पाटस येथील सर्विस रोडच्या खड्ड्यांमधे वृक्षरोपणाचा कार्यक्रम. टोल नाका व्यवस्थापकांना निवेदन. खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन. दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचा इशारा.

By : Polticalface Team ,27-07-2024

पाटस येथील सर्विस रोडच्या खड्ड्यांमधे वृक्षरोपणाचा कार्यक्रम. टोल नाका व्यवस्थापकांना निवेदन. खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन. दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचा इशारा. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २६ जुलै २०२४ दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे व दौंड शहराध्यक्ष सैफ भाई मणियार अध्यक्ष युवा भिम सेना यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे दौंड शहराध्यक्ष सैफ भाई मणियार सचिव अजिंक्य गायकवाड, प्रणय काकडे दौंड तालुका आध्यक्ष (युवा भिमसेना), शहर उपाध्यक्ष टोनी जगताप, शहर सचिव निलेश मिसाळ या सहकाऱ्यांच्या हस्ते पाटस येथील सर्विस रोडच्या खंड्यामध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम दि २६ जुलै २०२४ रोजी करण्यात आला. या प्रसंगी बोलताना तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी पाटस टोल नाका प्रशासनाच्या गालथान कारभारा बाबत निषेध व्यक्त केला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच 65 कासुर्डी टोल नाका ते स्वामी चिंचोली या मार्गावरील यवत चौफुला वरवंड पाटस कुरकुंभ मळद खडकी रावणगाव या भागातील सर्विस रोडला ठिक ठिकाणी खड्यांचे प्रमाण वाढले असून खंड्यात पावसाचे पाणी साठल्याने अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे मोटर सायकल वरून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाटस टोल नाका व्यवस्थापक व रस्ता दुरुस्ती ठेकेदार यांच्या निषकाम कार्यपद्धती बाबत संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भा बाबत दखल घेऊन. दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. पाटस टोल नाका व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दौंड तालुक्यातून जाणारा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक.NH -65 या दौंड तालुक्यातील कासुर्डी टोल नाका ते स्वामी चिंचोली या भागात. हायवे मार्गाच्या सर्विस रोडला ठिक ठिकाणी खड्डे पडले असून. त्यामध्ये पावसाचे पाणी भरले असल्याने सदर खंड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे मोटर सायकल वरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहेत. या संदर्भात पाटस टोल नाका व्यवस्थापक अधिकाऱी यांना दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेटून सूचना दिल्या आहेत. अशी माहिती दौंड तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी दिली. ते पुढे बोलताना म्हणाले पाटस टोल नाक्याचे व्यवस्थापक यांनी संबंधित ठेकेदार यांना सुचना देऊन तत्काळ सर्विस मार्गावरील खड्डे बुजविण्याची वेवस्था करावी. अन्यथा पाटस टोल नाका येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. या वेळी करण रणधीर (कडेठाण), युवराज दामोदरे (वरवंड), राहुल झेंडे व मयूर पानसरे यांच्या हस्ते खड्ड्यांमधे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जुनेद तांबोळी, राजेंद्र घाडगे, शशिकांत गायकवाड, संकेत पानसरे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 320 जयंती मोठ्या उत्साहात साजरी

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान