By : Polticalface Team ,24-06-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता. 23/06/2024 दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील सौ.संध्या रविंद्र शिंदे. तसेच सौ हेमा सुरेश रणशुर. या दोन्ही महिला नेहमी प्रमाणे सकाळच्या वेळी घरा पासून काही अंतरावर वाकींग करण्यासाठी गेल्या होत्या. त्या परत माघारी घरी येत असताना. मोटर सायकल वरील दोन अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पळवून नेल्याची घटना रविवार दि २३ जून रोजी सकाळी 6: 40 वा जे सुमारास यवत गावात घडली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटने बाबत. सौ संध्या रविंद्र शिंदे वय 56 वर्ष रा. विश्रामगृह समोर. हायवे रोड. यवत ता. दौंड जिल्हा पुणे. यांच्या फिर्यादी वरून यवत पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सौ.हेमा सुरेश रणशुर रा यवत यशवंत नगर ता दौंड जिल्हा पुणे. हि महिला सकाळी दिवस उगवता यवत स्टेशन रोडने वाकींग करण्यासाठी गेली होती. परत त्याच रोडने घरी येत असताना अचानक मोटर सायकल वरील मागे बसलेल्या एका अज्ञात चोरांने तिच्या गळ्यातील एक तोळ्याचा सोन्याचा मिनी गंठण आणि अर्धा तोळ्याची चैन. असा ऐवज मोटर सायकल वरील अज्ञात दोन चोरट्यांनी हिसकावून पळवून नेला असल्याचे फियादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. फियादी सौ संध्या रविंद्र शिंदे. ही महिला. यवत दोरगे वाडी येथे अंगणवाडी कार्यकरती म्हणून नोकरीस आहेत. तर सौ हेमा सुरेश रणशुर. ही महिला. सेवा निवृत्त असलेले माजी सैनिक व संध्या शिरुर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले. पोलीस कर्मचारी यांची पत्नी आहे. दिनांक 23/06/2024 रोजी सकाळी 06.15 वा.जे सुमारास सौ संध्या रविंद्र शिंदे ही महिला वाकींग करण्यासाठी घरा समोरील सेवा मार्गावरून पायी चालत भुलेश्वर मार्केट पासून परत घराकडे जात असताना 06.40 वा. चे सुमारास पाठीमागून एका मोटार सायकल वरून दोन अनोळखी इसम फियादी जवळ आले. त्या दोघा पैकी पाठीमागे बसलेल्या एका इसमाने अचानक फिर्यादीच्या गळ्यातील 3 तोळे 1 ग्रॅम. वजनाचे असे एकूण 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचा मिनी गंठण ओढुन जबरदस्तीने हिसकावून चोरी करून निघून गेले. तसेच यवत गावातील यशवंत नगर येथील सौ हेमा सुरेश रणशुर. हिच्या गाळयातील एक तोळ्याचा मिनी गंठण व अर्धा तोळा सोन्याची चैन. मोटर सायकल वरून दोन अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले बाबत फिर्यादीला समजले असल्याने दोन्ही महिलांच्या दागिन्यांची चोरी प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे मोटर सायकल वरील दोन अज्ञात चोरट्यांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे यवत पोलिसांनी सांगितले. असे फियादीने हि बोलताना सांगितले असून. दाखल अंमलदार पो हवा चोरमले, अधिकारी पो स इ गणेश निंबाळकर. पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :