लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती यवत ग्रामपंचायत कार्यालय येथे उत्साहात साजरी.

By : Polticalface Team ,01-08-2024

लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती यवत ग्रामपंचायत कार्यालय येथे उत्साहात साजरी. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०१ ऑगस्ट २०२४ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती यवत ग्रामपंचायत कार्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. यांच्या प्रतिमेला विद्यमान सरपंच समीर दोरगे व उपसरपंच सुभाष यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. ‌ या वेळी यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथा दोरगे. राजेंद्र खुटवड. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डाडर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अरविंद दोरगे मातंग नवनिर्माण सेनेचे नेते काळुराम शेंडगे. निलेश शेंडगे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डाडर यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते बोलताना म्हणाले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे उपेक्षित कष्टकरी कामगार वर्गाचे नेते होते अण्णाभाऊंनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्यामधील सत्य परिस्थितीवर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बळ देण्याचे काम अण्णाभाऊंनी केलं रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते पहिले शिवशाहीर आण्णा भाऊ होते. त्याच प्रमाणे अण्णा भाऊंनी. तळागाळातील उपेक्षित गोरगरीब कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती जनजागृतीच्या माध्यमातून लाल बावटा कला पथकाची स्थापना केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया इंग्रज चले जाव. भारत देश पारतंत्र्यातून स्वातंत्र्याचा लढा उभा राहिली होती. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र 16 ऑगस्ट 1947 ला आण्णा भाऊंनी जन आंदोलनाची हाक दिली. भर पावसामध्ये हजारोंच्या संख्येने मोर्चा घेऊन अण्णाभाऊ साठे विधानसभेवर धडककले होते. या प्रसंगी त्यांनी लोकशाहिराचा बुलंद आवाज व ढफावर थाप टाकुन. ( ये आझादी झुटी है. देश की जनता भुकी है.) या संघर्ष जन आंदोलनाची जगभर वार्ता पसरली होती. या काळात खऱ्या अर्थाने चळवळ सुरू झाली होती या वेळी समाजाला दिशा मिळावी या अनुषंगाने लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या इशार दिला ते म्हणाले (जग बदल घालुनी घाव. आम्हा सांगुन गेले भिमराव. ) या उपदेशाने चळवळीला बळ मिळाले. अण्णाभाऊंच्या कार्याचा पाढा सखोल असून आज 1 ऑगस्ट 2024 लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त यवत ग्रामपंचायत कार्यालय येथे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर यांनी बोलताना सांगितले. तसेच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा या मागणीसाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने यांच्या मुळ वाटेगावातुन जोत घेऊन पुणे सारस बाग येथील लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जाते हा उपक्रम गेली 13 वर्षापासून सुरू आहे या बाबत सागताना ते विसरले नाहीत. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शेंडगे नवनाथ शेंडगे रोहित बुजवणे चंदन शेंडगे दादा लोंढे. टिल्लू मानकर बाबा पवार. सोमनाथ गायकवाड. आदी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.