By : Polticalface Team ,11-07-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ११ जुलै २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा नामदेव ताकवणे यांनी दि ११ जुलै रोजी केडगाव चौफुला ता दौंड जिल्हा पुणे, श्री बोरमलनाथ मंदिर येथे पत्रकार परिषद घेऊन, लढाई हक्काच्या पाण्यासाठी दौडच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाणी हक्क यात्रा दि ०८ जुलै ते १३ जुलै २०२४ या अभियान अंतर्गत बोलताना ते म्हणाले, मा शरदचंद्र पवार यांनी नुकताच दौड तालुक्याचा दौरा करून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून आढावा घेण्यात आला. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात गेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांचे दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुनर्वसन झाले आहे. या पाश्र्वभूमीवर लढाई हक्काच्या पाण्यासाठी दौडच्या उज्ज्वल भविष्यासाठी तालुक्यात अभियान अंतर्गत ठिक ठिकाणी प्रचार प्रसार जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले, या वेळी दैनिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष नामदेव ताकवणे यांना बोलताना प्रश्न उपस्थित केला, ? राज्यात व केंद्रात भाजप पक्षांची सत्ता असताना देखील पक्ष सोडण्याचे नेमके कारण काय ? त्यावर ते बोलताना म्हणाले पूर्वीप्रमाणे पक्षाचे ध्येय धोरण राहिली नाहीत, भाजपा मध्ये असताना विविध उपक्रम राबविले. तसेच जनतेच्या प्रश्नावर अनेक वेळा आंदोलने करून, सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध लढा उभा केला, तालुक्यात भाजपला चांगले वातावरण निर्माण केले, मात्र ऐनवेळी महादेव जानकर यांचा पक्ष सोडून, राहुल कुल यांनी भाजपामध्ये उडी मारुन विधानसभा लढवली, खरं तर ती संधी मला मिळणार होती, अशी प्रतिक्रिया ताकवणे यांनी व्यक्त केली, तसेच पुढे बोलताना ते म्हणाले राहुल कुल यांना दहा हजार मताधिक्य मिळाले होते ते सहाशे ते सातशे मतावर निवडून आले आहे, ?
एके काळी एकत्रित काम करणारे
ताकवणे आणि आमदार राहुल कुल यांच्यात दुरावा निर्माण झाला असुन दोघांमध्ये फारकत झाली आहे, अशी जनतेमध्ये चर्चा होत आहे,? या वर ते म्हणाले, राहुल कुल है भिमा पाटस कारखान्यांचे चेअरमन होते मी देखील संचालक होतो, आम्ही एकत्र पाच वर्षे काम केले आहे. राहुल कुल यांनी कधिच हा विचार केला नाही, लोकांनी ३० वर्षापासून कुल घरात आमदार की दिली. राहुल कुल हे २२ वर्षा पासून कारखान्याचे चेअरमन आहेत, आपण सभासदांचं देणं लागतो असं त्यांना वाटत नाही, ते समाजावर उपकार केल्याची भाषा वापरतात हि मोठी शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया ताकवणे यांनी बोलताना व्यक्त केली असुन. नाव न घेता आता टक्केवारी सोडा भागेदारी असेल तर बोला, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नामदेव ताकवणे यांनी बोलताना व्यक्त केली आहे, लढाई हक्काच्या पाण्यासाठी दौडच्या उज्ज्वल भविष्यासाठी या पाणी हक्क यात्रा अभियान अंतर्गत तालुक्यातील जनतेच्या स्वअक्षरी घेऊन न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले, सह्याद्रीच्या खोऱ्यातील कृष्णा खोरे ५ या मधून उजनीच्या पाणलोट क्षेत्रात येणारे पाणी जे ब्रिटिशकालीन कराराने टाटाला दिले गेले आहे, ते नैसर्गिक न्याय हक्काने दौंड तालुक्याला मिळावे. बेबी कॅनॉलच्या माध्यमातून मिळणारे पाणी जे की, पाटसपर्यंत देणार होते ते पाटसपर्यंत मिळावे. तसेच त्यावरील सर्व प्रलंबित दुरुस्त्यांची कामे पूर्ण करावी.
खडकवासल्यातून दौंडला मिळणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून दौंडच्या हक्काचे पाणी दौंडला मिळावे. दौंड तालुक्यातील पूर्व भागांमधील भीमा नदीमधील बुडीत बंधारे यांचा प्रश्न त्वरित मार्गी लागावा.
जानाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना या माध्यमातून दौंड तालुक्यातील समाविष्ट गावांना न्याय वाटपाने पाणी मिळावे, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या प्रमुख मागण्या असुन पुणे जिल्ह्यातला काही भाग विशेषतः दौंड तालुक्याला मात्र वर्षानुवर्षे दुष्काळाला सामोरे जावे लागते. खरंतर हा दुष्काळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित लोकप्रतिनिधी निर्मित दुष्काळ असल्याचे त्यांनी सांगितले, तालुक्यातील लोकप्रतिनिधीने या प्रश्नाकडे गांभीर्याने कधीच लक्ष न दिल्यामुळे वारंवार दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. खडकवासला धरणातील पाण्यावर दौंड तालुक्याचा पहिला हक्क आहे, मात्र तो ब्रिटिशकालीन कराराद्वारे देण्यात आलेल्या टाटा प्रकल्पाच्या धोरणा वरती कोणी बोलण्यास धजवत नाहीत हा केंद्र सरकार चा विषय आहे, खरंतर वीज निर्मितीसाठी सध्या सोलर पासून ते अणुऊर्जेपर्यंत अनेक विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग हा पिण्यासाठी आणि शेतीसाठीच प्रामुख्याने व्हावा. म्हणूनच टाटा प्रकल्पाला देण्यात आलेले पाणी दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे, दौंड तालुक्याला मुख्यत्वे कॅनॉल व बेबी कॅनॉल मार्फत पाणीपुरवठा होतो. यावर अवलंबून असणाऱ्या जानाई शिरसाई योजने मध्ये समाविष्ट असलेल्या दौंड तालुक्यातील गावांना जे पाणी दिले जाते, त्याचे नियोजन होऊन त्यांना ते योग्य प्रमाणात मिळाले पाहिजे, या बाबत आज पर्यंत कधीही ठोस निर्णय झाला नाही, तो होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पुरंदर उपसा सिंचन योजना या मध्ये ज्या गावांचा समावेश आहे, त्या गावांसाठी सुद्धा पाणी वाटपाचे नियोजन होऊ शकले नाही. या योजनेच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील हायवेच्या दक्षिणेकडील बाजू पट्ट्याला म्हणजेच डाळिंब पासून खडकी पर्यंत खरंतर फायदा व्हायला पाहिजे होता पण तो झाला नाही. या साठी जानाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना या मधील समाविष्ट असलेल्या गावांच्या योजनांची फेररचना करून सर्वच भाग ओलिता खाली येईल, अशा प्रकारे योजना आखणे आवश्यक असुन यासाठी नैसर्गिक अनुकूलता असलेल्या भागामध्ये तलाव निर्मिती करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले, खडकवासला कॅनॉलची खरी परिस्थिती अशी आहे की या कॅनॉलचे वेळापत्रक हे कधीही शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी कॅनॉलच्या अस्तरी करणाचा घाट घातला गेलेला आहे. कॅनॉलद्वारे जमिनीत मुरणाऱ्या पाण्यावरती दौंड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे.
मग हे अस्तरीकरण नेमके कोणाच्या आर्थिक फायद्यासाठी आणि ठेकेदाराच्या भल्यासाठी होतंय का ?
असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे,
बेबी कॅनॉलचीही परिस्थिती तीच आहे.
बेबी कॅनॉलची रचना ही पाटस पर्यंत आहे. त्यामुळे बेबी कॅनॉलचे पाणी हे पाटस पर्यंत मिळणार होते, त्यामुळे जे खडकवासला मुख्य कॅनॉलचे पाणी वाचणार होते, ते पाणी दौंडच्या पूर्व भागात द्यायचे अशी ही रचना आहे, मात्र तसे काही झाले नाही. उलट वरवंड आणि पाटस पर्यंत ची कामेच अद्याप पूर्ण झालेली नाहीत. पाण्याच्या लाभापासून तालुक्यातील ही दोन मोठी गावे आजही वंचित आहेत.
दुसरीकडे बेबी कॅनॉलच्या दुरुस्तीखाली कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जातो, कामे मात्र अपुरी राहतात. घरोघरी पाणी पुरवठा योजनेच्या चालू असलेल्या कामातही फार मोठ्या प्रमाणात गैरप्रकार पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी. दौंड तालुक्यातील पूर्व पट्ट्यामध्ये BBC फाट्याला पूर्ण क्षमतेने पाणी देणे गरजेचे आहे, मात्र ते दिले जात नाही. या भागातील शेतकरी कायमच पाण्यासाठी संघर्ष करून देखील पाण्या पासून वंचित राहत आहेत. लिंगाळी, बोरिबेल पासून ते मलठण, स्वामी चिंचोली या भागामध्ये नवीन पाणी साठवण तलाव तयार केले तर शेतकऱ्यांसाठी ते कायम स्वरूपी वरदान ठरणार आहे. दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, तालुक्याच्या उज्चल भविष्यासाठी, दौंड तालुक्यातील सर्व जनतेने हा लढा उभारणे काळाची गरज आहे. या दुष्काळ प्रश्नावरती कायम स्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. म्हणूनच दौंड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी,
नागरिकांनी या विषयाला वाचा फोडण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून दौंड तालुक्यातील दुष्काळाच्या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी पाणी हक्क यात्रेत सहभाग नोंदवून हक्काच्या पाण्यासाठी लढू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा नामदेव राजाराम ताकवणे यांनी दौंड तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे,
वाचक क्रमांक :