By : Polticalface Team ,11-04-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ११ एप्रिल २०२४ दौंड शहर व तालुका स्तरावर मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा शरदचंद्र पवार साहेब व बारामती लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा सुप्रियाताई सुळे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा राजीव किसनराव आवळे मा आमदार ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर हे प्रामुख्याने उपस्थित होते,
दौंड शहरातील अनेक वर्षांपासून मातंग समाजाच्या अत्यंत महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या विविध प्रश्नाकडे स्थानिक प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे, या सर्व प्रलंबित प्रश्नांवर विशेष चर्चा करण्यात आली,
दौंड शहर व तालुका मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची चिंतन बैठकीत, मातंग समाजाच्या महत्वाच्या विषयावर खलबतं झाली, अनुसूचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला अ ब क ड नुसार स्वतंत्र आरक्षण मिळावे,
क्रांतिवीर लहुजी साळवे, मातंग अभ्यास आयोग पुनर्गठीत करून आयोगातील सर्व शिफारसी त्वरित लागू कराव्यात,
नुकतेच बार्टीच्या धर्तीवर आर्टि मंजूर झालेल्या आहेत त्याची जिल्हा निहाय प्रशिक्षण केंद्र निर्माण व्हावेत,
दौंड शहरातील एकमेव असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान विकास कामांसाठी, अडीच वर्षांपूर्वी मंजूर झालेला निधी अद्याप खर्च करण्यात आला नाही,तो त्वरित खर्च करण्यात यावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रलंबित मान्यता मिळावी,
शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानाच्या बाजुला केलेला चुकिचा रस्ता हा खोडसाळपणाने व जाणीवपूर्वक केला आहे, तो चुकीचा रस्ता तत्काळ दुरुस्ती करण्यात यावा,
मागासवर्गीय माजी सैनिकांच्या निवासी जागे करीता शासनाच्या सर्व विभागाने मंजुरी दिलेल्या प्रलंबित प्रश्नबाबत तसेच दौंड रेल्वे स्टेशन हद्दीतील झोपडपट्टीतील रहिवाशांचे पुनर्वसन प्रश्ना बाबत, तसेच
मातंग समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून मिळावी,
अशा अनेक विविध विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा शरदचंद्र पवार साहेब व बारामती लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे, राजीव किसनराव आवळे मा आमदार हातकणंगले जिल्हा कोल्हापूर
यांच्या उपस्थितीत दौंड शहर व तालुक्यातील मातंग समाजातील प्रमुखांनी विविध विषयांवर मान्यवरांचे लक्ष वेधले होते,
दौड शहरातील उद्यानाला केवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नाव असल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते की काय, अशी देखील शंका उपस्थित नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्यावर अनुसूचित जाती/जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल का करु नये असा प्रश्न उपस्थित केल्याने एकच खळबळ उडाली होती, या मागणीला जोर दिसून येत होता, या बाबत अधिक माहिती अशी की, दौड नगरपालिकेचे शहरात अण्णाभाऊ साठे यांचे एकमेव उद्यान आहे.
उद्यानात मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. मात्र, गेल्या चार वर्षापासून हे उद्यान बंद आहे, त्याच्या दूरवस्थे बाबत नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने उद्यानातील कारंजे, झोके, घसरगुंडी, बाकडे, लाईटचे दिवे तसेच लॉनची वाट लागली आहे. गेल्या चार वर्षांपासून दौडकर या उद्यानापासून वंचित आहेत. दौड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, उद्यानाची झालेली दुरवस्थेला जबाबदार असल्याची प्रतिक्रिया मातंग समाज एकीकरण समितीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश (आबा) वाघमारे यांनी व्यक्त केली आहे या वेळी दौंड शहर व तालुका मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी तसेच राहुल वळू, संजय अडागळे विलास अडागळे सोमनाथ सकट सुरेश तूपसौंदर्य हनुमंत लांडगे विनायक मोरे संजय मोरे संजय पांढरे विजय शेंडगे रोहिदास पाटोळे सुनील फासगे सुशांत वाघमारे चंदर गवारी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :