रयत शेतकरी संघटनेच्या वतीने दौंड तहसीलदार यांना दिले निवेदन. गाव कामगार तलाठी सतत गैरहजर..राहु गावातील किराणा दुकानं बंद ठेवण्याचे नेमके कारण काय ? संल्लागार बबनराव गायकवाड.
By : Polticalface Team ,20-06-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २० जून २०२४. दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरात टाकळी भिमा व पाटेठाण या ठिकाणचे गाव कामगार तलाठी सतत गैरहजर राहत असल्याने नागरिक कार्यालयात येलझरे घालून हैराण झाले आहेत. त्यामुळे दौंड तहसीलदार साहेब गावामध्ये त्वरित तलाठी उपलब्ध करून शेतकरी नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी तलाठी यांची तत्काळ सोय करण्यात यावी. अशी निवेदनाद्वारे दौंड तहसीलदार यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.
राहू गावात दर शनिवारी किराणा दुकानं बंद ठेवली जातात, त्यामुळे मजुर कामगार गोरगरीब नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी किराणा दुकान शोध मोहीम राबवली जात आहे. हातावरती पोट असलेले मंजुरी कामगार इकडे तिकडे फिरत आहेत. त्यांना राहु गावात किराणा उपलब्ध व्हावा, या अनुषंगाने व्यापारी किराणा दुकानदार यांनी एकाच दिवशी सर्व दुकानं बंद ठेवू नये. अशी मागणी नागरिकांकडून केली जात असल्याने महाराष्ट्र राज्याचे संस्थापक व अध्यक्ष श्री बापूसाहेब तथा रवी प्रकाश देशमुख रयत शेतकरी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने दौंड नायब तहसीलदार मा.सौ ममता भंडारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले आहे. या अनुषंगाने निवेदनाद्वारे केलेल्या सर्व मागण्या त्वरित मार्गी लावू असे आश्वासन नायब तहसीलदार मा सौ भंडारी यांनी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिले आहे.
या वेळी तहसील कार्यालय व ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या बाबत खलबतं करण्यात आली. विविध प्रश्नांवर चर्चा केली असता संबंधित असलेल्या शेतकरी व नागरिकांच्या समस्या सोडविण्या बाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी रयत शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कायदे सल्लागार अध्यक्ष बबनराव गायकवाड. महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अंकुशराव हंबीर. दौंड तालुका महिला आघाडी सरचिटणीस माधुरीताई वडघुले. वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष दौंड तालुका बापूसाहेब जगताप. दौंड तालुक्यातील रयत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :