यवत स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योग साधनेचे धडे. निरोगी जीवन जगण्यासाठी योग साधना आवश्यक. उपसरपंच सुभाष यादव यांचा विध्यार्थ्यांना संदेश.
By : Polticalface Team ,22-06-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता २१ जून २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे. यवत स्टेशन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २१ जून. योग दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तात्रय कैरे. हे विराजमान होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून यवत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष यादव प्रामुख्याने उपस्थित होते. या योग दिनाच्या निमित्ताने बोलताना ते म्हणाले. निरोगी जीवन जगण्यासाठी लहान पणापासून योग साधना आणि व्यायामाची सवय लावा. त्यामुळे शरीर आणि निरागस मन प्रसन्न झाल्या शिवाय राहणार नाही. असा उपदेश यवत ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री सुभाष बापू यादव यांनी उपस्थित शिक्षक पालक आणि विद्यार्थी मुला मुलींना दिला.
यवत स्टेशन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आयोजित केलेल्या आंतर राष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांसाठी नवीन शौचालय बांधकाम, संगणक संच, बेंचेस व इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी यवत स्टेशन केंद्राचे केंद्र प्रमुख श्री प्रणय कुमार पवार. यांनी योगासनांचे महत्व तसेच दररोज योगसाधना सराव करण्याचे आवाहन करून विद्यार्थी आणि पालकांना
पटवून दिले.
या प्रसंगी श्री रामहरी लावंड, श्री अनिल हुंबे व श्री अंकुश चौधरी यांनी विविध आसने व प्राणायाम साधनेचे प्रात्यक्षिके प्रकार विध्यार्थ्यांना दाखवली व विदयार्थ्यांकडून करून घेतली. मुख्याध्यापिका रायकर मॅडम बोलताना म्हणाल्या इंग्रजी माध्यमातून आपल्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हळू हळू वाढत असून ही बाब निश्चित अभिमानास्पद आहे. या प्रसंगी शाळेतील शिक्षिका संगीता टिळेकर, संगीता वाळके, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सौ दीपाली थोरात, पत्रकार श्री सतीश कुमार कोकरे, सामाजिक कार्यकर्ते श्री युवराज मेहता, श्री अजय देशमुख तसेच यवत स्टेशन पंचक्रोशीतील महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :