खासदार मा रविंद्र भाऊ धंगेकर यांचा यवतकरांनी केला सत्कार, भाजपा विरुद्ध सुप्त लाट, मा रविंद्र भाऊ धंगेकर यांची प्रतिक्रिया,
By : Polticalface Team ,15-05-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १४ मे २०२४ पुणे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतुन व चर्चेत असलेले काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मा रविंद्र भाऊ धंगेकर यांनी मतदान होताच दुसऱ्या दिवशी दौंड तालुक्यातील यवत जवळ असलेल्या त्यांच्या गावी मौजे नाथाची वाडी या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आले होते, पुणे येथे परत जाताना त्यांनी यवत येथील युवा तरुणांची व समस्त ग्रामस्थांची भेट घेतली, यवतकरांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले
या वेळी मोठ्या संख्येने युवकांनी उपस्थिती दर्शवली होती,
दौंड तालुका ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकरी व्यक्ती व प्रथम खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल अशी प्रतिक्रिया यवतकरांनी व्यक्त केली, यवत येथील आनंदग्राम सोसायटीचे माजी सचिव व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अँड प्रकाश सोळंकी यांनी भावी खासदार मा रविंद्र भाऊ धंगेकर यांच्या गळ्यात शाल घालून सत्कार करण्यात आला, यवत येथील युवा तरुणांनी मा, रविंद्र भाऊ धंगेकर यांना आमचे खाजदार म्हणत मोठ्या उत्साहात शुभेच्छा दिल्या,
यवत येथे चाय पे चर्चा करत बोलताना ते म्हणाले, पुणे लोकसभा मतदार संघातील निवडणुक दि १३ मे रोजी मतदानाचा चौथा टप्पा पार पडला असुन, ही लोकसभेची निवडणूक कोणाच्याही प्रतिष्ठेची नसुन, भाजपा विरुद्ध जनतेत सुप्त लाट होती, त्यामुळे हसत खेळत ही निवडणूक पार पडली असल्याचे त्यांनी सांगितले, पुढे बोलताना ते म्हणाले गेले दोन महिने झाले मी गावाकडे नाथाची वाडीला आलो नव्हतो, निवडणुकीच्या रणधुमाळीतुन व प्रचारातून मोकळा झालो असे म्हणताच सर्वांच्या चेहऱ्यावर एकच हास्य निर्माण झाले,
पुणे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील राजकीय डावपेच पाहता माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या नंतर काँग्रेस पक्षाला उतरती कळा आली होती, मात्र तुम्ही आठ महिन्यांपूर्वी आमदारकी लढवुन विजय खेचून आणला आणि पुणे लोकसभा मतदार संघात पुन्हा काँग्रेस पार्टीचे वर्चस्व निर्माण केले, त्यामुळे माजी खासदार गिरीश जी बापट साहेब यांच्या नंतर पोट निवडणूक घेण्याचे धाडस सत्तेत असलेल्या भाजपाने केले नाही, या उलट पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ केली असल्याचे दिसून आले, अशा प्रकारे यवत येथील उत्कृष्ट व दर्जेदार चाय पे चर्चा करीत ग्रामीण भागातील युवकांनी भावी खासदार मा,रविंद्र भाऊ धंगेकर यांच्याशी संवाद साधला,
पुणे लोकसभा मतदार संघातील प्रचार दरम्यान घेतलेली मेहनत पाहता एक एक किस्से सांगत असताना त्यांनी महत्त्वपूर्ण निदर्शनास आलेला अनुभव सांगितला, ते म्हणाले, मराठा उमेदवारांना निळा झेंडा वाले मतदान करीत नाहीत, तर मराठा समाज वंचित पक्षाच्या उमेदवाराला मतदान करीत नाही, अशी प्रतिक्रिया रविंद्र भाऊ धंगेकर यानी व्यक्त केली, या प्रसंगी पुणे लोकसभा निवडणुकीत कोन बाजी मारेल असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, वसंत तात्या मोरे देखील म्हणतात मी विजय होईल, त्याच प्रमाणे मी देखील म्हणत आहे,
असे सांगून त्यांनी गावाकडील युवा तरुण चाहत्यांचे लक्ष वेधले होते,
या प्रसंगी प्रामुख्याने अँड प्रकाश सोळंकी, डॉ संतोष बडेकर, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर, मुस्लिम समाजातील युवा कार्यकर्ते समीर सैय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते मयुर दोरगे, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोसिनभाई तांबोळी, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते सचिन दोरगे, पोपट दोरगे, तसेच यवत येथील सामाजिक कार्यकर्ते दिलिप दोरगे, ल्याकतभाई शेख, अजीतभाई तांबोळी, विनायक देवकर, आदी यवत गावातील सर्व सामान्य व बहुजन समाजातील युवा तरुण आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष