जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा. यवत नगरीत वैष्णवांचा मेळा विसावला. हा सुख सोहळा स्वर्गी नाही.

By : Polticalface Team ,04-07-2024

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा. यवत नगरीत वैष्णवांचा मेळा विसावला. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०३ जुलै २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे. जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे यवत नगरीत वैष्णवांनी विसावला घेतला असून वारकऱ्यांनी एक आगळा वेगळा चवदार पिठल भाकरीचा आस्वाद घेतला असुन. गेल्या ५५ वर्षापासून हि परंपरा कायम जोपासली जात आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पिठलं भाकरीचे भोजन दिले जाते. दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात पालखी विसावा असतो. लोणी काळभोर येथून निघाल्या नंतर सायंकाळी चारच्या सुमारास पालखीचे दौंड तालुक्यात आगमन होताच बोरीभडक येथे दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपाच्या कांचन कुल, दौंड चे प्रांतअधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, नायब तहसीलदार ममता देशमुख, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नामदेव ताकवणे, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांसह विविध राजकीय व प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने पालखीचे स्वागतार्ह उपस्थित होते. पालखी सोहळ्याचे सहजपूर, जावजीबुवाची वाडी, कासुर्डी येथे विश्रांती घेऊन. टाळ मृदुंगाच्या गजर ज्ञानोबा- माऊली - तुकाराम, माऊली- माऊली असा जय घोष करीत भगव्या पथका घेऊन. सर्व परिसर हरि नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते. पालखी सोहळा यवत येथे रात्री ०८.४५ च्या सुमारास श्री काळ भैरवनाथ मंदिर येथे विसावला. यवत येथील युवा तरुण पिढी तसेच सर्व गावकरी मोठ्या उत्साहात भाविकांना व वारकरी वैष्णवांना पिठलं भाकरीचा चटकदार व ग्रामीण भागातील आवडता पदार्थ प्रत्येक वारकऱ्यापर्यंत भोजन पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे सोलापूर महामार्गावर विविध ठिकाणी सामाजिक संस्था, व मंडळांनी पंढरीच्या वाटेवरील वारकरी वैष्णवांना चहा-बिस्किट व अल्पो उपहाराची वेवस्थ करण्यात आली होती. यवत नगरीत यवत गावचे सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव. ग्रामपंचायत सदस्य. देवस्थान कमिटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत गावात आल्या नंतर वारकऱ्यांना एक वेगळाच आस्वाद दिला जातो. गेल्या अनेक वर्षा पासून अखंडीत पणे वारकऱ्यांना पिठलं भाकरीचे भोजन दिले जाते. दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा यवत येथील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ मंदिरात पालखी विसावा या ठिकाणी दौंड तहसीलदार अरुण शेलार, नायब तहसीलदार गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नायब तहसीलदार. तुषार बोरकर, हभप नाना महाराज दोरगे, श्री काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश दोरगे, दत्तात्रय दोरगे पाटिल. चंद्रकांत दादा दोरगे. महेश गायकवाड विनायक दोरगे, यांसह मान्यवरांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची आरती करून महाप्रसाद पिठलं भाकरी भोजनाच्या पंगतीला सुरुवात करण्यात येते. यवत येथील अनेक वर्षाच्या परंपरे नूसार वारकऱ्यांना पिठलं भाकरीचे भोजन दिले जाते.चूलीवरील भाकरी व पिठलं जेवणाचा आस्वाद लाखो वारकरी घेतात. अनेक वर्षां पासून यवत येथील समस्त ग्रामस्थ श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने. साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा या संतांच्या उपदेशाचे अनुकरण करून सर्व यवत नगरी दुमदुमून गेला असुन भक्ती मय वातावरण निर्माण झाले होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील व प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने सहभागी होऊन.. संताची या संगती मनो मार्गी गती. अकळावा श्रीपती येणे पंथे... जीवा लागे करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळ.. मग तू अवघाची सुखरूप होशी जन्म मरणाचे दुःख विसरशी. पंढरीची वारी आल्या जंन्मा करावी. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुका म्हणे. देहू येथून पालखीचे प्रस्थान झाल्या नंतर पालखी सोहळा पुणे शहरातून बाहेर नेऊन. दौंड तालुका ग्रामीण भागातील पहिला मुक्काम यवत येथे असतो. ग्रामपंचायतीच्या वतीने वारकरी भाविकांसाठी सर्व ते अवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. सौछालय वेवस्था. मोबाईल चार्जिंग सेंटर. सकाळी अंघोळीची व्यवस्था. सकाळी ५ वाजे सुमारास सफाई कामगार यांनी स्वाछता अभियान सुरू केले होते. या सर्व सुख सुविधा उपलब्ध करून यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे. उपसरपंच सुभाष यादव. माजी उपसरपंच व सदस्य नाथा आबा दोरगे.ग्रामविकास अधिकारी. बालाजी सरवदे. तसेच सर्व सदस्य गावातील युवा तरुण तसेच ग्रामपंचायत सर्व कामगार. मोठ्या संख्येने सहभागी होऊन पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांच्या सेवेसाठी तत्पर होते. मौजे यवत ग्रामीण भागातील लोकांना आवडणारी चूलीवरील भाकरीची मेजवानी प्रतेक घरा घरातुन बनवून एक लाखापेक्षा अधिक भाकरी श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये आणून देत असतात मात्र तेल. मिठ. मिरची. कांदा. लसुन कडीपत्ता. जिरी मौवरी असे मिळून एक हजार किलो चवदार पिठलं वारकरी वैष्णवांसाठी तयार केले जाते. त्यामुळे वारीतील सर्व वारकरी घरगुती जेवणाचा आनंदाचा आतुरतेने वाट पाहत असतात. ( राम कृष्ण हरी.)
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष