ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे कडेठाण डांबरी रस्त्यांची लागली वाट. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष नागरिकांच्या पैशाचा चुराडा. ठेकेदार डांबरीकरण करुन देणार का ?

By : Polticalface Team ,25-07-2024

ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे कडेठाण डांबरी रस्त्यांची लागली वाट. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष नागरिकांच्या पैशाचा चुराडा. ठेकेदार डांबरीकरण करुन देणार का ? दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २४ जुलै २०२४ दौंड तालुक्यातील मौजे कडेठाण ता दौंड जिल्हा पुणे येथील वरवंड ते कडेठाण या प्रमुख जाण्या येण्याचा डांबरी रस्ता फोडून ड्रेनिज पाईप लाईनचे काम शाळेची संरक्षण भिंत पोखरुन चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.सदर रस्त्याचे काम दि २१ जुलै रोजी जेसीबी मशीनच्या साह्याने डांबरी रस्ता फोडून थोडक्यात भागविण्याचा व जवळच्या मार्गाने ड्रेनिज पाईप लाईन करण्याचा ठेकेदार प्रयत्न करत आहे. कडेठाण ते वरवंड हा मुख्य डांबरी रस्ता फोडून ड्रेनिज पाईप लाईनचे काम केले आहे या बाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्याचे खोदकाम करण्यापुर्वी परवानगी घेणे आवश्यक असताना. मात्र संबंधित ठेकेदारा यांनी परवानगी न घेताच डांबरी रस्ता फोडला. ड्रेनेज कामासाठी फोडण्यात आलेल्या रस्त्यामुळे सदर ठिकाणी अपघाताची शक्यता असून नागरिकांच्या जीवाशी धोका निर्माण झाला आहे. कडेठाण येथील चांगल्या डांबरी रस्त्याची वाट लागल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 


 

कडेठाण ते वरवंड डांबरी रस्ता फोडला या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला असता. ठेकेदार म्हणतात परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी मा माळशिकरे यांच्याशी संपर्क साधला असता. कडेठाण ग्रामसेवक आणि दौंड पंचायत समितीचे बीडीओ यांना आजच पत्र देऊन टाका असे त्यांनी बोलताना सांगितले.सदर ठेकेदार यांनी ड्रेनेज कामासाठी फोडण्यात आलेल्या डांबरी रस्त्यावर डांबरीकरण करुण देतील का ? शाळेची भिंत कोसळल्यास बांधून देतील का ? अशी चर्चा नागरिकांनमध्ये केला जात आहे. ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे कडेठाण डांबरी रस्त्यांची लागली वाट. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष नागरिकांच्या पैशाचा चुराडा. ठेकेदार डांबरीकरण करुन देणार का ? 


 गावातील डांबरी रस्ता व शाळेची संरक्षण भिंत पोखरुन ड्रेनिज लाईनचे निकृष्ट दर्जाचे व कमकुवत काम केले जात आहे गावातील शाळेची सिमा भिंत सदर कामामुळे कमकुवत होऊन कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बाबत बांधकाम विभाग प्रमुख अधिकारी यांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी कडेठाण समस्त ग्रामस्थांकडून केली जात आहे. तर ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे कडेठाण येथील डांबरी रस्त्यांची वाट लागली आहे. तसेच ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या पैशाचा चुराडा केला जात आहे. हि मोठी शोकांतिका असल्याचे नागरिकांनमध्ये बोलले जात असुन नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष