यवत येथे पुणे सोलापूर महामार्गावर. टू व्हिलर चालकाचा हेल्मेट मुळे वाचला जीव. अपघाता नंतर तरुण सुरक्षित.

By : Polticalface Team ,08-06-2024

यवत येथे पुणे सोलापूर महामार्गावर. टू व्हिलर चालकाचा हेल्मेट मुळे वाचला जीव. अपघाता नंतर तरुण सुरक्षित.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.


दौंड ता ०८ जुन २०२४ पुणे सोलापूर महामार्गावरील यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील बस स्टॅन्ड. हायवे रोडवर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने यवत परीसरातील नागरिकांच्या ‌जीवितास धोकादायक प्रसंग कधी येईल हे सांगता येत नाही, मात्र आज या ठिकाणी दुर्घटना टळली आहे. एका अनोळखी टु व्हिलर चालकाची मोटर सायकल लक्झरी बसच्या दोन्ही चाकाच्या मध्ये अडकली होती, या प्रसंगी टु व्हिलर चालकाने डोक्यात हेल्मेट घातले होते  ल्यामुळे तो तरुण थोडक्यात बचावला आहे, हेल्मेट रस्त्यावर आदळून खराब झाले आहे. हेल्मेट नसते तर डोक्याला मार लागला असता, परंतु पायाला हाताला किरकोळ दुखापत होऊन गुडघ्यावर किरकोळ खरचटले आहे. मुक्कामार लागला आहे. कदाचित हेल्मेट नसते तर टु व्हिलर चालकाची काय परस्थिती झाली असती हे सांगणे  कठीण झाले असते, मोटर सायकल लक्झरीच्या मागील चाका समोर अडकुण १० ते १५ फुट अंतरा पर्यंत फरफटत पुढे चालली होती. या प्रसंगी बस स्टॉन्ड वरील नागरिकांन मध्ये एकच खळबळ उडाली. धावपळ सुरू झाली.  कोण आहे. गेला का ? की काय.  कुठला आहे,  किती लोकं आहेत,  जास्त लागलं नाही ना ?  असे अनेक प्रश्न लोक एकमेकांना विचारत होते.  तो पर्यंत काही ज्येष्ठांनी आणि तरुणांनी लक्झरी बस चालकावर चांगलाच हात धुऊन घेतला,  तर काही लोकांनी सावरण्याचा प्रयत्न करत, टु व्हिलर चालकाची विचार पुस करत धीर देण्याचा प्रयत्न करत घाबरू नकोस काही झाले नाही. वाहतूक कोंडी झाली होती. यवत पोलीस कर्मचारी उमेश गायकवाड हे घटनास्थळी पोहोचले होते, सोलापूर बाजुकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी वाढत चालली होती, बस रोडवर मध्ये ठिकाणी होती. सर्व तरुण नागरिकांनी एक जुटीने हात लावून लक्झरी बस उचलून. बस खाली अडकलेली मोटर सायकल बाहेर काढली. आणि बस बाजूला घेण्यास सांगितले. पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक पोलीस कर्मचारी उमेश गायकवाड. यांनी तत्काळ मोकळी करून, सदर अपघातात कोणास दुखापत झाली आहे काय ? या बाबत चौकशी केली असता, या प्रसंगी टु व्हिलर मोटर सायकल चालकाने हेल्मेट घातले असल्याने त्याचा जीव वाचला. मोटर सायकल वरील चालक डिवायडर सिमेंट कट्ट्यावर पडल्यामुळे  हात पाय जीव थोडक्यात बचावला असल्याचे उपस्थित तरुणांनी व जेष्ठ नागरिकांनी सांगितले. 


हि घटना दि ०८ जुन रोजी दुपार दरम्यान यवत गावातील बस स्टॅन्ड येथे घडली असून, सदर मोटर सायकल चालकास खाजगी रुग्णालयात औषध उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगितले, सदर मोटर सायकलची तुटफुट झाल्याने मोठे नुकसान झाले असून खाजगी वाहणात टाकून. पुणे बाजुला नेण्यात आली असल्याचे दिसून आले, मोटर सायकल चालक हा जुनी सांगवी पुणे येथील असुन सुरक्षित असल्याचे सांगत म्हणाला. फक्त हेल्मेट डोक्यात असल्यामुळे माझा जीव वाचला आहे असे त्याने सांगितले, 

 

यवत बस स्टॅन्ड परिसरात नेहमी अपघात होत असल्याने. या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची अनेक वर्षांपासून मागणी केली आहे. या संदर्भात राजकीय क्षेत्रातील आजी माजी आमदार पदाधिकारी व जेष्ठ नेते कार्यकर्ते अनेक वर्षा पासून प्रयत्न करीत आहेत. परंतु यवत येथे उड्डाणपूल होण्याचे स्वप्न कधी साकार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु या संदर्भात अधिक नाराजी व्यक्त केली जात असुन. समस्त ग्रामस्थ हातबल झाले आहेत. प्रत्येक वेळी या ठिकाणी अपघात झाला की उड्डाणपूल झाला पाहिजे अशी सर्वत्र चर्चा केली जाते. गेली १५ वर्ष झाली हीच परिस्थिती पाहिला मिळत आहे. दौंड तालुक्यातील मौजे यवत येथे  उड्डाणपूल होण्यास अजून किती दिवस लागतील हे सांगता येत नसल्याने नागरिकांनमध्ये चर्चा केली जात असुन शोकांतिका व्यक्त केली जात आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.