By : Polticalface Team ,19-05-2024
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे दहिटणे परीसरातील, देवकर मळा, गणेश नगर, देवकर वाडी, मगर वाडी या भागातील वाड्या वस्त्यानवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे दि,१७ मे रोजी मध्यरात्री हत्यार बंद असलेल्या चार चोरट्यांनी माळवाडी येथील ( बाळकृष्ण वगरे) यांच्या घरातून लोखंडी पेटीतील तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला असल्याचे त्यांनी सांगितले तसेच याच दिवशी रात्री यवत पोलीस स्टेशन जवळ असलेल्या भर चौकातील राणी मोबाईल व्यावसायिक दुकानदार मनीश जुहारसिंग राजपुत यांचे दुकानाचे शटर उचकटून दोन चोरट्यांनी १ लाख १० हजार ५०० रुपये रोख रक्कम चोरुन नेली आहे.
दहिटणे येथील देवकर मळा, गणेश नगर, माकर वाडी, देवकर वाडी, या भागात १७ मे रोजी रात्री २ ते ३ वा जे सुमारास चोरट्यांनी आजु बाजुच्या घरांच्या दाराला बाहेरून कड्या लाऊन, बोरावके, आणि अरुण कोळपे यांच्या घराचे कुलूप कडी कोयंडा तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला, या प्रसंगी घरातील पुरुष व महिला बाहेर अंगणात झोपलेले होते, चोरट्यांची चाहूल लागताच जागे झाले असल्याने, चार चोरट्यांनी तिथुन पळ काढला, तेव्हा पुरुषांनी त्यांच्या मागे पळत असताना चोरट्यांनी त्यांच्या वर दगडफेक केली असल्याचे त्यांनी सांगितले, कदाचित या प्रसंगी दुर्दैवी घटना किंवा गंभीर प्रकार घडला असता हे सागणे अवघड झाले असते चोरट्यांच्या हातातील कोयता हत्यार व धारदार शस्त्राने कदाचित जीव घेतला असता अशी परिस्थिती निर्माण झाली होती अरुण कोळपे यांनी दहिटणे येथील गाव पोलीस पाटील यांच्याशी मोबाइल द्वारे संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला असे त्यांनी सांगितले.
दहिटणे गाव पोलीस पाटील नवनाथ बापु धुमाळ यांनी तत्काळ जवळ असलेल्या देवकर मळा गणेश नगर मगर वाडी येथील नागरिकांना चोरट्यां बाबत माहिती देऊन सावध केले तोपर्यंत चोरट्यांनी थेट दहिटणे परीसरातील बापदेव वस्ती गाठली आणि पोलीस पाटलांच्या बंगल्या समोर च जाऊन थांबले घराचे दार बंद होते घरातील लाईट ही बंद होती खिडकी उघडी असल्याने बाहेरील सर्व काही ते पाटिल पाहत होते उभे असलेल्या चोरांना पाहून गाव पोलीस पाटील म्हणाले, का रे लोकांना त्रास देताय जाता का नायं इथुन, नाही तर मारुन टाकील असा दम देताच त्यावर चोरट्यांनी प्रतिउत्तर देत म्हणाले बरं बरं जातो की अशी उलट प्रतिक्रिया चोरट्यांनी दिली असल्याचे पोलीस पाटील नवनाथ धुमाळ यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील दहिटणे परीसरात (१) दि, ०९ एप्रिल २०२४ रोजी बापदेव वस्ती येथे राहात असलेले श्री दत्तात्रेय सोपान पिलाने यांच्या घरी चोरी झाली होती १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख रक्कम असा एवज चोरट्यांनी चोरून नेला आहे या बाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे (२) दि १७ मे रोजी पुन्हा एकदा दहिटणे परीसरातील माळवाडी येथे चार चोरट्यांनी बाळकृष्ण वगरे यांच्या घरी चोरी केली असून घरातील लोखंडी पेटी बाहेर नेऊन फोडली व त्यामधील तीन तोळे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपये चोरट्यांनी पळून नेले (३) याच रात्री यवत पोलीस स्टेशन जवळ हाकेच्या अंतरावर यवत गावातील भर चौकात असलेल्या राणी मोबाईल व्यावसायिक दुकानदार मनीश जुहारसिंग राजपुत यांचे दुकानाचे शटर तोडुन आतिल काउंटर मधील १ लाख १० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे (४) डाळींब येथील एका घरातील १२ हजार रुपये चोरट्यांनी चोरुन नेले या संदर्भात चोरट्यांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्या बाबत बोलताना १२ हजारासाठी उपाताप कशाला वाढवता अशी बातमी प्रसिद्ध झाली होती (५) पिंपळगाव हद्दीत व नाथाची वाडी येथे देखील चोरी झाली (६) दुसऱ्या दिवशी कासुर्डी फाटा येथील वाघमारे कुटुंब यांच्या घरातील १० ते १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी पळून नेली आहे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील विविध ठिकाणी झालेल्या चोऱ्यांबाबत यवत पोलीस स्टेशन डी बी विभागातील पोलीस कर्मचारी यांना अद्याप चोरांना पकडण्यात यश आले नाही चोरट्यांचा शोध व थांग पत्ता लागत नाही ही मोठी शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे वरील सर्व घरफोडी चोरी संदर्भात चोरट्यांचा सुगावा डी बी विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना लागत नाही ही बाब अतिशय लाजिरवाणी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे यवत पोलीस स्टेशन जवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या राणी मोबाईल व्यवसायक दुकानदार मनीश जुहारसिंग राजपुत यांचे दुकानातील १ लाख १० हजार ५०० रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली हि घटना पोलिसांसाठी आव्हानात्मक असल्याचे बोलले जात आहे यवत पोलीस स्टेशन येथील डी बी विभागातील पोलीस कर्मचारी वरील सर्व झालेल्या घरफोडी चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडून आपले कर्तव्य आणि कामगिरी बजावतील का ? या महिन्या भरात विविध ठिकाणी घरफोडी चोरी झालेल्या कुटुंबांना न्याय मिळवून देतील का ? आणि यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भयभीत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेले अनेक दिवसांपासून यवत पोलीस स्टेशन हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून डी बी विभागातील पोलीस कर्मचारी नेमकं करत्यात तरी काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील गाव बिट निहाय पोलीस कर्मचारी कर्तव्या पासून अलिप्त असल्याचे बोलले जात आहे अवैध गावठी बेकायदेशीर हातभट्टीची दारू मटका सोरट जुगार पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेल ढाबे वर देशी विदेशी दारू तसेच लॉज हॉटेल अंमली पदार्थ गांजा अशा अवैध बेकायदेशीर व्यवसाय धारकांनवर तात्पुरती कारवाई करून दिशाभूल केली जात आहे परत जैसे थे परिस्थिती पाहवयास मिळते पोलीस कर्मचारी डोळेझाक करून कर्तव्यात कसूर करीत आहेत ही मोठी शोकांतिका असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात असुन गाव निहाय गुप्तहेर आणि खबरीलाल हे फक्त एवढ्याच कामासाठी आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाचक क्रमांक :