अखंड हरिणाम सप्ताहाच्या निमित्ताने बोरिऐंदी गावात भक्तीमय वातावरण, ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा समारंभ संपन्न,
By : Polticalface Team ,22-05-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता २१ मे २०२४ रोजी दौंड तालुक्यातील मौजे बोरीऐंदी ता दौंड जिल्हा पुणे, येथील वारकरी संप्रदायातील सचिन भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सांगता समारंभ ह.भ.प. दिगंबर महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनाने पार पडला.
गेली सात दिवस बोरिऐंदी येथे अखंड हरिनाम सप्ताह काळात ह.भ.प. बबन महाराज वेदपाठक यांनी व्यासपीठा च्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील भाविक भक्तांना मार्गदर्शन केले,
ह.भ.प सर्वश्री मोटे महाराज, वेदपाठक महाराज इंदलकर महाराज वाघले महाराज डॉ.रवींद्र भोले महाराज आणि वंन्दना काकडे या सर्व महाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून वैष्णव वारकरी परंपरेचा वारसा कायम स्वरूपी जपून ठेवला असल्याचे दिसून आले आहे, या सप्ताह काळात संपूर्ण बोरीऐंदी गाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते,
(आवडीने भावे हरीनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व असे, या संत जनांचा उपदेश अंगीकृत करुन, स्वरुप अनुभव घेत, निर्गुण निराकार भगवंताच्या नाम स्मरणात भाविकांचे लक्ष वेधले होते, अखंड हरिनाम सप्ताहाच्या सुरुवाती पासून दररोज रात्री कीर्तन रुपी सेवा ह.भ.प. सर्वश्री संतोष भागवत, सानिका झेंडे, राणी कोलते, बबन वेदपाठक, वाघले गणेश आखाडे आणि शंकर झाडे, या महाराजांनी उत्कृष्ट कीर्तन सादर केली.
तसेच बोरीभडक, पोंढे , वाघापूर, राजेवाडी, शेलारवाडी, सहजपूर, राहू, चंदणवाडी, ताम्हाणे वस्ती, या गावातील वारकरी भजनी मंडळांनी हरि जागर मध्ये सहभागी होऊन हरिनाम सप्ताह अतिशय सुंदर आणि मधुर गायन तसेच टाळ मृदुंगाचा गजर करून जोरदार रंगत निर्माण करून जागरण सेवा सादर केली. संपूर्ण हरिनाम सप्ताह सोहळ्यात तुकाराम दौंडकर, कैलास मगर, श्लोक ताम्हाणे,या मृदुंगाचार्यानी उत्कृष्ट वाद्य वाजवून भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते, अखंड हरिनाम सप्ताह सांगता उत्सवाच्या निमित्ताने शितोळे आणि आंबेकर या कुटुंबातील भाविकांकडून अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,
अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सहकार्य करणाऱ्या गावातील सर्व दानवीरांचे आभार व्यक्त करुन, आयोजकांनी त्यांचा यथोचित सत्कार केला,
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन नियोंजन आणि व्यवस्था चोख पणे पार पडली त्यामध्ये प्रामुख्याने सचिन गायकवाड, नामदेब दौंडकर, नाना गायकवाड, दादा शेलार, चंद्रकांत वेदपाठक, गणपत दौंडकर, खजिनदार् रामदास गायकवाड, माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड, गणेश दौंडकर अशोक गायकवाड, भानुदास कुदळे यांनी विशेष परिश्रम घेतले,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.