पाटेठाण येथे भगवान बुद्ध मूर्ती स्थापना सोहळा साजरा, लोक कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी धम्म शासन लागू करा - प्रा.सदाशिव कांबळे

By : Polticalface Team ,24-05-2024

पाटेठाण येथे भगवान बुद्ध मूर्ती स्थापना सोहळा साजरा, लोक कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी धम्म शासन लागू करा - प्रा.सदाशिव कांबळे दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, *दौंड* दि.२३ मे, २०२४ रोजी पाटेठाण, ता. दौंड, जि. पुणे येथे वैशाख पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती स्थापना सोहळा आणि नालंदा बुद्ध विहार हा नामांतराचा कार्यक्रम दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा.सदाशिव कांबळे यांच्या हस्ते,धम्ममय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या वेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजय गायकवाड, दौंड तालुका अध्यक्ष सुमित रणधीर, महासचिव सतिश गायकवाड, धम्ममित्र नागेश कांबळे, प्रसिद्ध उद्योजक योगेश गायकवाड, सरपंच उषा पिंपळे, उपसरपंच अक्षय हंबीर, माजी उपसरपंच मनिषा गायकवाड, रोहिदास हंबीर, ग्रामपंचायत सदस्या निता गायकवाड, माजी सदस्य अशोक गायकवाड, वि. का. सोसायटीचे माजी संचालक विजय हंबीर, जालिंदर हंबीर, बापू किसन हंबीर, रयत शेतकरी संघटनेचे अंकुश हंबीर, समाजसेवक भरत हंबीर, बापू गायकवाड, ज्येष्ठ नागरिक शांताबाई गायकवाड, कैलास गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, मुरलीधर गायकवाड, संजय गायकवाड, गौतम सोनवणे, धम्मसेवक दीपक पवार, देविदास सोनवणे, सुदाम मांढरे, मधुकर मांढरे, सोहम संगरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. या वेळी अजय गायकवाड बोलताना म्हणाले, पाटेठाण येथील नालंदा बुद्ध विहाराला शैक्षणिक आणि धम्माचे केंद्र करा. आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करणे काळाची गरज आहे. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी युवकांनी भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संघटनेत सहभागी झाले पाहिजे असे गायकवाड यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना सुमित रणधीर म्हणाले बुद्ध धम्मानेच आपला उद्घार होऊ शकतो, असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे, बोधीसत्त्व बाबासाहेब आंबेडकर हे आपले प्रेरणास्त्रोत आहेत. बुद्ध धम्म हाच विकासाचा खरा मार्ग आहे. भारत बौद्धमय अभियानात आपण सर्वांनी सक्रिय झाले पाहिजे. असे रणधीर यांनी सांगितले. तर सतिश गायकवाड बोलताना म्हणाले आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करुन बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला. हा धम्मरथ आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. त्यामुळे बुद्ध धम्माची चळवळ बलवान केली पाहिजे. धम्मक्रांती करण्यासाठी तरुणांनो भारतीय बौद्ध महासभेत सहभागी व्हा.! असे गायकवाड यांनी आवाहन केले. प्रा.सदाशिव कांबळे प्रबोधन करताना म्हणाले की, तथागत भगवान बुद्ध हे समस्त विश्वाचे मार्गदाते आहेत. भगवान बुद्धांचा धम्म हा बहुजन हिताय, बहुजन सुखाय आहे. बौद्धांनी रविवारी बुद्ध विहारात जाऊन बुद्ध उपदेश व संदेश ग्रहण केला पाहिजे. आपल्या मुलांना देखील विहाराची गोडी लावायला हवी. विहाराच्या माध्यमातून विकासात्मक कार्यक्रम राबवले तर बौद्धांचा उन्नतीचा मार्ग सुकर होईल. नालंदा हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ होते. आपणदेखिल या विहाराला बौद्धांचे विद्यापीठ समजूनच बौद्ध चळवळ गतिमान करायला हवी. पंचशीलाचे पालन करत, बौद्ध संस्काराचा अवलंब करत, आपल्या मुलांना धम्म शिकवला पाहिजे. लवकरच दौंड तालुक्यात धम्म प्रशिक्षण केंद आम्ही सुरु करणार आहोत. बौद्ध म्हणून आपण धम्मदीक्षा घेतली पाहिजे. बुद्ध धम्माच्या विसंगत आचरण करु नका. बुद्ध धम्म जर वगळला तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही हे कदापीही विसरु नका. युवकांनी धम्मचळवळीत सहभागी होणे काळाची गरज आहे. सामाजिक जीवनात जर धम्मशासन लागू झाले तर लोककल्याणकारी राज्य निर्माण होईल. नालंदा बुद्ध विहारातून धम्म चळवळीला सशक्त करा.! असे कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष