जय शिवसंग्राम पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे यांच्या आमरण उपोषणाला स्थगिती. दौंड तहसीलदार,मा शेलार यांचे लेखी आश्वासन. कुणबी बांधवांच्या सर्व मागण्या मान्य.
By : Polticalface Team ,15-06-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १५ जून २०२४ दौंड जय शिवसंग्राम पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे यांनी निवेदनाद्वारे दौंड तहसील प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने दि १४ जून रोजी सकाळी ११ वा जे सुमारास तहसीलदार कार्यालय समोर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला असल्याने दौंड तहसीलदार मा अरुण शेलार यांनी तत्काळ दखल घेऊन दौंड तालुक्यातील उपलब्ध कुणबी नोंद यादी प्रसिद्ध करण्या बाबत व इतर संबंधित सर्व मागण्या बाबत सकारात्मक भूमिका घेऊन मार्ग मोकळा केला आहे. दौंड तहसीलदार यांनी उपोषणकर्ते वसंतराव साळुंखे व कुणबी मराठा समाज बांधवांशी चर्चा करून. सर्व मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिले आहे. जय शिवसंग्राम पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन. तालुक्यातील कुणबी नोंद असलेल्या प्रतेक व्यक्तीला माहिती मिळावी. तसेच कुणबी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे अदी विषयावर आमरण उपोषणाला बसले होते.
दौंड तालुक्यात २० हजारच्या आसपास कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्याची यादी ज्या त्या गावच्या तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करावी, कुणबी दाखले काढण्यासाठी येत असलेल्या जाचक अटी कमी कराव्यात ,त्यासाठी येणाऱ्या अडचणी मध्ये सुलभता आणावी, कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी तालुक्यातील सर्व मंगल कार्यालयात आठवड्यातून एक दिवस कॅम्प आयोजित करावा. कुणबी दाखला मिळणेसाठी अर्जदाराने अर्ज दिल्या नंतर त्याच्या कागदपत्रांची पडताळणी तहसील कार्यालयाने त्यांचे संकेत स्थळावर जी कुणबी कागदपत्रांची यादी प्रसिध्द केलेली आहे. त्यावरून पडताळणी करावी. व आठ दिवसात अर्जदारास कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. इतर वेगळ्या कागदपत्रांची मागणी करू नये, कुणबी दाखले देण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा, गृह चौकशी व वंशावळ जुळवण्यासाठी नेमलेल्या समितीची मुदत एक वर्ष ठेवावी. या मागण्यांसाठी जय शिवसंग्राम पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे यांनी दौंड तहसीलदार कार्यालय समोर उपोषण सुरू केले होते,
दौंड तहसीलदार मा.अरुण शेलार यांनी उपोषण स्थळी भेट देऊन संवाद साधला. उपोषणकर्ते वसंतराव साळुंखे आणि उपस्थित मराठा समाज बांधवांशी चर्चा करून. सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
दौंड तालुक्यातील ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्या व्यक्तीच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गाव कामगार तलाठी यांचे मार्फत ग्राम स्तरावर मोहीम राबवून तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात सर्व कुणबी नोंद याद्या आजच प्रसिद्ध करण्यात येतील,
तालुक्यातील प्रत्येक मंडल अधिकारी कार्यालयात आठवड्यातील दर सोमवार दिवशी कुणबी प्रमाणपत्राचे वाटप शिबीर. किमान तीन महिने घेण्यात येईल, तसेच कुणबी दाखले देण्यासाठी राज्य सरकारने दि १८ जानेवारी २०२४ व ०४ मार्च २०२४ च्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल,
मोडी भाषेतील सर्व अभिलेख मराठी भाषेत रुपांतर करुन सार्वजनिक संकेत स्थळावर कुणबी नोंद यादी प्रसिध्द करण्यात येतील, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी. दौड तहसिल कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येईल,
वंशावळ जुळवण्यासाठी गठीत केलेल्या समतीचे कामकाज वर्षभर सुरू ठेवण्यात येईल. असे लेखी आश्वासन दौंड तहसीलदार मा अरुण शेलार यांनी उपोषणकर्ते वसंतराव साळुंखे व कुणबी मराठा समाज बांधवांना देऊन सर्व मागण्या मान्य केल्याने जय शिवसंग्राम पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे यांनी सुरू असलेले अन्न पाणी त्याग आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी दौंड तहसीलदार मा अरुण शेलार. नायब तहसिलदार ममता भंडारी मॅडम, अविनाश गाठे, महेंद्र देसाई, वैभव कदम,आकाश गणेशकर, प्रमोद पवार, अंबादास काळे राजाभाऊ कदम, अमित पवार, पंकज नंदखिले, अजय जाधव, लक्ष्मण तात्या दिवेकर, श्रीराम यादव, संजय शिंदे, गोरख शितोळे, अमोल भोईटे, निरंजन ढमाले, स्वप्नील घोगरे, तुकाराम वाबळे, विशाल धुमाळ, कानिफ महाराज सूर्यवंशी. कैलास शितोळे, आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.