राज्याच्या राजकारणात ना मा अजित दादा तुम्ही मला सीनियर आहात, मात्र बारामती लोकसभा निवडणुकीत उमेदवार पत्नीचा अर्ज भरण्या बाबत मी सिनिअर आहे, आमदार राहुल कुल,
By : Polticalface Team ,25-04-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २५ एप्रिल २०२४
बारामती लोकसभा मतदार संघ महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा ताई पवार, यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी, दौंड विधानसभा भव्य कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा आमदार अँड राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना मा अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत, दि २५ एप्रिल रोजी चौफुला ता दौंड जिल्हा पुणे, येथिल श्रीकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता,
या वेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना मा अजित दादा पवार प्रामुख्याने उपस्थित होते, भारतीय जनता पार्टीच्या वतीने दौंड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसु कटारिया यांच्या हस्ते ना मा अजित दादा पवार यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,
बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात बोलताना ना मा अजित दादा पवार म्हणाले राज्यातील राजकीय घडामोडी घडतच असतात, आमदार राहुल कुल यांनी उपस्थित केलेल्या उर्वरित विकास कामांची तुम्ही काळजी करू नका, महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा पवार यांना बहुमताने निवडून द्या दौंड तालुक्यातील पुढच्या विकास कामांन बाबत मी बघतो काय करायचे ते, एवढ्यात एका कार्यकर्त्यांने उठून सांगितले, आमदार राहुल कुल यांना मंत्रिपद द्या ना मा अजित दादा पवार यांनी त्यांच्या भाषेत त्या कार्यकर्त्याला सांगितले, अरे बाबा राहुल कुल हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करुन सांगेनं की राहुल कुल यांना मंत्रिपद द्या,
बारामती लोकसभा मतदार संघ महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा ताई पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात प्रामुख्याने जेष्ठ नेते नंदुभाऊ पवार, प्रेमसु काटारीया, वासुदेव नाना काळे, सौ कांचन ताई कुल, राहुल शेवाळे, मंगलदास बांदल, आदी दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
दौंड विधानसभा भव्य कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी बोलताना जेष्ठ नेते नंदुभाऊ पवार. म्हणाले महायुतीच्या अधिकृत उमेदवार, सुनेत्रा ताई पवार यांना बारामती पेक्षा जास्त लीड, दौंड तालुक्यातील मतदार जनता देईल असे आश्वासन त्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना दिले,
तसेच दौंड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा प्रेमसु कटारिया बोलताना म्हणाले, दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्ते खंबीर आहेत, महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ सुनेत्रा ताई पवार यांच्या प्रचारार्थ सुरुवाती पासूनच, जोमाने कामाला सुरुवात केली आहे, पुढे ते म्हणाले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना मा अजित पवार यांनी भिमा पाटस साखर कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यात बाबत व विविध शासकीय मंजुरी देण्याचे कामकाजा विषय आमदार राहुल कुल, यांनी संपर्क साधला असता तेव्हा, ना मा अजित दादा पवार यांनी फोनवरून सांगितले मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती प्रेमसुख कटारिया यांनी कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात बोलताना सांगितले,
बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांनी नगराध्यक्ष मा प्रेमसु कटारिया यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती, या संदर्भात दौंड तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले होते, शरदचंद्र पवार साहेब घरी आल्याने एकच खळबळ उडाली होती, या संदर्भात अनेकांनी विचारणा करुन प्रश्न उपस्थित केले होते, मात्र भेटी दरम्यान झालेली चर्चा ही गुलदस्त्यात असल्याचे सांगत,
बारामती लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत दौंड तालुक्यात सस्पेन्स कायम ठेवला असल्याने मा प्रेमसु कटारिया नेहमी चर्चेत असल्याचे बोलले जाते, ते म्हणाले एकदा निर्णय घेतला की त्यात बदल कदापी शक्य नाही, हे आमदार राहुल कुल यांना पुर्वी पासुन माहीती आहे, पत्रकार व प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले,
बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ सुनेत्रा ताई पवार यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पार्टीचे नेते मा वासुदेव नाना काळे, उपस्थित मतदारांना बोलताना म्हणाले, आपण कशाला मतदार करणार आहे, ? घड्याळाला मतदान करणार आहे, या वेळी ते उपमुख्यमंत्री ना मा अजित दादा पवार यांना म्हणाले
दादा मी तर पहिल्यांदाच घड्याळाला मतदान करणार असल्याचे वासुदेव नाना काळे त्यांनी सांगितले,
दौंड विधानसभेचे आमदार अँड राहुल कुल बोलताना म्हणाले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून पक्ष जो उमेदवार देईल त्यांचे काम करु, असी भुमिका घेऊन पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली आहे, पहिल्या दिवसापासून बोलनं कमी व मतदान जास्त करु, हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले, माजी आमदार सुभाष आण्णा कुल, व रंजना ताई कुल, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या नंतर प्रत्येक वेळी पक्षाने दिलेल्या आदेशानुसार घेतलेली भूमिका पाहता, अँड राहुल कुल यांना मागील आठवणींचा मनात उजाळा निर्माण झाल्याने डोळ्यात पाणी आले,
या वेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना मा अजित पवार यांनी खुडची वरुन उठून त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत धिर दिला, या प्रसंगी अँड राहुल कुल बोलताना म्हणाले
हि निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान होतील, महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा ताई पवार यांच्या घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून मतदान करा,
दौंड तालुक्यातील झालेल्या विकासा बाबत व पुढील होणाऱ्या उर्वरित कामांन बाबत सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री ना मा अजित पवार यांना देण्यात आली, या वेळी बोलताना अँड राहुल कुल म्हणाले दादा तुम्ही राज्यातील राजकारणामध्ये मला सीनियर आहात, मात्र बारामती लोकसभा निवडणूकीत उमेदवार म्हणून पत्नीचा अर्ज भरण्या बाबत मी तुम्हाला शिनियर आहे, असा विनोदात्मक मुद्दा उपस्थित करून अँड राहुल कुल यांनी ना मा अजित दादा पवार व उपस्थित मतदारांचे लक्ष वेधून घेतले, या प्रसंगी दौंड विधानसभा मतदारसंघाती भारतीय जनता पार्टीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.