By : Polticalface Team ,30-04-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ३० एप्रिल २०२४ दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी २) सुनिल सुरेश शिंदे वय ३० रा भिमनगर दौंड ता दौंड जिल्हा पुणे,मुळ गाव पारा नांदुर ता वाशी जिल्हा धाराशिव व आरोपी ३) स्वरूप लाल उर्फ दुष्काळ्या मोकाशा काळे,वय ५१ वर्ष रा पांढरेवाडी निंबाळकर वस्ती कुरकुंभ ता दौंड जिल्हा पुणे,यांस बारामती येथील में.अति जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ आर के देशपांडे यांनी दि,३० एप्रिल २०२४ रोजी खुन प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली,
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील शालिमार चौक येथील न्युशान कम्युनिकेशन दुकानासमोर सदर गुन्हा घडला होता, दि १३ जानेवारी २०१९ रोजी सदर आरोपी यांनी (मयत) पिडीत महिला हीस अनैतिक संबंधाच्या संशयावरून अंगावर रॉकेल टाकून पेटवून देवून खुनाचा प्रयत्न केला व त्या बाबत दौंड पोलीस स्टेशन येथे गु रं नं ३७/२०१९ भा द वी कलम ३०२,३०७,५०४,३४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, औषधोपचार दरम्यान जास्तीच्या जखमांमुळे सदर महिलेचा मृत्यू झाला होता, त्यामुळे सदर आरोपी २) सुनिल सुरेश शिंदे व ३) स्वरूप लाल उर्फ दुष्काळया मोकाशा
काळे विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे कलम ३०२ वाढ करण्यात आला होता,
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून मयत पिढीत महिलेचा खुन केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र सत्र न्यायालयात दाखल केले होते,
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीकांत पोंदकुले यांनी आरोपी विरुद्ध पुरावा सिद्ध करण्यासाठी मयत पीडित महिला तिचा मृत्यूपूर्वी जबाब मे. कोर्टामध्ये सिद्ध करीत सुसंगत पुरावा सिद्ध करण्यासाठी एकूण १९ साक्षीदारांची साक्षी नोंदवली त्यापैकी काही महत्त्वाच्या साक्षीदारांनी न्यायालय मध्ये साक्ष फिरवली होती, त्यामुळे या खटल्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले होते, परंतु फिरवलेल्या साक्षी संदर्भात इतर साक्षीदारांकडून सरकार पक्षातर्फे भक्कम पुरावा आणून सदर मयत महिलेचा मृत्यूपूर्व जबाब हा तिच्या मृत्यूच्या अंतिम समयी नोंदविण्यात आलेला असल्यामुळे ग्राह्य धरणे बाबत सरकारी वकील यांनी कायदेशीर युक्तिवाद करुन लढाई लढलेली होती,
आरोपी विरुद्ध सेशन कोर्टात केस नंबर १६२/१९ मे,आर के देशपांडे, न्यायालयाने दि ३० एप्रिल २०२४ रोजी केसची सुनावणी दरम्यान सदर आरोपी विरुद्ध भा द वी कलम ३०२,३४ अंन्वेय केस मध्ये दोषी धरून सदर आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली,
सदर न्यायालयातील खटल्यांमध्ये सरकारी वकील अँड श्रीकांत पोंदकुले यांनी कोर्ट पैरवी ओ एस आय नलवडे,
दौंड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष डोके, यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अमलदार ए एस आय आर डी जगताप, यांनी सहकार्य केले, अशी माहिती दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
वाचक क्रमांक :