खासदार सुप्रिया ताई सुळे यांचे यवतकरांनी केले जंगी स्वागत. शेतकऱ्यांच्या कांद्याला. दुधाला भाव मिळाला नाही. तर उपोषण करणार खासदार सुळे.

By : Polticalface Team ,07-06-2024

खासदार सुप्रिया ताई सुळे यांचे यवतकरांनी केले जंगी स्वागत. शेतकऱ्यांच्या कांद्याला. दुधाला भाव मिळाला नाही. तर उपोषण करणार खासदार सुळे. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०६ जून २०२४, बारामती लोकसभा मतदार संघातून दिड लाखा पेक्षा अधिक मताधिक्य मिळवून चौथ्या वेळा विजयी खासदार सुप्रिया ताई सुळे यांचे यवतकरांनी डि जे लावून फटाक्यांच्या धुमधडाक्यात केले जंगी स्वागत, दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे, लोकसभा निवडणूकी नंतर विजयी महोत्सव कार्यक्रम यवत येथे साजरा करण्यात आला. या वेळी यवत पंचक्रोशीतील अनेक गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार. पक्षातील नव्या फळीतील युवा तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, खासदार सुप्रिया ताई सुळे यांचे यवत येथे आगमन होताच युवकांनी मोठ्या जयघोषात स्वागत केले. राम कृष्ण हरी. वाजवली तुतारी, सर्वांनी एकच जल्लोष केला, खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी यवत येथील श्री काळ भैरवनाथाचे दर्शन घेऊन उपस्थित मतदारांना राम कृष्ण हरी म्हणताच वाजवली तुतारी असा जल्लोष करण्यात आला, खासदार सुप्रिया ताई सुळे यांचा यवतकरांच्या वतीने अँड प्रकाश सोळंकी यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर गावकऱ्यांनी देखील शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मित्र पक्ष संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साथ दिली अनेक युवा तरुण कार्यकर्त्यांना अडी अडचणींना सामोरं जावे लागले मोबाईल डिपीवर फोटो जरी दिसला तर धमकावले जात होते, अशा बिकट परस्थितीत तरुणांनी पुढाकार घेऊन जबाबदारीने कामगिरी बजावली आहे, आजी माजी राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला न जुमानता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करुन मतदान केले. हि निवडणुक राजकीय नेते पुढाऱ्यांच्या शिवाय तरुणांनी हाती घेऊन जिंकली आहे. यवत परीसरातील प्रत्येक गावातून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर खुटबाव गावातून देखील तुतारीला १३० मतांचं लीड मिळाले असल्याचे आप्पासाहेब पवार त्यांनी बोलताना सांगितले, रयत शेतकरी संघटनेचे नेते बापूसाहेब देशमुख, संघटनेचे संल्लागार बबनराव गायकवाड. काँग्रेसचे नेते अरविंद दोरगे, कट्टर समर्थक रमेश लडकत यांनीही मनोगत व्यक्त केले, यवत येथील मुस्लिम समाजाच्या वतीने हाजी मुबारक भाई शेख यांनी खासदार सुप्रिया ताई सुळे यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, सेवानिवृत्त कर्मचारी समितीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन चांदगुडे यांनी समितीच्या वतीने. खासदार सुप्रिया ताई सुळे. यांचा सत्कार करण्यात आला‌. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या पेन्शन वाढी बाबत खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देण्यात आले, यामध्ये प्रामुख्याने सेवानिवृत्त पेन्शन धारक गेली १० ते १२ वर्षापासून पेन्शन वाढी साठी सरकार दरबारी ऐलझरे घालत आहेत. मात्र सेवानिवृत्त पेन्शन धारकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. असे निवेदनात नमूद केले आहे. खासदार ताई आपण या संदर्भात लक्ष देऊन सेवानिवृत्त पेन्शन धारकांचा प्रश्न मार्गी लागावा या बाबत पुणे जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन चांदगुडे यांनी सांगितले. मी तुमचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहे. तुम्हाला लवकरात लवकर पेंन्शन वाढ व्हावी. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदारांनी दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील व यवत पंचक्रोशीतील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करत म्हणाल्या एक संच्च्या कार्यकर्ता आप्पासाहेबांना भांडुन म्हणतोय. मला भाषण करायचं. मला भाषण करायचं लडकत वाडी येथील कंट्टर समर्थक कार्यकर्ता रमेश लडकत याच्या बाबत त्या बोलत होत्या महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १० जागेवर आपण निवडूनका लढत होतो त्यापैकी ८ जिंकल्या आहेत. साताऱ्याची एक जागा गेली असल्याने नाराजी व्यक्त करत. म्हणाल्या आज पासून पुढील काळात दुष्काळाच्या आणि येणाऱ्या विधानसभेसाठी जोमाने काम सुरू करा असे आवाहन खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी यवत येथे बोलताना दिले. तसेच निवडणूक प्रचार दरम्यान सर्व म्हणायचे दौंड मध्ये काय होईल ? दौंड तालुक्यातील मतदार इतके हुशार आहेत की त्यांनी शेवट पर्यंत कळुच दिले नाही. कोणाला मतदान करणार. बुथवर मानुस देखील मिळेल की नाही. या बाबत अनेकांना शंका होती, ? सहा महिने झाले राज्यात दुष्काळाचे सावट आहे. या सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला योग्य हमी भाव दिला नाही तर मी देखील कार्यकत्यांसह उपोषणाला बसणार असा सरकारला इशारा दिला आहे, यवत परीसरातील कोणत्या गावातून किती लीड तुतारीला दिले हे प्रत्येक जण उठून सांगीतल्या शिवाय राहू शकला नाही, लडकत वाडी येथील कट्टर समर्थक कार्यकर्ता रमेश लडकत यांनी अचानक पुढे येऊन मुसंडी मारत मनोगत व्यक्त करायला सुरुवात केली. निवडणूक प्रचार दरम्यान दबाव असताना देखील मागे हाटलो नाही, तुतारीचा प्रचार केला.कमी लोकसंख्या असलेल्या लडकत वाडी गावातून १०० मतांचे लीड देऊन तुतारी वाजवली असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकी नंतर खासदार सुप्रिया ताई सुळे यांचा प्रथम सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन यवत येथे दि ०६ जून रोजी करण्यात आले होते. युवा तरुण कार्यकर्ते, मयुर दोरगे, शुभम दोरगे. दिपक दोरगे, गोट्या यादव. प्रवीण दादा दोरगे. सचिन दोरगे.सुधीर दोरगे पिंटु आढाव आप्पा घोराडे अभिजीत दोरगे अमोल दोरगे.समिर लोंढे गौरव तुमाले प्रकाश दोरगे दिपक तांबे आण्णा कोळपे लक्ष्मण कोळपे तुषार दोरगे, अशोक दोरगे. मोहसीन तांबोळी. आदी यवत पंचक्रोशीतील युवा तरुण कार्यकर्ते तसेच समस्त ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.