चौफुला बोरमलनाथ येथे. तिसरे राज्यस्तरीय भीमथडी साहित्य संमेलन संपन्न. राम ही बहुजनांची संस्कृती. श्रीराम नव्हे. इतिहास संशोधक संजय सोनवणी.

By : Polticalface Team ,18-06-2024

चौफुला बोरमलनाथ येथे. तिसरे राज्यस्तरीय भीमथडी साहित्य संमेलन संपन्न. राम ही बहुजनांची संस्कृती. श्रीराम नव्हे. इतिहास संशोधक संजय सोनवणी. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता.१८ जून २०२४. प्राचीन काळापासून मातृसत्ताक संस्कृतीमध्ये महिलांना मानाचे स्थान होते. राम राम घालून माणुसकी जिवंत ठेवणारी राम ही बहुजनांची संस्कृती आहे. श्रीराम नाही, असे परखड मत इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी बोलताना व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने चौफुला ता. दौंड जिल्हा पुणे. बोरमलनाथ मंदिर येथे तिसऱ्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमेलनाचे उदघाटन स्वागताध्यक्ष दिग्विजय जेधे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी संमेलनाध्यक्ष पदावरून संजय सोनवणी बोलत होते. राज्यभरातून आलेले साहित्यिक, लेखक, कवि,कलावंत यांनी स्वर्गीय डी.के.खळदकर साहित्य नगरीत आपले साहित्य सर्वासमोर सादर केले व याचा रसिकवर्गाने मनसूक्तपणे आनंद लुटला. या प्रसंगी संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, जलदगती न्यायालय मुंबई चे न्यायाधीश वसंत पाटील, लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, जयप्रकाश वाघमारे, रेखा काळे, अभिनेत्री गौरी रत्नपारखी, सुषमा काळे, अभिनेता सागर शेलार, तानाजी केकाण, नितिन भागवत, भाऊसाहेब फडके, विश्वास माने, मोहन जाधव, सागर फडके, वसंत साळुंखे, संजय मेढे, तेजस टेंगले,दत्तात्रय डाडर,बाळासाहेब काळे, भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष संजय सोनवणी, उपाध्यक्ष दीपक पवार, राजाभाऊ जगताप, बाळासाहेब मुळीक,विनायक कांबळे, जगदीप वनशिव, रविंद्र खोरकर, रामभाऊ नातू प्रामुख्याने उपस्थित होते. भीमथडी साहित्य संमेलनाची सुरवात श्री बोरमलनाथांना भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक व ग्रंथदिंडी काढून करण्यात आला. ग्रंथदिंडीत कवी, लेखकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन उपस्थिती दर्शविली होती.संजय सोनवणी म्हणाले, बहुजन समाजाने रामायण, महाभारत काळाच्या अगोदर पासून मानवतावादी मुल्ये जपली आहेत, पुरुषोत्तम राम लोकांनी मनोभावे स्वीकारला. नमस्कार घालताना लोक राम राम म्हणायचे ही बहुजनांची संस्कृती आहे, यातून माणुसकी, समता, बंधुभाव जोपासना केली जाते. उत्तर भारतात आक्रमण केलेल्या आर्यांनी स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी मूळ निवासी भारतीय संस्कृती मोडीत काढताना त्यात बदल केले. पण बहुजनांनी त्याचा कधी स्वीकार केला नाही. शेवटी त्यांना बहुजन, देवता व महापुरुषांचा आधार घ्यावा लागला. मानवी मुल्य जोपासने ही रामाची संस्कृती आहे. तर धर्म आणि जातीमध्ये दुरावा करणे ही श्रीरामाची संस्कृती आहे. प्राचीन काळापासून समाजात महिला ही प्रमुख होती. मातृसत्ताक संस्कृती मोडीत काढून पुरुष सत्ताक संस्कृती वैदिकांनी बिंबविण्याचे काम केले. इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी सांगितले. दिग्विजय जेधे म्हणाले, शिवफुलेशाहु महराजांचा विचार समाजात रुजविण्याचा देशभक्त केशवराव जेधे व सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांनी प्रयत्न केला. समाजाला एकसंध ठेवणारा विचार साहित्यिकांनी शब्दबद्ध करण्याची गरज आहे.भीमथडी साहित्य संमेलनाची ज्योत कायम प्रज्वलित राहणे गरजेचे आहे. 

भीमथडी चा इतिहास प्रेरणा देणारा आहे. प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना दशरथ यादव म्हणाले, ग्रामीण भागातील साहित्य अजून ही पुस्तकात हवे तेवढे शब्द बद्ध झाले नाही. राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत ही बाब अतिशय गंभीर असून. समाज समाधानी नसेल तर भौतिक प्रगती करून. जीवाचा उपयोग होणार नाही. साहित्याने समाज सक्षम होऊन वैचारिक क्रांती झाल्या शिवाय राहणार नाही. मात्र प्राचीन साहित्याचा विसर पडला आहे. साहित्याने क्रांती होते. प्रेरणा मिळते. संमेलनामुळे भीमथडी चा प्रेरणादायी इतिहासातला उजाळा मिळेल. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात परिपूर्ण असलेल्या मान्यवरांना. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते. पुरस्कार रुपी. शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित साहित्य वाचक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मोबाईल टीव्ही च्या अहरी न जाता युवा तरुणांनी वाचक बनले पाहिजे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विद्रोही अभंग वाणीचा सखोल आध्यात्मिक परीभाषा अवगत होणे काळाची गरज आहे. अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि पवार यांनी केले व आभार दिपक पवार यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.