दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता ०९ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील दोरगे वाडी येथील नवीन मुठा उजवा कालवा पुलाच्या कठाड्याला लोखंडी पाईप नागरी संरक्षणार्थ अनेक वर्षापासून बसविण्यात आले आहेत. मात्र. नवीन मुठा उजवा कालवा पुलाच्या कठाड्या वरील लोखंडी पाईप कधीही नागरिकांसह खाली पाण्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कुदळे वस्ती येथील नवीन मुठा उजवा कालवा पुलावरून जड वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हा पुल कधी कोसळेल याचा भरवसा नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यवत पाटबंधारे विभाग मात्र बघ्याच्या भूमिकेत दिसत आहेत कुदळे वस्ती वरील पूल कोसळल्यावर पाटबंधारे विभाग लक्ष देणार का ? असा स्थानिक शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दोरगे वाडी येथील अरुंद पुला वरून शालेय विद्यार्थी,जेष्ठ नागरिक, व महिला वर्गाची मोठ्या संख्येने वर्दळ असते. कॅनॉलच्या पुला वरून जात असताना भिती वाटत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. दोरगे वाडी येथील नवीन मुठा उजवा कालवा पुलाचे बांधकाम तत्काळ सुरू करण्यात यावे. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने यवत पाटबंधारे विभाग कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. यवत येथील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदअधिकारी व नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. युवा नेते सचिन प्रभाकर दोरगे, दिलीप रामचंद्र दोरगे. पोपट बबनराव दोरगे. शुभम नागेश माळवे. संतोष किसन बडेकर. सनीम महेताब सय्यद. दत्तात्रय डाडर. अनिल गायकवाड. बालाजी घोडके. यांनी यवत पाटबंधारे उपविभाग सहाय्यक अभियंता श्रेणी १ मा सचिन पवार यांना.दि ०९ ऑगस्ट २०२४ रोजी सदर ठिकाणी अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच निवेदनाद्वारे कळविण्याची दस्ती घेतली असून. यवत दोरगे वाडी येथील कॅनोल वरील पुलाचे बांधकाम तत्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. दोरगे वाडी येथील नवीन मुठा उजवा कालवा पुलाचे बांधकाम होण्यापूर्वी या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता यवत पाटबंधारे शाखा अभियंता यांनी वेळेत दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली असुन. निवेदनाद्वारे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यवत गाव ते दोरगेवाडी रस्त्यावर कॅनोलच्या पूला वरील रस्त्याची धोकादायक परिस्थिती झाली असल्याने मोटर सायकल वरून अनेक नागरिक कोलमडून पडले आहेत तसेच शालेय विद्यार्थी मुला मुलींना व नागरिकांना जाणे येणे करीता हा पुल जवळचा एकमेव रस्ता असल्याने या ठिकाणी नागरिकांची सतत वर्दळ असते. यवत ते भुलेश्वर माळशिरस जेजुरी सासवड पुरंदर तालुक्यातील नागरिकांना पुणे सोलापूर महामार्गावर येण्यासाठी अधिक सोईस्कर ठरत आहे. मात्र यवत येथील कॅनोल वरील अरुंद पूल. गेली ४० वर्षा पासून जैसे थे परिस्थिती दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी या अरुंद पुलाचे रुंदीकरण करण्या बाबत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. मात्र यवत पाटबंधारे विभाग या कॅनोल पुला बाबत गांभीर्याने पाहताना दिसत नाही. या अरुंद पुलावरुन अनेक वर्षा पासून शालेय विद्यार्थी मुलं व नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. सध्या कॅनोल वरील लोखंडी पाईप सुरक्षित दिसत नाही. झोका दिल्या प्रमाणे लोखंडी पाईप ची अवस्था झाली असुन खुळखुळ्या प्रमाणे लिचेपिचे व धोकादायक झाले आहेत. या अरुंद पुलावरून मोटर सायकल चालक व विद्यार्थी प्रवास दरम्यान. दुर्दैवी दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यवत पाटबंधारे विभाग सदर दुर्दैवी दुर्घटनेची वाट पाहत आहे की काय ? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.
कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांचे पत्र क्र. खपावि/प्रशा-२/ /४०९९/२०२४. दि.१३/०६/२०२४उपरोक्त विषयांकित प्रकरणी मा. आमदार अॅड. राहुल कुल. वि.स.स दौंड तसेच स्थानिक नागरीक यांचे दोरगेवाडी येथे नवीन पुल होणेवायतच्या मागणीच्या अनुषंगाने प्रदेश कार्यालयाने संदभर्भीय पत्र क्र. २ अन्वये नवीन मुठा उजवा कालवा सा. क्र. ६७/२२० दोरगेवाडी येथे नवीन पुल बांधण्यास मान्यता दिली आहे.सदरील पुलास मान्यता मिळालेनंतर संदभर्भीय पत्र क्र. ३ अन्वये कार्यकारी अभियंता, प्रकल्प संकल्पचित्र कालवे विभाग क्र. २. पुणे कार्यालयाकडुन सदरील पुलाचे संकल्पन प्राप्त झाले आहे. तदनंतर सन २०२२-२३. सन २०२३-२४ च्या विगरसिंचन प्रापणसुचीमध्ये सदरील पुलाचे वांधकाम करण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु त्यास निधी अभावी मान्यता अप्राप्त आहे.सदरील कामाचा तपशील खालील प्रमाणे आहे. अ.क्र.कामाचे नाव अंदाजित किंमत (लक्ष) शेरा १. नवीन मुठा उजवा कालवा कि.मी. ६७/२२० दोरगेवाडी येथील ग्राम रस्ता पुल बांधणे (१०९.००)मा. मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे कार्यालयाचे पत्र जा.क्र.मुअ (जस) / काअ-२/उअ-३/प्रशा-६/नमूउका/ दोरगेवरती पुल/५०२९/२०२१ दि.२८/१०/२०२१ अन्वये पुलाच्या बांधकामास मंजुरी प्राप्नक्षेत्रीय परिस्थितीनुसार सदरील पुल बांधणे अत्यावश्यक असल्याने तसेच सन २०१५ पासुन स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांचे वारंवार होणा-या मागण्यांनुसार सदरील पुलाचेबांधकाम करणे अनिवार्य आहे. उपरोक्त कामाची निकड विचारात घेता सदर कामाला सन २०२४-२५च्या बिगर सिंचन प्रापणसुची अंतर्गत सदर काम करण्यासाठी निविदा कार्यवाही सुरु करणेस महामंडळ कार्यालयाची मान्यता आवश्यक असल्याचे कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांनी संदर्भीय पत्र क्र. ६ अन्वये कळविले आहे.
असे पत्रच यवत पाटबंधारे विभाग शाखा अभियंता सचिन पवार यांनी स्थानिक नागरिकांच्या हाती सोपवले. या प्रसंगी बोलताना दोरगे वाडी येथील नवीन मुठा उजवा कालवा पुलाचे बांधकाम होण्यापूर्वी या ठिकाणी दुर्दैवी अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने आपण योग्य ती दखल घ्यावी. गेली अनेक वर्षापासून यवत दोरगे वाडी येथील स्थानिक नागरिक नवीन पूल होण्याची वाट पाहत आहे. मात्र अद्यापही सदर अरुंद पुलाचे बांधकामा बाबत आश्वासने देण्यात आली आहेत. स्थानिक नागरिकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. त्यामुळे विश्वास वाटत नाही. अशी प्रतिक्रिया यवत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.