उंडवडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जंगी मिरवणूकीत, भिम सैनिकांनी केला जल्लोषात आनंद व्यक्त,
By : Polticalface Team ,16-04-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १६ एप्रिल २०२४ दौंड तालुक्यातील मौजे उंडवडी ता दौंड जिल्हा पुणे येथील भिम सैनिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिम सैनिकांनी जंगी मिरवणूकीचे जल्लोषात आयोजन केले होते,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला सामुदायिक त्रिसरण पंचशिल धम्म वंदना घेऊन उपस्थित मान्यवरांनी जयंती साजरी केली, या प्रसंगी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शिंदे मेजर आणि भोर मेजर, यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांन समोर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, १४ एप्रिल १८९१ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महु गाव येथे झाला, पिता सुभेदार रामजी बाबांनी भिवाला शिक्षण मिळावे म्हणून सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दाखल केले होते, भिवाने इयत्ता ७ वी पर्यंत शिक्षण या शाळेत घेतले, अस्पृश्य समाजातील विद्यार्थी प्रथम क्रमांक घेऊन दहावी पास झालेला भिवा दलित समाजातील सुध्दा पहिलाच होता, मुंबई येथील भायखिळा भाजी मार्केटमध्ये भीमराव आणि रमाई यांचा विवाह संपन्न झाला, पुढील उंच्च शिक्षणासाठी बडोदा संस्थेच्या माध्यमातून राजे सयाजीराव गायकवाड यांनी स्कॉलरशिप दिली होती,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
२० मार्च १९२७ साली महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, तसेच नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला, हे सर्वानाच ठाऊक आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्लंड येथे जाऊन ब्रिटिश सरकार विरुद्ध १९३२ साली इंग्लंड येथील पहिली गोलमेजल परिषद डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गाजवली होती, भारतातील सर्वसामान्य नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार मिळावा या मागणीला भारतातील बनयांनी विरोध दर्शविला होता, या बाबत भारत देशात सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली होती, मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रखड मागणीला ब्रिटिशांनी प्रतिसाद देऊन सकारात्मकता दर्शवली होती, भारत देशात स्वतंत्र्याची चळवळ सुरू झाली होती,१९४६ साली प्रभारी समिती स्थापन करण्यात आली, १५ ऑगस्ट १९४७ स्वतंत्र्याचा दिवस निचित करण्यात आला, राजेंद्र प्रसाद यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निवड केली, दोन वर्ष ११ महिने १७ दिवसांत भारतीय राज्य घटना (संविधान) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार करून २६ जानेवारी १९४९ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतीय संविधान देताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आपण सर्वांनी पाहिला आहे, स्वतंत्र समानता बंधूता आणि न्याय व लोकशाही ठिकुण ठेवायची असेल तर संविधानीक मूल्यांवर देश चालवला पाहिजे, घटना (संविधान) पाहुन देश चालवतील असे लोकप्रतिनिधी निवडून देशाच्या संसदेत गेला पाहिजे तर देशात लोकशाही टिकुन राहिल,
देशाची संपत्ती ही आबादीत राहिली पाहिजे, नागरिकांच्या मुलभूत सुविधा संपुष्टात येऊ नये अशी तरतूद केली पाहिजे, न्याय स्वातंत्र्य समानता बंधूता आणि लोकशाही संविधानाच्या चौकटीत ठेवून बहुजन समाजाला
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला असल्याचे
जयंती मिरवणूक कार्यक्रमांच्या समाप्ती दरम्यान बोलताना मनोगत व्यक्त केले, या प्रसंगी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर, डॉ संतोष बडेकर, सेवा निवृत्त पोलिस उपनिरीक्षक बबनराव गायकवाड, प्रतिनिधी अनिल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अमोल नागवडे, उंडवडी येथिल मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते बिटा भाऊ कांबळे, उंडवडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकास कांबळे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी माणिकराव कांबळे,अदी भिम सैनिकांनी व महिलांनी जल्लोषात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत आनंद व्यक्त केला,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.