहणार नाही हे राज्यातील मतदारांनी ओळखले आहेत्यामुळेच त्यांच्या सभेसाठी लोक लाखोंच्या संख्येने मैदानावर दिसून येत आहेत हे स्पष्ट झाले आहे. राज्यातील इंडीया आघाडीतील राजकीय पक्षांनी आप मतलबी धोरणं घेऊन संविधान व लोकशाही धोक्यात आहे, असा भावनिक मुद्दा समोर करून दिशाभूल केली जात आहे, हा प्रस्थापित पक्षांचा डाव समाज बांधवांनी ओळखला आहे, फुले शाहू आंबेडकर विचार धारेतील व चळवळीतील बहुजन समाज बांधवांनी प्रस्थापित पक्षांना मतदान न करण्याची भूमिका घेतली असुन, बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर सांगतील त्या उमेदवाराला पाठिंबा देऊन बहुमताने निवडून देऊ असे आश्वासन बहुजन समाजातील विविध राजकीय पक्ष संघटना आणि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले असून दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, पशु संवर्धन दुग्ध विकास पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ संतोष बडेकर, वि का सो,माजी चेअरमन उत्तम सोनवणे, दत्तात्रय डाडर, सामाजिक कार्यकर्ते प्रतिनिधी संदीप भालेराव, आदी पुणे जिल्ह्यातील भिम सैनिकांनी एल्गार पुकारला आहे,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.