दौंड शहरातील बुद्ध विहाराचे बांधकाम सुरू करावे. स्थानिक समिती स्थापन करावी. अंन्यथा नगरपरिषद विरुद्ध. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा.
By : Polticalface Team ,15-07-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १५ जुलै २०२४ दौंड नगरपरिषद प्रशासनाने शहरातील बुध्द विहाराचे बांधकाम तत्काळ सुरू करावे तसेच स्थानिक समिती स्थापन करण्यात यावी. या संदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विनंती पुर्वक निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाच्या अनुषंगाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा नगरपरिषद विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने दि १५ जुलै २०२४ रोजी दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून या बाबत अधिक माहिती अशी की, सन २०१६ पासून ते आज पर्यंत दौड नगरपरिषदे मार्फत शहरातील बुद्ध विहाराचे बांधकाम सुरू केले असून. मागील २८ वर्षा पासून फक्त पाया भणीचे काम सुरू आहे. ते अघ्याप अपुर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. ही नगरपरिषद प्रशासनाची पध्दत अतिशय चुकीची आहे. बुध्द विहाराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्थिक निधी उपलब्ध करण्यात आला आहे.दि.२४ ऑगस्ट २०१६ रोजीच्या शासनाच्या प्रपत्राद्वारे वैशिश्यपूर्ण योजने अंतर्गत ०३ कोटींचा निधी अशाच प्रकारे वेग वेगळया स्वरूपात अर्थिक निधी दौंड नगरपालिकेकडे वर्ग झाला असताना देखील बुद्ध विहाराचे बांधकाम अद्याप ही पाया भरणी पेक्षा अधिक झाले नाही, हि मोठी शोकांतिका आहे. मागील काही महिन्यात तेथील कामी लागणारे लोखंडी स्टील गज वस्तू काही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजले आहे. दौड नगरपरिषद प्रशासन या घटनेकडे जाणीव पुर्वक जातीय द्वेषभावनेतून दुर्लक्ष करीत आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याने समाजामध्ये नाराजी व्यक्त केली जात असुन. पीपल्स रिपब्लिकन पार्टी तसेच विविध संघटनेच्या वतीने दौंड नगरपरिषद प्रशासना विरुद्ध तीव्र जाहिर निषेध करण्यात आला आहे. रखडलेल्या बुद्ध विहाराचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात यावे. अशी मागणी निवदेनाद्वारे करण्यात आली आहे. सदरचे बांधकाम सुरू असताना काही विपरीत गैर प्रकार घडू नये. व बुद्ध विहाराचे धार्मिक पावित्र कायम ठिकुन राहण्यासाठी समाजातील काही प्रमुख लोकांची समिती गठीत करण्यात यावी. समितीच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध विहाराची वास्तू उभी करावी, अशी विनंती पुर्वक मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच रखडलेल्या बुद्ध विहाराचे बांधकाम दि,२२/०७ /२०२४ पर्यंत सुरु करण्यात आले नाही. तर कायद्याच्या सनदशीर मार्गाने फुले शाहू आंबेडकर चळवळीतील राजकीय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन दौड नगरपरिषद समोर छेडण्यात येईल. याची वेळत दखल घ्यावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दौड नगरपरिषदचे मुख्याधिकारी हेच जबाबदार राहील याची प्रामुख्याने नोंद घ्यावी. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली. पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे. तसेच दौंड तालुक्यातील विविध राजकीय पक्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी भिम.वा संस्थापक अध्यक्ष प्रमोद राणेरजपुत. पैथर सेना. दौंड तालुका अध्यक्ष सागर उबाळे, किरण खुडे. अमर गायकवाड. निखिल भोकरे. विकी शेलार. एन डी एम. पांडुरंग गडकर. आदी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील विविध संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :