दौंड तालुक्यातील २० हजार पेक्षा अधिक मराठा कुणबी नोंदी सापडल्या असून. अद्याप तालुक्यातील नागरीक यादीच्या प्रत्येक्षित,

By : Polticalface Team ,11-06-2024

दौंड तालुक्यातील २० हजार पेक्षा अधिक मराठा कुणबी नोंदी सापडल्या असून. अद्याप तालुक्यातील नागरीक यादीच्या प्रत्येक्षित, दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १० जून २०२४. दौंड तालुक्यातील २० हजारांहून अधिक कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. शासनाच्या आदेशा नुसार सदर कुणबी नोंदी सर्व प्रकारच्या दस्तऐवजांमधून शोधण्याचे निर्देश देण्यात आले होते. या अनुषंगाने दौंड तालुक्यातील विविध १२ शासकीय कार्यालयातुन उपलब्ध झालेल्या कुणबी नोंद यादी प्रतेक ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात नोटीस प्रसिद्ध करून संबंधित मराठा कुणबी समाजातील नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशाने दौंड तहसीलदार कार्यालयात दि १० जून रोजी निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदन नायब तहसीलदार बोरकर यांनी स्विकारला आहे.या वेळी दौंड तालुक्यातील मराठा कुणबी समाजाच्या वतीने. वसंतराव साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जय शिवसंग्राम. राजाभाऊ कदम, तात्यासाहेब ताम्हाणे, मंगेश फडके, संजय शिंदे. कैलास शितोळे. आप्पासाहेब दोरगे. अमित पवार. पोपट गायकवाड. संजय पहाणे. पांडुरंग कुतवळ. सचिन जगताप. मच्छिंद्र काळभोर. वसीम शेख, मयूर सूर्यवंशी.अंबादास काळे, छबुदादा ढवळे. आणि सचिन बागल आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या बाबत अधिक माहिती अशी की दौंड तालुक्यात जानेवारी २०२४ अखेर २० हजारांहून अधिक कुणबी नोंदी या गाव नमुना नं.१४ जन्म- मृत्यु रजिस्टार मधुन. तसेच १२ विविध शासकीय विभागातून शोधल्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कुणबी नोंदीच्या एकुण तपशीला पैकी काही गावांची यादी दिलेली आहे. मात्र बाकी ११ दस्तऐवजांमध्ये शोधलेल्या कुणबी नोंदीचा तपशील अघ्याप सामाविष्ट नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, नुकताच १० वी १२ वी चा निकाल जाहीर झाला असून या मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी मुला-मुलींना पुढील उच्च शिक्षणासाठी व प्रवेश घेण्या बाबत. कुणबी जातीचे प्रमाणपत्राची आवश्यकता भासत असल्याने मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र या बाबत महसुली पुरावा मिळावा म्हणून रेकॉर्ड विभागात येलझरे घालण्याची वेळ आली आहे. दौंड तहसील महसूल कार्यालयाने शोधलेल्या कुणबी नोंदीची यादी गावनिहाय ग्रामपंचायत किंवा तलाठी मंडल कार्यालयामध्ये अद्यापही कुणबी नोंद यादी प्रसिद्ध करण्यात आली नसल्याने. यादी मध्ये कोणाची नावे आहेत याची माहीती नागीरकांना समजुन येत नाही. तसेच अनेकांची कुणबी नोंद असुनही महसुली पुरावा काढण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक शासनाच्या आदेशानुसार ज्याच्या कुणबी नोंदी आढळुन आलेल्या आहेत. अशा नागरिकांच्या निदर्शनास आणुन देण्यासाठी. तालुक्यातील सर्व गावनिहाय गाव कामगार तलाठी यांच्या मार्फत नोटीस स्वरुपात प्रसिद्ध करून. संकेत स्थळावर प्रसिद्ध करणे. जेणे करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी नोंदीचा पुरावा म्हणुन सादर करता येतील. अशा शासनाच्या सुचना असुनही तलाठी यांच्या मार्फत गावस्तरावर उपलब्ध झालेल्या कुणबी नोंदी प्रसिद्ध करण्यात आल्या नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्याचे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, ज्या व्यक्तिंनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले आहेत त्या व्यक्तिंना संकेतस्थळावर आढळलेल्या नोंदीचे अभिलेख रेकॉर्ड विभाग कार्यालयातील आवश्यक प्रमाणित कुणबी नोंद महसुली पुरावा. मिळण्यासाठी. विद्यार्थी व नागरिकांची जाणीवपुर्वक आर्थिक पिळवणुक करुन ना हक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हि मोठी शोकांतिका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सदर दौंड तालुक्यातील उपलब्ध कुणबी नोंद यादी गावनिहाय ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात प्रसिध्द करण्यात यावी अशी मागणी समाजाच्या वतीने दौंड तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.