जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे. दौंड तालुक्यात आगमन होण्यापूर्वीची तयारी. आमदार राहुल कुल. प्रशासनासह सज्ज

By : Polticalface Team ,21-06-2024

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे. दौंड तालुक्यात आगमन होण्यापूर्वीची तयारी. आमदार राहुल कुल. प्रशासनासह सज्ज दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २१ जून २०२४. देहु आळंदी नगरीतुन माऊली ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दि २८ जून रोजी प्रस्थान होत असुन दौंड तालुक्यात दि ०३ जुलै रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होत आहे. या अनुषंगाने दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी पालखी सोहळ्याचे मौजे यवत आणि वरवंड या ठिकाणी मुक्काम असल्याने दौंड तालुका प्रशासनासह गाव भेट दिली. या वेळी शासकीय अधिकारी यांना विशेष सुचना दिल्या आहेत. या प्रसंगी जिल्हा उपअधिकारी मिनाज मुल्ला. दौंड तहसिलदार अरुण शेलार. दौंड पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांत काळे. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख. प्रामुख्याने उपस्थित होते. यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे सर्व विभाग प्रशासन अधिकारी. समस्त ग्रामस्थांची त्यांनी भेट घेतली. या वेळी यवत येथील समस्त ग्रामस्थांनी पालखी सोहळ्यात सर्व सुख सुविधा उपलब्ध व्हाव्यात या संदर्भात काही महत्त्वाच्या सुचना केल्या असल्याने. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन. दौंड तालुक्यात होण्यापूर्वी प्रशासन सज्ज झाले असुन. पालखी सोहळ्यातील वारकरी जनसमुदाय मोठ्या संख्येने पंढरी ची वारी करीत असल्याने सर्व बाबी लक्षात घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. मौजे यवत येथे पालखी सोहळा दि.०३ जुलै रोजी मुंक्कामी येत आहे. तर दि.०४ जुलै रोजी वरवंड येथे मुक्काम होणार असल्याने आमदार अँड राहुल कुल यांच्यासह तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी ग्रामस्थ यांनी यवत येथील काळभैरवनाथ मंदिर तसेच वरवंड येथील विठ्ठल मंदिर येथे बैठक घेऊन पालखी सोहळा पूर्व तयारी बाबत विविध विषयांवर संबंधित विभागातील पदाधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. या वेळी यवत व वरवंड येथे वारकरी लोकांची व्यवस्था होण्या बाबत. ग्रामस्थांनी असलेल्या विविध अडी अडचणी सुधारण्यासाठी सुचना दिल्या आहेत. या अनुषंगाने पालखी मार्गावरील अनावश्यक झाडे - झुडपे काढून टाकावीत, सेवा मार्गावरील खड्डे बुजवून भरून घ्यावेत, महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच नॅशनल हायवे विभाग प्रशासनाने यवत येथील भुलेश्वर फाटा ते मानकोबा फाटा. महामार्गाच्या मध्ये ठिकाणी स्टेट लाईटची व्यवस्था करण्यात यावी अशी प्रामुख्याने मागणी नागरिकांनी केली आहे. नॅशनल हायवे प्रशासनाने यवत येथील महामार्गाच्या दोन्ही बाजूला लोखंडी बंदिस्त ब्रॅकेट लावून एका बाजूला भुयारी मार्ग केल्याने नागरिकांची गैरसोय केली आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. रात्रीच्या वेळी स्टेट लाईट आवश्यक आहे. महामार्गाच्या मध्य ठिकाणी स्टेट लाईट लावण्यात यावी. आमदार अँड राहुल कुल यांच्याकडे यवत ग्रामस्थांनी मागणी केली असल्याने. संबंधित नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी रोहन जगताप यांना आमदार राहुल कुल यांनी विशेष सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभागाने व पाणी पुरवठा विभागाने यंत्रणा तैनात ठेवावी, पंचायत समिती विभागाने फिरते शौचालयाची व्यवस्था करावी, आरोग्य विभागाने अतिदक्षता विभागात तत्काळ बेड, रुग्णवाहिका,आरोग्य तपासणी केंद्र व्यवस्था करावी, स्थानिक ग्रामपंचायतीने स्वच्छतागृह पालखी तळाची स्वच्छता व आवश्यक ठिकाणी मुरमीकरण करून घ्यावे, सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, वनविभागाने वृक्षारोपणाचे काम हाती घ्यावे, पथदिव्यांची सोय करत आपत्कालीन कक्ष उभारावा, यवत पोलीस प्रशासनातील पोलिसांनी दक्षता घेऊन पालखी वारीतील चोरीचे प्रकार घडू नये या दृष्टीने बंदोबस्त ठेवण्यात यावा. तसेच महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. अशा अनेक सूचना आमदार अँड.राहुल कुल यांनी संबंधित प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या वेळी प्रांताधिकारी श्री.मिनाज मुल्ला, तहसीलदार श्री.अरुण शेलार, यवत पोलीस निरीक्षक श्री.नारायण देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. हरीश्चंद्र माळशिकारे, श्री.मयूर सोनवणे, गटविकास अधिकारी श्री. प्रशांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी श्रीम.उज्वला जाधव, पंचायत समितीचे उपअभियंता श्री.दत्तात्रय पठारे, भीमा पाटसचे उपाध्यक्ष श्री.नामदेव बारवकर, वरवंड चे माजी सरपंच श्री.गोरख दिवेकर, यवत गावचे सरपंच श्री.समीर दोरगे, ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे. माजी उपसरपंच नाथा आबा दोरगे. जेष्ठ नेते बाळासाहेब लाटकर. हभप नाना महाराज दोरगे. सदस्य इब्राहिम तांबोळी. बाजार समितीचे संचालक श्री.अशोक फरगडे, आदी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष