तरुणांमध्ये वाढत चाललेल्या अंमली पदार्थ सेवनाचे प्रमाण. एक गंभीर चिंतेची बाब. पोलीस निरीक्षक संतोष डोके.

By : Polticalface Team ,27-06-2024

तरुणांमध्ये वाढत चाललेल्या अंमली पदार्थ सेवनाचे प्रमाण. एक गंभीर चिंतेची बाब. पोलीस निरीक्षक संतोष डोके.  दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २६ जून २०२४ दौंड शहरातील शेठ ज्योती प्रसाद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने. २६ जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून. विद्यालयात जन जागृती बाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ते म्हणून दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष डोके. उपस्थित होते. या वेळी विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शेठ ज्योती प्रसाद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील युवा तरुण विद्यार्थी व दौंड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी मनोगत व्यक्त केले. देशभरात दरवर्षी २६ जून हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित करण्यात आला असून. युवा तरुण व नागरिकांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामां बंद्दल जन जागृती व प्रतिबंधक प्रयत्न केला जातो. युवा तरुण किशोरवयीन मुलांमधील अंमली पदार्थांचे सेवन रोखणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असुन. ड्रग्स आणि अफू. चरस. तस्करी रोखण्यासाठी या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांमध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या व्यसनाला व सेवनाचे प्रमाण एक गंभीर चिंतेची बाब असल्याने प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या अनुषंगाने ते बोलताना पुढे म्हणाले. अंमली पदार्थ माणसाच्या शरीराला घातक आहेत. त्या पासून शरीरावर दुष्परिणाम होऊन. शरीरातील विविध अवयव. निकामी होऊन. किडणी. लिव्हर. कॅन्सर. सारख्या आजाराने तरुण त्रस्त झाले असून. युवा तरुणांच्या जीवाशी खेळ थांबवणे हा मुख्य उद्देश आहे. युवा तरुण विद्यार्थी या देशाची संपत्ती आहे. अंमली पदार्थां पासून स्वतः ला अलिप्त ठेवा. पोलीस निरीक्षक संतोष डोके त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले अंमली पदार्थ व व्यसनाच्या नादी लागून अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. पोलिस खात्यात कर्तव्य बसवत असताना अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शहरातील किंवा ग्रामीण भागातील एखादा व्यक्ती अंमली पदार्थांचे धुंदीमध्ये न कळत गुन्हा करतो. शुद्धीवर आल्यावर स्वतः जेलमध्ये पश्चाताप करतो. त्यामुळे अफू‌. चरस. ब्राऊन शुगर. डॢग्स. या विषारी पदार्थांच्या व्यसना पासून तरुणांनी अलिप्त राहून. जीवन निरोगी जगण्याचा संकल्प करावा. असा संदेश पोलीस निरीक्षक संतोष डोके. यांनी विद्यार्थ्यांना दिला. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्तं दौंड शहरातील शेठ ज्योती प्रसाद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १२ वी मधील विद्यार्थी व नागरिकांनमध्ये जनजागृती करून. अंमली पदार्थाचे दुष्परिणाम या बाबत. दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी मार्गदर्शन केले. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त. दौंड पोलिस उपनिरीक्षक सतिश राऊत. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दूरंदे. यांनी ही मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद काकडे. उपप्राचार्य श्रीकृष्ण देवकर. जेष्ठ उपशिक्षक दत्तात्रय शिंदे. शिवराज शितोळे. स्व.कि गु, कटारिया विद्यालयाचे श्रीकृष्ण ननवरे. विशाल ओव्हाळ. उपशिक्षक सुरेखा थोरात. दिलीप शिंपी. विद्यालयातील विद्यार्थी तसेच दौंड शहरातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष