यवत येथील मुस्लिम बांधवांनी मोहरम ताबुत, सवाऱ्याची जपली परंपरा. हिन्दू मुस्लिम बहुजनांचा एकोपा कायम- हाजी मुबारक भाई शेख.
By : Polticalface Team ,18-07-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १७ जुलै २०२४. दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील मुस्लिम बांधवांनी मोहरम ताबुत पंजे सवाऱ्याची परंपरा कायम राखली असुन पंढरपूर आषाढी एकादशी व मोहरम एकाच दिवशी हिन्दू मुस्लिम बहुजन बांधवांनी साजरा केला. यवत येथील मोहरमचे मुजावर. हाजी अब्बासभाई इब्राहिमभाई तांबोळी. आणि सवारीचे मुजावर मलंगभाई मोहम्मदभाई तांबोळी. यांच्या घरी नेहमी प्रमाणे इस्लाम धर्मातील मोहरम महिन्याच्या ०४ तारखेला पंजे सवाऱ्या व ताजे बसवून. धार्मिक विधी कुराण पठण. दरुद सलाम फात्या करत परंपरेनुसार ०७ तारीख व ०९ तारखेला पंजे सवाऱ्याची यवत गावातुन हजरत चांदशावली दर्गा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्याच प्रमाणे दि.१७ जुलै रोजी व मोहरमच्या १० तारखेला श्री काळ भैरवनाथाच्या मंदिरा पासून (डोला) ताबुताची मिरवणूक युवा तरुणांनी गाव पेठेतुन मसोबा चौका पर्यंत घेऊन गेले होते. या दरम्यान डोला ताबुताच्या खालुन लहान मुलांना घेऊन डोला ताबुता खालुन जात होते. या वेळी शरबत. शेंगदाणे. रोट मुलांना वाटप करण्यात आले.या प्रसंगी यवत गावातील हिन्दू मुस्लिम धर्मातील सर्व लोक या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुर्वी यवत येथील नबीभाई मुलाणी यांच्या घरी गावकऱ्यांचा एक (डोला) ताबुत बसवत होता. मात्र काही दिवसांपासून बसवला जात नाही. अशी प्रतिक्रिया हाजी अब्बास भाई तांबोळी यांनी व्यक्त केली.
यवत गावात पुर्वी पासुन हिन्दू मुस्लिम बहुजन समाजातील एकोपा कायम ठिकुन आहे. दसरा महोत्सवा दिवशी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांची पालखी. हजरत बडेशावली बाबा दर्गा या ठिकाणी विसावा घेऊन (आपटा सोने एकमेकांना देऊन ) दसरा महोत्सव साजरा करण्याची प्रथा आजही कायम आहे. इस्लाम धर्मातील मोहरमचा महिना नविन वर्षाची सुरुवात म्हणून पुर्वी पासून पवित्र मानला जातो. त्यामुळे या महिन्याला खूप महत्त्व आहे. मोहरम हा अल्लाहचा महिना म्हणून देखील मानला जातो. इस्लाम धर्मातील मोहरमच्या दहा तारखेला जगातील अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. हजरत मोहम्मद पैगंबरांचे नातू हजरत इमाम हुसेन व त्यांच्या कुटुंबातील ७२ सदस्य धर्मयुद्धा मध्ये शहिद झाले. ही घटना इराक मधील करबला या ठिकाणी घडली असून. हजरत इमाम हुसेन शहिद दिवस म्हणून देखील साजरा केला जातो.
इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्यातील रोजे नंतर. मोहरमच्या दहा तारखेला रोजा (फर्ज है) धरण्यासाठी हजरत मोहम्मद पैगंबर यांनी सांगितले आहे. हजरत इमाम हुसेन शहिद दिवशी अन्नदान. सरबत. रोट. शेंगदाणे वाटप करतात. करबला धर्मयुद्धाच्या घटनेची आठवण म्हणून लोक मोहरमच्या दिवशी (डोला) ताबुतांची मिरवणूक काढतात. सवाऱ्या बसवतात. ताबुत व सवाऱ्याची ही परंपरा भारत देशात व इतर इस्लामी देशात देखील पुर्वकाळा पासून असल्याचे सांगत यवत येथील हिन्दू मुस्लिम बहुजन एकोपा कायम राखला जातो. हाजी मुबारक भाई शेख यांनी सांगितले. श्री काळभैरवनाथ मंदिर समोर नेहमीच्या पद्धतीने डोला ताबुत विसावा करून. तरुणांनी डोला घेऊन मुळा मुठा कालव्यात डोला ताबुता विसर्जन करण्यात आला. या वेळी मुजावर मलंगभाई मोहम्मद तांबोळी. हाजी अब्बास भाई तांबोळी. हाजी मुबारक भाई शेख. सादिकभाई तांबोळी. हमीदभाई शेख, मुन्नाभाई अब्दुल तांबोळी. इब्रानभाई अकबर शेख. जावेदभाई तांबोळी. रफिकभाई तांबोळी. इरफान भाई शेख. अविनाश यादव. निवृत्ती गायकवाड. शांताराम गायकवाड. यवत पंचक्रोशीतील युवा तरुण महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :