यवत माणकोबा वाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त ७९९ वृक्षांचे महावृक्षदान कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात साजरा,

By : Polticalface Team ,31-05-2024

यवत माणकोबा वाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त ७९९ वृक्षांचे महावृक्षदान कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात साजरा,  दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड ता ३१ मे २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील माणकोबा वाडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती आणि नाथदेवराई फाउंडेशन वर्धापन दिनाचे औचित्य साधून यवत माणकोबा वाडी येथील ग्रामस्थांनी पिंपळ वृक्षाला फाउंडेशन अध्यक्ष घोषित करून ७९९ देशी वृक्षांचे वाटप करत हा महावृक्षदान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी प्रमुख पाहुणे महेश रूपनवर आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. नाथदेवराई फाउंडेशन यांनी पिंपळ वृक्षाला अध्यक्ष म्हणून स्थान दिल्याने द इकोफॅक्टरी फाउंडेशन चे प्रतिनिधी शुभम ठोंबरे यवत ग्रामपंचायत सरपंच समिर दोरगे यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. फाउंडेशन सदस्य राहुल बिचकुले यांनी प्रस्ताविक मनोगत व्यक्त करताना फाउंडेशन कार्याचा आढावा आणि भविष्यातील नाथदेवराई फाउंडेशनच्या भविष्यातील वाटचाली बाबत विषेश माहिती दिली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे महेश रूपनवर आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी उपस्थित ग्रामस्थांना अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी तसेच बांधावरील झाडांचे महत्व, फळबाग काळाची गरज, वाढते तापमान अशा अनेक विषयांवर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक विनायक जगताप यांनी शेतकऱ्यांना व उपस्थित शेतकरी समस्त ग्रामस्थांना शेती योजने बाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. श्रीकांत हंडाळ यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन करत सामाजिक सांस्कृतिक धडे देऊन ग्लोबल वार्मिग हे ग्रामीण भागात समजत नसले तरी वाढते तापमान हे सर्वांना जाणवत आहे. याकडे विशेष लक्ष वेधले जावे या हेतूने नाथदेवराई फाउंडेशन गेली सहा वर्षापासून महावृक्षदान सोहळा आयोजित करत आहे. आजवर अनेक वृक्षांचे वृक्षारोपण या फाउंडेशनच्या माध्यमातून केले असून अनेक वृक्ष मोठ्या डौलाने डोलत आहेत त्यामुळे सर्व सामान्य लोकांमध्ये वृक्षप्रेम जागृत होत असल्याने या नाथदेवराई फाउंडेशनने ७९९ देशी वृक्षांचे वाटप केले आहे. पिंपळ या वृक्षाला अध्यक्ष घोषित करून सर्व माणकोबा वाडी ग्रामस्थ फाउंडेशनचे सदस्य म्हणुन काम करतील अशी अपेक्षा बाळगतो अशी प्रतिक्रिया हांडाळ यांनी व्यक्त केली, यवत माणकोबा वाडीतील समस्त ग्रामस्थांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना वृक्ष व गुलाब पुष्प भेट देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ७९९ देशी वृक्षांचे वृक्षवाटप करण्यात आले.या मध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, चिंच, आवळा, करंज, भेंडी, कांचन, गुलमोहर, बेहडा, पळस, उंबर, जांभुळ, सिसम, इलायती चिंच, अशा वेग वेगळ्या वृक्षांचा समावेश दिसून आला, हे वृक्ष लागवड करुन संवर्धन करणे हीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली ठरेल अशी प्रतिक्रिया महेश रुपनवर यांनी व्यक्त केली, या महावृक्षदानाचे सौजन्य द इकोफॅक्टरी फाउंडेशन पुणे आणि सीमा गुट्टे कॉंग्रेस महाराष्ट्र यांनी केले होते, या महावृक्षदान सोहळ्याचे आयोजन नाथदेवराई फाउंडेशनच्या वतीने दि ३१ मे २०२४ रोजी यवत माणकोबा वाडी ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी करण्यात आले होते, महावृक्षदान सोहळा कार्यक्रमाचे प्रस्ताविक फाउंडेशन सदस्य राहुल बिचकुले यांनी केले, या प्रसंगी यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर, कृषी पर्यवेक्षक मनोज मिसाळ, कृषी सहाय्यक विनायक जगताप, कृषी सहाय्यक पंढरीनाथ कुतवळ, यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सदानंद दोरगे, सीमा गुट्टे महाराष्ट्र कॉंग्रेस, संस्कृती अभ्यासक श्रीकांत हंडाळ, सिद्धनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष मारुती बिचकुले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते धुळा भिसे, ग्रामपंचायत सदस्य मल्हारी बिचकुले, रासप दौंड अध्यक्ष दादासाहेब भिसे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर खताळ, राजु लकडे, पत्रकार संतोष जगताप, फाउंडेशन सदस्य राहुल बिचकुले, दत्तात्रय पिंगळे, सुभाष बिचकुले, दादा भिसे, नटराज गायकवाड, प्रशांत पिंगळे, कैलास पिंगळे, राजु बिचकुले, माऊली खताळ, अमोल खताळ, मोहन बिचकुले, पोपट लकडे, बापू लकडे, विशाल खताळ, अविनाश लकडे, यवत माणकोबा वाडी येथील आदी मान्यवर समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.