बारामती लोकसभेच्या जाहीर प्रचार सभेतून बोलताना, दौंड तालुक्यातील आजी माजी आमदारांना शरदचंद्र पवार यांचा इशारा, ( विधानसभेची गणितं बिघडवणार )

By : Polticalface Team ,05-05-2024

बारामती लोकसभेच्या जाहीर प्रचार सभेतून बोलताना, दौंड तालुक्यातील आजी माजी आमदारांना शरदचंद्र पवार यांचा इशारा,  ( विधानसभेची गणितं बिघडवणार ) दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,दौंड ता ०४ मे २०२४ बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जाहिर प्रचार सांगता सभा दौंड तालुक्यातील मौजे वरवंड ता दौंड जिल्हा पुणे, येथे घेण्यात आली होती, या सभेला दौंड तालुक्यातील आजी माजी आमदार व नेते मंडळी नसली तरी जनसामान्य मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली होती, या वेळी शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, रोहित पवार, राजेश टोपे, भूषणसिंहराजे होळकर, सक्षनाताई सलगर, सुप्रियाताई सुळे, आदी मान्यवर पदाधिकारी व महिलांसह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले,या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलताना म्हणाले, दौंड तालुक्यातील जनतेच्या व तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार सुभाष कुल. रंजनाताई कुल तसेच राजाराम बापु ताकवणे यांनी चांगले काम केले. या तालुक्यांतील विद्यार्थी मुलं मुली शिक्षणासाठी बारामती किंवा इतर ठिकाणी जातात, दौंड तालुक्यात पंधरा एकर जमीन उपलब्ध करून द्या,? तालुक्यात उत्कृष्ट शैक्षणिक संस्था उभारण्याची जबाबदारी घेत तयारी असल्याचे मा शरदचंद्र पवार यांनी सांगितले, तसेच पुढे बोलताना दौंड तालुक्यातील आजी-माजी आमदारांना त्यांनी इशारा देऊन स्पष्ट संकेत दिले आहेत, ते म्हणाले, याच गावच्या बोरी आणि याच गावच्या बाभळी आहेत, दौंड तालुक्यातील आजी माजी आमदारांना उद्देशून ते बोलत होते. २०१४ पासुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील मताची गळती पाहता कांता नलावडे महादेव जानकर कांचनताई कुल हे मागील लोकसभेतील उमेदवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघ ढवळून काढला होता, बारामती वर असलेली नाराजी यावेळी दिसून आली, मात्र २०२४ मध्ये परिस्थिती पाहता पुन्हा मा शरदचंद्र पवार यांनी समीकरण जुळवले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, येणाऱ्या विधानसभेत दौंड तालुक्यातील आजी माजी आमदार यांची शक्ती पणाला लागल्या शिवाय राहणार नाही, तिसरा पर्याय दौंड मध्ये उदयास येणार असल्याचे स्पष्ट संकेत पवार यांनी दिले आहेत, अशी परिस्थिती दौंड मध्ये निर्माण झाली आहे, याचे संकेत शरदचंद्रजी पवार साहेब यांनी बोलताना म्हणाले, याच गावच्या बोरी आणि याच गावच्या बाभळी, हे अदृश्य समीकरण होणार असल्याचे दिसून येत आहे,बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार बोलताना म्हणाले, हि लढाई सर्व सामान्य व्यक्ती विरुद्ध भाजप अशी आहे, हि लढाई मा शरदचंद्र पवार साहेब विरुद्ध भाजप अशीच आहे, समोर भाजपकडे सर्व (मलीदा गॅंग) आहेत, मात्र हि निवडणूक मतदारांनी हाती घेतली आहे, पुढील येणाऱ्या विधानसभा नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद, पीडीसी बँक, ग्रामपंचायत सोसायटींसह सर्व निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेब व आम्ही सर्वजन खंबीरपणे तुमच्या सोबत राहणार असल्याचे स्पष्ट सांगितले, पुढे बोलताना ते म्हणाले हे सत्तेत गेलेले नेते, म्हणतात आम्ही विकासासाठी भाजपकडे गेलो खरंतर ते स्वतः जेलमध्ये जाऊ नये म्हणून भाजपकडे गेलेत. मी जर भाजपाकडे गेलो असतो तर माझ्या विरुद्ध कारवाया झाल्या असत्या का,? असा प्रश्न उपस्थित करून, आमदार रोहित पवार यांनी दौंड तालुक्यातील मतदारांचा स्वाभिमान जागृत करून या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात इंडिया विकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे त्यांनी सांगितले,छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर राखणारा हा महाराष्ट्र आहे.? जेव्हा हा बाबा दिल्ली दरबारात मान झुकवून उभा राहतो, ते या महाराष्ट्राला अजीबात आवडत नाही, म्हणून दादा हा विषय संपला असुन, दादाची दादागिरी पण संपली आहे, २०१४ ला नरेंद्र मोदी सरकार आणलं तेव्हा पासून काय केले नरेंद्र मोदीने व्यासपीठावर यायचे डावा हात वर करून म्हणायचे, भाईयो और बहनो इस देश मे साठ साल मे काँग्रेसने कुछ किया है क्या, देशाचं सरकार तुम्ही चालवता, राज्याचं सरकार तुम्ही चालवता, आणि दहा वर्षा नंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहांना महाराष्ट्रात यावं लागतं आणि प्रश्न कोणाला विचारतात कांद्याचे प्रश्न असतील दुधाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल सामाजिक समतेचा प्रश्न असेल ते येतात आणि म्हणतात पवार साहेबको मै प्रश्न पुछना चाहता हु आपने इतने सालो मे क्या किया, अरे राज्य तुम्ही चालवता आणि प्रश्नाची उत्तरे कोणाकडे मागता, आपने इतने सालो मे क्या किया, काल कोकणामध्ये आले मै उद्धव साहेब को पुछना चाहता हु देशाचं सरकार तुम्ही चालवता राज्याचं सरकार तुम्ही चालवता आणि प्रश्न पवार साहेब आणि उध्दव साहेबांना विचारता अरे तुमची प्रश्नांची उत्तरे देण्याचा योग्यता नसेल तर यांना खाली ओढलं पाहिजे की नाही, याचा विचार तुम्ही केला पाहिजे, यांना लोकांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर सोडा गादी, यांना गादीवर बसण्याचा काही अधिकार नाही, ४ जुनला इंडिया विकास आघाडीचं सरकार येईल, हे तुम्हाला मी आज सागतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी वरवंड येथील जाहीर सभेत बोलताना मतदारांन समोर व्यक्त केली, असं नाहि रे बाबा, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी, उद्या पर्यंत हा आवाज घुमला पाहिजे, सात तारखेच्या दिवसा पर्यंत तुतारी वाजली पाहिजे, मला तीन वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करुन दिल्लीला जायची संधी दिली, त्या बंद्दल मी दौडकरांचं आभार मानते, सात तारखेला मतदान आहे माझं चिन्ह बदलं आहे मी पक्ष नाही बदंला, चिन्ह का? बदंलय हे आपल्याला माहित आहे, दौंड मध्ये अनेक वेळा आपण सगळ्यांनी मिळून विकास केला आहे, भाषणं करुन विकास होत नाही, अशी माझ्या वर टिका केली जात आहे. माझं म्हणणं आहे की भाषणं करुणच विकास होतो याचं कारण हि लोकशाही आहे. दडपशाही नाही, मी लोकप्रतिनिधी म्हणून मतं मागतेय, तुमचा आवाज म्हणून मी दिल्लीला जातेय, तुम्हाला दिल्लीत कसला खासदार पाहिजे बोलणारा की बाक वाजवणाराखासदार पाहिजे? बोलणारा मग आपली तुतारी वाजलींच मला संसद रत्न मिळतं ना ते क्रमांक देणारा माझा सगा सोयरा नाहिये, भारतीय जनता पक्षाचा मंत्री मला कमांक देतं तेव्हा मला संसद रत्न मिळतय गैरसमज नसावे, बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांनी जाहीर प्रचार सभेतून बोलताना सांगितले, बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुका वरवंड येथे जाहीर प्रचार सभेला मतदारांनी भर उन्हात दुपारी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.