खुटबाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने रुग्णांची गैरसोय, वरिष्ठांकडे तक्रार, डॉ बापू झिटे यांनी दिली घरपोच आरोग्य सेवा, स्टाप वाढवण्याची होतेय मागणी

By : Polticalface Team ,20-05-2024

खुटबाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने रुग्णांची गैरसोय, वरिष्ठांकडे तक्रार, डॉ बापू झिटे यांनी दिली घरपोच आरोग्य सेवा, स्टाप वाढवण्याची होतेय मागणी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २० मे २०२४ दौंड तालुक्यातील मौजे खुटबाव ता दौंड जिल्हा पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शुक्रवार दि १७ रोजी अचानक बंद असल्याने अनेक रुग्णांची गैरसोय झाली, मात्र दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ उज्वला जाधव यांच्या सुचनेनुसार रुग्णांना मिळाली घरपोच आरोग्य सेवा, या संदर्भात अधिक माहिती अशी की रमेश नारायण लडकत रा लडकत वाडी ता दौंड जिल्हा पुणे यांच्या पायाला दुखापत झाल्याने शुक्रवार दि.१७ मे रोजी सकाळी ११.३० वा जे सुमारास खुटबाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपचार घेण्यासाठी गेले असता त्यांना रुग्णालय बंद असल्याचे निदर्शनास आले या वेळी परीसरातील अनेक रुग्ण औषध उपचार घेण्यासाठी आले होते मात्र या प्रसंगी खुटबाव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व नर्स कर्मचारी उपस्थित नसल्याने अनेक रुग्णांना औषध उपचार घेता आला नाही, रमेश नारायण लडकत यांचे संतुलन बिघडले मानसिक त्रास झाल्याने उपचाराविना झोपून राहवे लागले रमेश लडकत यांनी आरोग्य सेवा टोल फ्री क्रमांक १०४ नंबर वर संपर्क साधला मात्र कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत थेट आरोग्य संचालक पुणे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले आखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड. तुषार झेंडे तसेच तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे यांनी रमेश लडकत यांच्या प्रकृती बाबत दखल घेऊन त्यांना औषध उपचार उपलब्ध व्हावेत या उद्देशाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उज्वला जाधव यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली सदर रुग्णाची दखल घेऊन केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य अधिकारी कर्मचारी यांची तातडीने बैठक घेण्यात आली, रमेश लडकत यांना घरपोच आरोग्य सेवा देण्यात यावी अशी सूचना करण्यात आली, आरोग्य अधिकारी डॉ.बापू झिटे यांनी रमेश लडकत यांच्या घरी जाऊन गोळ्या औषधे उपलब्ध करून दिल्याने रमेश लडकत यांची मानसिक व शारिरीक त्रासातून सुटका झाली असल्याने त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष अँड तुषार झेंडे, तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे यांच्या प्रयत्नामुळे तातडीने औषध उपचार होऊन आरोग्य सेवा मिळाली असल्याचे रमेश लडकत यांनी सांगितले, खुटबाव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र दि,१७ रोजी बंद ठेवण्याचे नेमके कारण तरी काय ? या बाबत केडगाव येथील आरोग्य अधिकारी डॉ निलम लोखंडे यांना संपर्क साधला असता खुटबाव येथिल रुग्णालयात एकूण चार जणांचा स्टाफ असून सध्या दोन पदे रिक्त आहेत इथे असलेल्या दोघांन पैकी एक जण लसी करणासाठी भांडगाव येथे गेले होते, तर एक जण दौंड येथे गेल्याचे त्यांनी सांगितले खुटबाव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरे कर्मचारी असल्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेऊन लसी करणासाठी बाहेर जावे लागत आहे, खुटबाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी स्टाप वाढवण्याची मागणी रमेश लडकत यांनी केली आहे,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष