लोकशाहीर अण्णा भाऊ साठे १०४ वी जयंती दौंड शहरात विविध उपक्रमाद्वारे साजरी. श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यानाची सर्वत्र चर्चा.

By : Polticalface Team ,03-08-2024

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे १०४ वी जयंती दौंड शहरात विविध उपक्रमाद्वारे साजरी. श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यानाची सर्वत्र चर्चा.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.

दौंड शहरात सोमवार दि.१ ऑगस्ट रोजी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्ताने कुंभारगल्ली, नेहरुचौक, छत्रपती शिवाजी चौक, आंबेडकर चौक अशी शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली होती  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मिरवणूकीचा समारोप झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 
दौंड येथे सोमवार दि २९ जूलै २०२४ रोजी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्ष मा.डॉ. श्रीपाल सबनीस सरांचे व्याखान लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर येथील समाज मंदिरा समोर सायंकाळी ७.०० वा. झाले. यावेळी श्रीपाल सबनीस यांनी व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफताना समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन केले व आमच्या पुर्वजांनी दलित समाजावर हजारो वर्ष केलेल्या अन्याय अत्याचाराबद्दल मी जाहीर माफी मागतो त्याची उतराई म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रभर बौध्द समाज व मातंग समाजामध्ये प्रबोधनपर विचार व्यक्त करीत असतो. मात्र दलित समाजाने एकत्र सलोखा ठेवून समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून अण्णा भाऊंच्या स्वप्नातील मातंग समाज जगाला घडताना दिसेल असेही शेवटी श्रीपाल सबनीस म्हणाले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये आयु. यादव सोनवणे, माजी नगरसेवक नागसेनजी धेंडे, सामाजिक कार्यकर्ते राजु गायकवाड, डॉ.प्रा. भिमराव मोरे, माजी गट शिक्षणाधिकारी बी. वाय. जगताप, सामाजिक कार्यकर्ते जयदिप बगाडे, दौंड परिवर्तनचे संपादक रमेश चावरिया आर्दिनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने महिला भगिनी, तरुणवर्गातील कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच लो. आण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्ताने दुसरे पुष्प गुंफताना नटसम्राट कुमार आहेर मी महात्मा फुले बोलतोय या एकपात्री नाट्य प्रयोग सादर करताना महात्मा फुले असे म्हणतात माझे ब्राम्हण समाजाचे सखाराम परांजपे, मोरोपंत वाळवेकर आणि रानडे सारखे मित्र असताना मला एका लग्नाच्या वरातीमधून धर्म वाटला म्हणून बाहेर काढले आणि मला साक्षात्कार झाला की समाज व्यवस्थेमध्ये आमचे स्थान कोठे आहे. आणि म्हणून मी १८०६ साली पत्नीला शिक्षिका बनवून दलित मुला-मुलींना शिक्षणाचे दार उघडून दिले. या वेळी दौंड नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे, मा. नगराध्यक्ष बादशाह शेख, वंचित बहुजन आघाडीचे दौंड तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे, मा. गटशिक्षणाधिकारी वी. वाय. जगताप, प्रा.डॉ. भिमराव मोरे, मेहतर समाजाचे प्रितम वाघेला आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच लो. आण्णा भाऊ साठे उद्यानात दौंड तालुक्याचे मा. आमदार रमेशआप्पा थोरात व दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे आदिसह नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुष्मा शिंदे, तहसिलदार डॉ. अरुण शेलार, पोलीस निरीक्षक संतोष डोके तसेच माजी नगरसेवक आदि उपस्थितांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्याधिकारी सुष्मा शिंदे यांनी उद्यानाचा आलेला विकास निधी असो, पुतळयाची मंजूरी असो अथवा उदयाना समोरचा रस्ता याबाबत इत्यादी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

सोमवार दि.१ ऑगस्ट रोजी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्ताने कुंभारगल्ली, नेहरुचौक, छ. शिवाजी चौक, आंबेडकर चौक अशी शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मिरवणूकीचा समारोप झाला. लो. आण्णा भाऊ साठे १०४ व्या जयंती निमित्ताने राबविण्यात आलेले विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समिती सन २०२४ चे जयंती अध्यक्ष सागर लोखंडे, उपाध्यक्ष धिरज दिवटे, कार्याध्यक्ष सागर सोनवणे, खजिनदार सागर सु. लोखंडे, सदस्य साहिल खंडाळे, विनायक मोरे, सुरेश तुपसौंदर्य, सोमनाथ आगलावे, संजय मोरे, अमित मोरे, उपेश तुपसौंदर्य, रवि सुशांत वाद्य फ्रार मोरे /आदिंनी जयंती यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले, अण्णा भाऊ साठे पुर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालक आबासाहेब वाघमारे यांनी समारोप प्रसंगी अण्णा भाऊ साठे यांचे जयंतीचे औचित्य साधून मा. सुप्रिम कोर्टाने अ, ब, क, ड वर्गीकरणाला ६ विरुध्द १ अशी मान्यता देवून मातंग समाजाला एक आगळी वेगळी भेट दिल्याचा आनंद उपस्थित सर्व समाज बांधवांबरोबर जल्लोषात साजरा केला. तर शेवेटी सर्वांचे आभार विनायक मोरे यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष