भिमा कोरेगाव ते पंढरपूर पदयात्रा भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खू संघाचे यवत ग्रामस्थांनी केले स्वागत.
By : Polticalface Team ,06-07-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०५ जुलै २०२४ धम्मयात्रा सामाजिक क्रांती अभियान. भिमा कोरेगाव ते पंढरपूर पदयात्रा. भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खू संघ यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा दि.०५/०७/२०२४. रोजी यवत ता दौंड जिल्हा पुणे. येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन. भिम नगर येथे मुक्काम विसावा घेतला. या वेळी भिक्खू संघासह ऐकून शंभर पेक्षा अधिक उपासक बौद्ध बांधवांचा समावेश होता.
धम्मयात्रा सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत. भिमा कोरेगाव ते पंढरपूर मार्गातील उरुळी कांचन. कासुर्डी येथे दुपारची न्याहारी करून संध्याकाळी मुक्कामी यवत येथे विसावा घेण्यात आला होता. तथागत भगवान गौतम बुद्ध हे मोक्ष दाता नसुन. मार्ग दाता आहेत. जगामध्ये दुःख: आहे. दुःखा:ला कारण आहे. पंचशील आणि अष्टांगिक मार्गाचा साधकांनी अंगीकृत केल्यास दुःख मुक्ती पासून अलिप्त झाल्या शिवाय राहणार नाही. अशी मंगल भावना भिक्खू ज्ञानज्योती यांनी प्रवचनाच्या माध्यमातून व्यक्त केली.
गेली अनेक वर्षापासून नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभय अरण्यं या ठिकाणी वास्तव्य करून. वेळोवेळी धम्माचा गाडा पुढे नेण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उर्वरित धम्म कार्याचा गाडा पुढे ओढण्याचा संकल्प असुन. प्राचीन काळातील सम्राट अशोकाचा कालखंडाचे समाज बांधवांनी स्मरण करावे. भारत देशात ८४ हजार बुद्ध स्तुप व विहार सम्राट अशोक यांनी निर्माण केली आहेत. देशभरातील विविध ठिकाणी खोदकाम करताना तथागत गौतम बुद्धाच्या मूर्ती आढळून येत आहेत
बौध्द धर्म हा मानवता व विज्ञानवादी धर्म आहे. अंधारात अडकलेल्या समाज बांधवांना प्रकाशात घेऊन जाण्याचा मार्ग असल्याचे
प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी सांगितले.
दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे. डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन भिम नगर या ठिकाणी तीसरा मुक्काम होता. यवत गावातील समस्त ग्रामस्थानी भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खू संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या प्रसंगी यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे. ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे. तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे सदस्य शंकराव दोरगे. कैलास आबा दोरगे. तात्यासाहेब दोरगे. दत्तात्रय दोरगे पाटील अरविंद दोरगे. सुरज चोरगे. संजय दोरगे. आदी मान्यवरांनी धम्मयात्रा सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत धम्म पदयात्रा यवत येथे सायंकाळी ७ वाजता. आगमन झाले. या प्रसंगी गावच्या वतीने भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खू संघ यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या गळ्यात पंचरंगी वस्त्र घालून सन्मानीत करण्यात आले. या वेळी संविधान विचार मंच यवत येथील डॉ संतोष बडेकर. माजी पोलीस उपनिरीक्षक सेवा निवृत्त बबनराव गायकवाड. उरुळी कांचन येथील उपनिरीक्षक प्रियंका पवार. भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षक कृष्णाजी मोरे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माजी उपअध्यक्ष जनाधार न्यूज चे दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. आदी समस्त ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धम्मयात्रा सामाजिक क्रांती अभियान भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खू संघाला पुष्प फुलांचा वर्षाव करत मुक्काम ठिकाण. डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन भिम नगर येथे विसावा घेण्यात आला. या वेळी सामुदायिक त्रिशरण पंचशील धम्म वंदना घेण्यात आली. भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर यांनी प्रवचनाच्या माध्यमातून जमलेल्या साधकांना उपदेश दिला. यवत येथील गावकऱ्यांनी सर्व भिक्खू संघाला भोजनदान देण्यात आले तसेच यवत ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
वाचक क्रमांक :