साप चावलेल्या तरुणाचा जीव वाचवण्यासाठी, यवत ग्रामीण वैद्यकीय अधिकाऱ्यांची धावपळ, यवत ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याची सुचना, डी एच ओ, पंल्ले,
By : Polticalface Team ,26-05-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता २५ मे २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील मामा मोहोळ यांच्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुराला साप चावल्याने यवत ग्रामीण रुग्णालयात येथे २५ मे रोजी औषध उपचार करण्यासाठी आणले होते, या प्रसंगी यवत ग्रामीण रुग्णालयातील नव्याने रुजू झालेले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ पतकी यांच्या मार्गदर्शनाखाली पिढीत रुग्णाला तत्काळ औषध उपचार सुरू करण्यात आले होते, यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणाचे नाव अमिर उघडे रा मामा मोहोळ वस्ती ता दौंड जिल्हा पुणे असे बरोबर असलेल्या इसमाने सांगितले,
तरुण मजुरांच्या हाताला साप चावल्याने दंडाला गंठ बांधले होते, मात्र साप कोणत्या प्रकारचा होता हे रुग्णाला देखील स्पष्ट सांगता आले नाही, काही वेळात शारीरिक त्रास होऊ लागल्याने यवत ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली असे रुग्णा बरोबर असलेल्या व्यक्तीने सांगितले,
यवत ग्रामीण रुग्णालयात नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी डॉ पतकी हे उपस्थित नसल्याने रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी डॉ पेंगोर यांनी रुग्णावर प्राथमिक औषध उपचार सुरू केले, मात्र युवा तरुण रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने तो बेशुद्ध अवस्थेत जात असल्याचे दिसून येत होते, अशा परस्तीती पुढील औषध उपचारासाठी पुणे ससुन रुग्णालयात तरुण रुग्णाला पाठविण्या बाबत नातलगांना त्यांनी सांगितले,
( घाई गडबडीच्या कामात रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) वेळेत येईल ते काय,? रुग्णा बरोबर असलेल्या नातलग मित्रांनी १०८ नंबर वर संपर्क साधला असता, एक तास लागेल असे सांगण्यात आले, या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता यवत ग्रामीण रुग्णालयात (१०८) ही रुग्णवाहिका थांबा असताना देखील वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही,
ही मोठी शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे, रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, दौंड तालुका पुणे सोलापूर महामार्गावरील पश्चिम भागात चौफुला ते बोरिऐंदी फाटा या भागात अपघाचे प्रमाण अधिक असल्याने यवत ग्रामीण रुग्णालयात १०८ ही रुग्णवाहिका थांबा आहे, मात्र करोणा काळापासून ही रुग्णवाहिका वरवंड येथील ग्रामीण रुग्णालय येथे थांबा नसताना देखील, या ठिकाणी थांबत आहे, या मागचे नेमके कारण तरी काय ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे,
यवत पंचक्रोशीतील नागरिकांना आशा प्रकारे अनेक घटना घडल्या आहेत,
या बाबत अनेक रुग्णांच्या नातलगांनी अडचणी च्या काळात वेळोवेळी रुग्णवाहिके साठी संपर्क साधून देखील रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने, खाजगी रुग्णवाहिके शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही,
मोल मंजुरी करणाऱ्या गोर गरीब नागरीकांना खाजगी रुग्णवाहिकेचा आर्थिक बोजा परवडत नसल्याने सर्व सामान्य नागरीक मोठ्या आशेने १०८ नंबर वर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतात, मात्र त्याना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही हि मोठी शोकांतिका असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होत आहे,
यवत ग्रामीण रुग्णालयात १०८ नंबर वरील रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या जीवाशी धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यवत परीसरातील रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी धावपळ थांबावी या अनुषंगाने आणि खाजगी रुग्णवाहिका सर्व सामान्य नागरिकांना परवडत नसल्याने १०८ नंबर वर संपर्क साधला जातो अशा वेळी या तरुणासाठी मात्र रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही, या धावपळीत एक तास उलटून गेला, रुग्णाची प्रकृती चिंताजनक होत चालली होती, खाजगी रुग्णवाहिके शिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याने
ग्रामीण रुग्णालयात उभी असलेल्या
खाजगी रुग्णवाहिका श्री सिद्धेश्वर कार्डियाक ॲम्बुलन्स पिंपळगाव ता दौंड जिल्हा पुणे, या वरील चालक रामनाथ शितोळे यास संपर्क साधून बोलवण्यात आले, सर्व सामान्य कामगार मजुर माणसाला येणाऱ्या अडचणी सांगुन येत नाहीत, अशा वेळी काय करावे हे देखील सुचत नव्हते, यवत ग्रामीण रुग्णालयातील डॉ पेंगोर यांनी सदर रुग्णाला आयव्ही व ऑक्सिजन लावून पुढील उपचारासाठी ससुन रुग्णालय पुणे येथे पाठविण्यात आले, या वेळी डॉ कदम यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती, विषारी साप चावलेल्या रुग्णाला पुणे ससुन रुग्णालयात दाखल केले असल्याचे रुग्णवाहिका चालकाने सांगितले,
चौकट
( वरिष्ठ आरोग्य अधिकारी डी एच ओ, यमा पंल्ले यांनी यवत ग्रामीण रुग्णालय येथे अचानक भेट दिली, या प्रसंगी त्यांच्याशी वरील गंभीर परिस्थिती बाबत संवाद साधला असता, त्यांनी सदर घटनेची दखल घेऊन, वरवंड येथील ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधून १०८ रुग्णवाहिका संदर्भात अधिक माहिती घेऊन, यवत ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पुन्हा रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, या उद्देशाने संबंधितांना सुचना दिल्या आहेत, तसेच करोणा काळ संपल्या नंतर व संध्या बंद असलेले यवत ट्रामा केअर सेंटर सुरू करण्या बाबत सूचना दिल्या आहेत, )
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष