यवत येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती, मोठ्या उत्साहात साजरी.
By : Polticalface Team ,12-04-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता १२ एप्रिल २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील सकल ओबीसी बहुजन समाज, तसेच महात्मा फुले प्रतिष्ठान यवत, रायकर मळा यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती, यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरा समोर चौकात आयोजित करण्यात आली होती, या प्रसंगी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रमेश शेठ यादव, यवत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे, यांच्या हस्ते, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, या प्रसंगी यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समिर दोरगे, उपसरपंच नाथदेव (आबा) दोरगे, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, सुरज चोरगे, अनिल गायकवाड, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर, सतिश सावंत सर, महिला अध्यक्षा सौ सारिका ताई भुजबळ, तसेच पंचक्रोशीतील सर्व फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते, सकल ओबीसी बहुजन समाज व महात्मा फुले प्रतिष्ठान यवत यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला, या वेळी यवत पोलीस उपनिरीक्षक कोल्हे यांनी समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे सत्यशोधक समाज कार्या बाबत, मनोगत व्यक्त करुन उपस्थित फुले शाहू आंबेडकर चळवळीतील नागरिकांना संयुक्त जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या, तसेच यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे, दौंड पंचायत समिती माजी सदस्य कुंडलिक खुटवड, यवत गावचे ग्रामविकास अधिकारी, बालाजी सरवदे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर, दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड या मान्यवरांनी समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले, या प्रसंगी यवत ओबीसी प्रवर्गातील व रायकर मळा येथिल बांधवांनी यवत येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी होतेय हाच बहुजन समाजाला स्वाभिमान आहे, पुढील काळात कायम स्वरूपी जपावा एससी एसटी ओबीसी प्रवर्गातील बहुजन समाज बांधव आपल्या बरोबर असतील अशी प्रतिक्रिया अनेकांनी बोलताना व्यक्त केली आहे,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाज कार्या बाबत व सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून वर्णव्यवस्थे विरुद्ध लढा पुकारला होता, पूर्वकालीन इतिहास पाहता त्यांचे कार्य सांगायचे म्हटले तर आपले आयुष्य अपुरे पडेल अशी त्यांची सत्यशोधक चळवळ पाहवयास मिळते, तत्पूर्वी वर्णव्यवस्थे नुसार महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, जोतिबांनी १ जानेवारी १८४८ साली मागासवर्गीय अल्पसंख्यांक प्रवर्गातील अस्पृश्य समाजातील मुलींची पहिली शाळा, पुणे येथील शनिवार वाडा परिसरातील तात्यासाहेब भिडे यांच्या भिडे वाड्यात सुरू करुन, मुलींना शिक्षणाची दारे खुली केल्याने, शुक्रवार पेठेतील भटजींचे हिवतापाने अंग फणफनू लागले होते, जोतिबाच्या विरुद्ध भटांनी पुणे शहरात वातावरण ढवळून, धर्म बाटला, धर्म बाटला, या गोविंद च्या पोरानं धर्म बाटवला म्हणत बोंबा बोंब करण्यात आली होती, गोविंदराव पोराला आवर घाला बरे, नाही तर परीनाम बरे होणार नाही, समजले का, असे म्हणत गोविदरावांना दम देखील भरला होता, मात्र जोतिबा थांबतील ते काय ? जोतिबांनी अधिक जोमाने कामाला सुरुवात केली, मानसाला मानुस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी जाती व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी वर्ण व्यवस्थेलाच सुरुंग लावला होता, तात्यासाहेब भिडे यांच्या भिडे वाड्यातील विहीर व हौद अस्पृश्य मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा हौदच खुला करून दिला खरा पण त्यांच्या या कृतीने शनिवार वाड्यातच विषमतेची आग लावली होती, वर्णव्यवस्थेला मूठ माती देऊन मानवता हाच खरा धर्म म्हणंत जोतिबांनी उपदेश केला, विद्या विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, १८८२ साली भारतातील शिक्षण विषयावर स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशन समोर, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी साक्ष देऊन, १२ वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, तसेच शिक्षक हा प्रशिक्षित व बहुजनातील असावा, जीवनोपयोगी व व्यवहारी शिक्षण द्यावे, आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य असावे, त्यांना शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे, ब्रिटिश सरकारने वसूल केलेल्या शेतसाऱ्याची रक्कम, शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करावी, महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागिवणारे वेवस्था असावी, प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे, अशी साक्ष हंटर कमिशन समोर दिली होती, अशी मागणी करणारे, समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, हे आशिया खंडातील पहिले शिक्षक तज्ञ होते,सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून जोतिबांनी रायगडा वरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून पहिला पोवाडा लिहिला शिवरायांचा इतिहास आपल्या समोर ठेऊन आदर्श राजा सांगीतला, आज आपण कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो,या प्रेरणादायी विचार असलेल्या समाज सुधारकांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवून संविधानीक स्वतंत्र प्रत्येक नागरिकाला बहाल केले आहे, जा बहुजनांनो तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला उद्याची शासनकर्ती जमात व्हायचं आहे, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा उपदेश बाबासाहेबांनी बहुजनांना दिला आहे,१९ मे १८५२ रोजी भारतातील पहिली शाळा सुरू करुन धुराजी चांभार, गेनू शिवाजी मांग हे दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले होते, शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे सध्याचे (डेक्कन कॉलेज) प्राध्यापक नेजर थॉमस कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्यालय खात्याकडून जोतिबांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील स्थानिक मान्यवरांनी फुलांच्या सत्यशोधक समाज कार्या बाबत मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सावंत सर यांनी केले, या वेळी यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रमेश यादव मंगेश रायकर, पिटूशेठ कुदळे बाळासाहेब नवले, विष्णू कुदळे प्रशांत देवकर चेतन बधे सचिन बधे नवनाथ बधे राहुल बनसोडे भिम नगर येथील पंचशील तरुण मंडळाचे कार्यकर्ते रविंद्र गायकवाड, हर्षल गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, निखिल रायकर सुरज रायकर अक्षय जाधव अमोल लोंढे भरत भुजबळ,काळूराम शेंडगे, बापू जगताप तसेच यवत पंचक्रोशीतील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील युवा तरुण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.