व्यंकटेश मल्टीस्टेट संस्था १२ वर्ष तपपूर्ती कार्यक्रम. यवत शाखेत मोठ्या उत्साहात साजरा.
By : Polticalface Team ,13-06-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता १३ जून २०२४ व्यंकटेश मल्टी स्टेट संस्थेचा १२ व्या तपपूर्ती कार्यक्रम यवत शाखेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील खातेदार उद्योग व्यवसायिक तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. व्यंकटेश मल्टीस्टेट संस्था. यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील शाखेचे व्यवस्थापक मयुर कुंभार यांनी संस्थेच्या १२ वर्षातील तपपूर्तीच्या कार्याची माहिती दिली. संस्थेने आता पर्यंत व्यवसाय कर्ज, शेतकरी कर्ज, महिला बचत गट कर्ज, सोने तारण कर्ज अशा अनेक प्रकारचे विविध कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या असून व्यंकटेश मल्टिस्टेटने आधुनिक बँकिंग सेवा देऊन सामाजिक बांधिलकी नेहमी जोपासली आहे. तसेच व्यंकटेश फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी बैंक उपक्रम, अन्नछत्रालयाच्या माध्यमातून सभासदांच्या रूग्ण नातेवाईकांना जेवणाचा डबा देणे, शेतकरी प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे पालकत्वाची जबाबदारी गुणवंत विद्यार्थी सत्कार. लोक कलाकारांचा गौरव, गोशाळेच्या माध्यमातून गोपालन व गोसंवर्धन असे अनेक उपक्रम व्यंकटेश मल्टीस्टेट संस्थेने राबविले आहेत. १२ वर्षांच्या या यशस्वी वाटचालीत संस्थेच्या शिरपेचात अनेक पुरस्कार रूपी मानाचे तुरे रोवले गेले आहेत.फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को ऑप. सोसायटी पुणे तर्फे बेस्ट चेअरमन अवार्ड, नवभारत ग्रुपचा इमरजिंग मल्टीस्टेट ऑफ महाराष्ट्र अवार्ड, माय एफ एम रेडिओ तर्फे उत्कृष्ट मल्टीस्टेट पुरस्कार, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचा सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार, दोन वेळेस बँको ब्लु रिबनचा सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार संस्थेला मिळाले असल्याचे यवत शाखा व्यवस्थापक मयुर कुंभार त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले व्यंकटेश संस्था फाउंडेशनला. रोटरी क्लब तर्फे दिला जाणारा व्होकेशन एक्सलन्स अवार्ड. भविष्यात सेल्फ किऑस्क मॉडेल तयार करताना डिजीटल कर्ज वाटप, पेपर लेस कामकाज, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नविन शाखा निर्माण करून, युवकांना उद्योग व्यवसाय स्वयंम रोजगारासाठी प्रोत्साहन पाठबळ देण्यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच शेतकरी व लहान उद्योग व्यवसायिकांना आर्थिक सक्षम करण्याचे ध्येय असुन. संस्थेतील ठेवीदार आणि कर्जदारांना समान समजून, कर्जदारास त्याच्या उद्योग व्यवसायात स्थैर्य मिळावे यासाठी वेळोवेळी आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्श केले जाते. त्यामुळे त्याचे कर्जफेडीचे प्रमाण खूपच सुलभ व समाधानकारक असून व्यावसायिकांचे मनोबल वाढवून त्यांच्या आवश्यक गरजा भरुन निघण्यासाठी अधिक सोईस्कर ठरते. त्यामुळे नाविण्यपूर्ण विचारांनी व्यंकटेश मल्टीस्टेट संस्थेला इतरांपेक्षा विगळी प्रतिमा निर्माण झाली असून चालना मिळाली असल्याने अभिमान वाटतो. अशी प्रतिक्रिया यवत शाखा व्यवस्थापक मयुर कुंभार यांनी व्यक्त केली. या प्रसंगी उपस्थित यवत पंचक्रोशीतील सर्व खातेदार शेतकऱ्यांचे लक्ष वेधले होते. व्यंकटेश शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच गुलाब पुष्प व व्यंकटेश मल्टीस्टेट संस्थेला १२ वर्ष पूर्ण झाले असून पुढील वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने गणेश दोरगे, डॉ तावरे. जाधव सर. यवत येथील उद्योजक रविंद्र भैया शहा. अनिल गायकवाड. रमेश आप्पा दोरगे. रयत शेतकरी संघटनेचे संल्लागार. माजी पोलीस उपनिरीक्षक बबनराव गायकवाड. डॉ संतोष बडेकर. डॉ विजय कुल. रविंद्र कोळपे.अमोल फणसे. पुरंदर नागरी संस्थेचे शाखा व्यवस्थापक शितोळे. वाघले साहेब. तात्यासाहेब दोरगे, नारायण कदम. आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यंकटेश संस्था यवत शाखेतील सर्व कर्मचारी स्टाफचे उपस्थितीतांनी मोठ्या उत्साहात कौतुक केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.