यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सहजपुर फाटा येथे पंढरपूर मुंबई एस्टी बस झाडावर आदळून भिषण अपघात. चालकासह. २५ ते ३० प्रवाशी गंभीर जखमी.
By : Polticalface Team ,23-06-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २३ जून २०२४ रोजी सोलापूर महामार्गावरील पुणे बाजुला जात असलेल्या पंढरपूर मुंबई एस्टी बस क्रमांक. एम एच ४० एन ९५१९ या बसचा भिषण अपघात झाला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की सोलापूर कडून. पुणे बाजुकडे जात असलेल्या एस्टी बसचा यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर फाटा परिसरात भिषण अपघात झाला. एस्टी बसला पाठीमागून एका वाहन चालकाने जोरदार धडक दिल्याने.
पुढे चाललेल्या पंढरपूर मुंबई एस्टी बस चालकाचा समतोल सुटल्याने महामार्गावरील बाजुच्या झाडाला एस्टी बस धडकुन गंभीर अपघात झाला. पंढरपूर मुंबई. एस्टी बस क्रमांक एम एच ४० एन ९५१९ या मधिल चालका सह २५ ते ३० प्रवाशी किरकोळ दुखापत व गंभिर जखमी झाले असल्याने. स्थानिक नागरिकांनी तत्काळ यवत पोलीस स्टेशन व रुग्णवाहिकांना संपर्क साधला असता. काही वेळातच पाच रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या. त्यामुळे सर्व जखमी प्रवाशींना उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात औषध उपचारासाठी रवाना करण्यात आले या प्रसंगी यवत पोलिस स्टेशन चे हवालदार स्वप्निल लोखंडे. तसेच प्रशांत ननावरे यांनी घटनास्थळी पोहोचले होते. अपघाचे अनुषंगाने चौकशी करून जखमी प्रवाशांना दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला असुन यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हवालदार स्वप्निल लोखंडे करीत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
पुणे सोलापूर महामार्गावरील एस्टी सेवा परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांचे अपघातात वाढ झाली असल्याचे दिसून येत असुन महामार्गावर अचानक लाल परी बंद पडल्याचे पाहवयास मिळत आहे. महाराष्ट्र राज्य एस्टी सेवा परिवहन महामंडळाच्या बस बैलगाडी व खुळखुळा प्रमाणे अवस्था झाली असल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जात असुन. ज्येष्ठ नागरिकांच्या व महिला 50 टक्के सवलतीत प्रवास असल्याने दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनमध्ये चर्चा केली जात आहे. या बाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी या बाबत लक्ष देतील का. असा प्रश्न उपस्थित केला जात असुन अपघातातील जखमी प्रवाशांना आर्थिक मदत केली जाईल का. असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाचक क्रमांक :