देलवडीचा खंडोबा भुलेश्वर महादेवाच्या भेटीला. परतीचा विसावा रावबाची वाडी येथे जोरदार स्वागत. श्रीपतीराव दोरगे यांनी. जपली सत्तर वर्षाची परंपरा.

By : Polticalface Team ,13-08-2024

देलवडीचा खंडोबा भुलेश्वर महादेवाच्या भेटीला. परतीचा विसावा रावबाची वाडी येथे जोरदार स्वागत. श्रीपतीराव दोरगे यांनी. जपली सत्तर वर्षाची परंपरा. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १२ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे देलवडी ता दौंड जिल्हा पुणे येथील कुलदैवत श्री खंडोबाची पालखी सोहळा. पारंपरिक ढोल ताशा संबळ हलगी वाद्यांच्या गजरात देलवडी वांजरेवाडी पंचक्रोशीतील भाविक भक्त. भुलेश्वर या ठिकाणी दि १२ ऑगस्ट रोजी आगमन झाले होते. दौंड - पुरंदर सीमेवर असलेले श्री भुलेश्वर देवस्थान या ठिकाणी देलवडी चा खंडोबा स्नान करण्यासाठी. १० ते १२ कि लो मिटर पायी चालत भुलेश्वर या ठिकाणी येत असतात. ही धार्मिक परंपरा गेली सत्तर वर्षापासून देलवडी वांजरेवाडी येथील ग्रामस्थांनी कायम राखली आहे. भुलेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन यवत येथील रावबाची वाडी श्रीपतीराव दोरगे यांच्या निवासस्थानी परतीच्या प्रवास दरम्यान दुपारच्या वेळी विसावा घेतला जातो. पुजारी बबनराव शिर्के महाराज यांनी दिली. या बाबत अधिक माहिती अशी की सत्तर वर्षांपूर्वी या परिसरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती देवाची आंघोळीसाठी खंडेरायाची पालखी घेऊन भुलेश्वर (मंगळ गड) या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्या मध्ये खंडोबा देवाची आंघोळीचा धार्मिक कार्यक्रम करून. भुलेश्वर महादेवाला सर्व भाविक भक्तांनी साकडे घातले परतीच्या वाटेवर निघताच मेघराजाचे जोरदार आगमन झाले पाऊसाने जोरदार हजेरी लावली सर्व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले केव्हापासून ही परंपरा कायम जपली जात असल्याचे बबनराव शिर्के महाराज यांनी सांगितले.भुलेश्वर मंगळ गडा वरून पाय उतार होऊन गडाच्या पायथ्याशी रावबाची वाडी येथील श्रीपतीराव दोरगे यांच्या निवासस्थानी खंडोबा देवाची पालखी विसावा घेण्यासाठी काही वेळ तत्पूर्वी थांबले होते. हि परंपरा आजही कायम आहे. या प्रसंगी यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष शंकराव दोरगे पाटील. कैलास आबा दोरगे. यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथा आबा दोरगे पाटील. मुरलीधर दोरगे. दत्तात्रय दोरगे. अरविंद दोरगे. कोंडीबा दोरगे. या ग्रामस्थांनी खंडोबा देवाच्या पालखीवर पुष्प फुलांची उधळण करत. जोरदार स्वागत करण्यात आले. श्रीपतीराव दोरगे यांनी सत्तर वर्षाची ही परंपरा कायम जपली आहे. या वेळी यवत येथील समस्त ग्रामस्थ यांच्या हस्ते खंडोबाची आरती करण्यात आले. पालखी सोहळ्यातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी श्रीपतराव दोरगे यांनी पालखी सोहळ्यातील उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच शिवसेना पक्षाचे प्रचारक व समर्थक मोहनराव पवार यांना श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी खंडुभाऊ दोरगे. माणिकराव दोरगे. दिपक दोरगे. काळुराम शेंडगे बालाजी घोडके यवत येथील रावबाची वाडी पंचक्रोशीतील महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच देलवडी येथील खंडोबा देवाचे मानकरी व पुजारी बबनराव शिर्के महाराज. यांनी हि परंपरा कायम स्वरूपी जपली असल्याने यवत येथील श्रीपतीराव दोरगे तसेच समस्त ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी दादा वाघोले महाराज. सुयोज वांजरे. विनायक भागवत. देलवडी व वांजरे वाडी येथील आदी समस्त ग्रामस्थ युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष