जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यवत स्टेशन येथे रंगला वैष्णवांचा मेळा. बाळ गोपालांनी काढली पुस्तक व वृक्ष दिंडी सोहळा.

By : Polticalface Team ,06-07-2024

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यवत स्टेशन येथे रंगला वैष्णवांचा मेळा. बाळ गोपालांनी काढली पुस्तक व वृक्ष दिंडी सोहळा. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०६ जुलै२०२४. दौंड तालुक्यातील मौजे यवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बालक विद्यार्थींनी आषाढी वारी चे औचित्य साधून. यवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यवत स्टेशन येथे वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यानी विठ्ठल-रुक्मिणी. संत ज्ञानेश्वर. संत तुकाराम, संत मुक्ताबाई. या संतांची वेशभूषा परिधान करून वारकरी सांप्रदायिक वारसा जपण्याचा संदेश बालक दिंडीने दिला असुन.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते श्री निलकंठेश्वर मंदिरा पर्यंत पाई दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यवत गावचे उपसरपंच श्री सुभाष बापू यादव यांचे हस्ते आरती करून पालखीचे प्रस्थान श्री नीलकंठेश्वर मंदिराच्या दिशेने जाताना विद्यार्थ्यानी संतांची अभंगवाणी व हरि मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी.( हरिपाठ ) गायन केले. तसेच वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले. निलकंठेश्वर मंदिरात पालखी विसावा घेऊन विद्यार्थ्यांनी अभंगवाणीचे गायन केले. नीलकंठेश्वर मंदिर महिला भजनी मंडळाने सांप्रदायिक भजन झाले या प्रसंगी उपस्थित विध्यार्थी व पालक भक्तीरसात दंग झाले होते. या वेळी यवत गावचे उपसरपंच श्री सुभाष यादव बोलताना म्हणाले कि आपली परंपरा व संस्कृती यांची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी असे उपक्रम अतिशय महत्वाचे आहेत. शाळेत विविध उपक्रम सतत सुरु असतात त्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले .या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपसरपंच श्री सुभाष बापू यादव यांनी स्वखर्चाने शाळेतील पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, लेखन व चित्रकला साहित्याचे वाटप केले. तसेच या पुढे ही शाळेला सर्वांतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.राजेंद्र जगताप. हे उपस्थित होते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री रायकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी मुख्याध्यापिका सौ रायकर मॅडम बोलताना म्हणाल्या, *विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पंढरीच्या वारीचा अनुभव यावा, त्यांच्यामध्ये वारकरी सांप्रदाया विषयी आदर निर्माण व्हावा. तसेच वृक्ष लागवडीचे महत्व पटावे, ग्रंथ , पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने बालक दिंडी सोहळा असे विविध सांस्कृतिक उपक्रम शाळेत राबविले जातात* या प्रसंगी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ.लता जगताप, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा सौ, दीपाली थोरात, सौ.मंदा सुभाष यादव, सौ.रेखा फडतरे, सौ. मंगल शंकर जगताप, शिक्षक श्री अनिल हुंबे, श्री रामहरी लावंड, सौ संगीता टिळेकर, श्रीमती संगीता वाळके, अंगणवाडी सेविका सौ. उल्का दुनाखे, ढमढेरे ताई, रुपाली शेळके, तसेच यवत रेल्वे स्टेशन परिसरातील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमा बद्दल पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष