महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे लातुर एस्टी बस. यवत येथे बंद पडल्याने महिला प्रवासी हैराण.
By : Polticalface Team ,09-07-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता.०९ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे. पुणे लातुर एस्टी यवत ता दौंड जिल्हा पुणे येथे तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली होती. या दरम्यान एस्टी बस मध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस्टी बसचा खुळखळा झाला असल्याचे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनकडून बोलले जात होते.
परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांचे वाहन दुरुस्ती बाबत दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवासी वाहतूक करणाऱ्या एस्टी बस बंद पडण्याचे प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. या पूर्वी देखील अशा प्रकारे अनेक घटना घडल्या आहेत. सहजपुर फाट येथे भिषण अपघात २० ते २५ प्रवासी जखमी झाले होते. तसेच यवत हद्दीत विविध ठिकाणी एस्टी बस अचानक बंद पडलेल्याने या प्रसंगी मोठा अपघात होण्याची शक्यता होती मात्र चालकाच्या सावध भुमिके मुळे सदर ठिकाणी भिषण अपघाता पासुन अनेक प्रवासी बचावले आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग यांचे एस्टी बस दुरुस्ती बाबत हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे ते लातुर या एस्टी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांनमध्ये प्रामुख्याने महिलांची संख्या अधिक होती. अचानक एस्टी बस बंद पडल्याने महिला प्रवासी लहान मुलांना कडेवर घेऊन व बॅग साहित्य उचलून चालताना अतिशय नाकीनऊ आले होते. इतर एस्टी बस मध्ये सर्व प्रवासी बसवून देण्यासाठी. वाहन चालक व कंडक्टर महिला प्रवासी सह बराच वेळ यवत येथे हायवे मार्गावर तात्काळत उभे राहवे लागले. पुणे लातुर एस्टी क्रमांक एम एच ४० वाय ५७४१ या गाडीचा अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडून हिरव्या रंगाचे पाणी रोडवर साठले होते. काही वेळाने दुसऱ्या एस्टी बस मध्ये महिला प्रवासीसह सर्व प्रवाशांना बसमध्ये बसवून देण्यात आले. व पुणे लातुर एस्टी बस देखील दुरुस्ती करण्यासाठी घेऊन गेले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील वरिष्ठ अधिकारी हे एखाद्या भिषण अपघाता ची वाट पाहत आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात असुन. तेव्हा ते जुन्या एस्टी बसच्या दुरुस्ती बाबत लक्ष दिले जाईल काय.? असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाचक क्रमांक :