जालना जिल्हा परिषद ग्राम विभाग यांच्या वतीने, यवत ग्रामविकास अधिकारी श्री बालाजी बाबुराव सरवदे.यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित.

By : Polticalface Team ,14-08-2024

जालना जिल्हा परिषद ग्राम विभाग यांच्या वतीने, यवत ग्रामविकास अधिकारी श्री बालाजी बाबुराव सरवदे.यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १४ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामविकास अधिकारी श्री बालाजी बाबुराव सरवदे यांना जालना जिल्हा परिषद, आदर्श ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी पुरस्कार 2017-2018 वितरण समारंभ 2024 अंतर्गत. (आदर्श ग्रामसेवक) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा वितरण सोहळा कै.यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना या ठिकाणी संपन्न झाला. या प्रसंगी जालना जिल्हा परिषद विभाग अधिकारी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती त्यामध्ये मा.श्रीकृष्ण पांचाळ साहेब जिल्हाधिकारी,जालना मा.वर्षा मिना मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी,जालना मा. अजयकुमार बंनसल साहेब पोलिस अधीक्षक,जालना मा.अंकुश चव्हाण साहेब उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत,जि प जालना. मा.संतोष खांडेकर साहेब आयुक्त महापालिका जालना. मा.संजिव निकम साहेब राजाध्यक्ष ग्रामसेवक युनियन, महाराष्ट्र. या मान्यवरांच्या हस्ते. दिनांक 13 ऑगस्ट-2024 रोजी मान्यवरांच्या हस्ते श्री बालाजी बाबुराव सर्व दे यांना (आदर्श ग्रामसेवक पुरस्कार) देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी जालना जिल्हा परिषद. शासकीय अधिकारी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तसेच विभागीय सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱी प्रामुख्याने उपस्थित होते. संबंधित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2024 हा सन 2017-18 साठी आसुन त्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, धावडा ता भोकरदन जि जालना येथील ग्रामपंचायत अंतर्गत श्री बालाजी सरवदे यांनी कर्तव्याचे पालन करून. 100 टक्के ग्रामविकासाच्या माध्यमातून शौचालय बांधकाम पूर्ण केले. तसेच राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करून रमाई घरकुल योजने अंतर्गत सर्व बांधकामे हे दर्जेदार व शासकीय कालावधीत व कर्तव्यात कसूर न करता पूर्ण केले आहेत. वरिष्ठ कार्यालय अधिकारी यांच्या सर्व सुचनाचे काटेकोर पणे पालन करुन दिलेल्या जबाबदारीने कामगिरी बजावली आहे. स्वच्छ भारत मिशन सर्व कामे पुर्ण केले. गावातील दिव्यांग नागरिकांना दिलासा देऊन शासनाने जाहीर केलेल्या 5 टक्के अनुदान गावातील दिव्यांग नागरिकांना खर्च केला. महिला बालकल्याण विभाग 10 टक्के अनुदान. शंभर टक्के दिला. समाज कल्याण विभाग अंतर्गत 15 टक्के रक्कम मागासवर्गीय विकास कामांसाठी वेळेत खर्च करून पुर्ण केला. ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी गावातील महिला बचत गट तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कालकीर्दीमध्ये गावातील 90 टक्के कर वसुली केली. प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, रमाई आवास घरकुल योजना, शबरी आवास घरकुल योजना या शासकीय योजनांची अंमलबजावणी करून संबंधित लाभार्थी यांना एकत्रित घेऊन अडी अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी कॅम्प घेऊन संबंधित लाभार्थींना मार्गदर्शन केल्याने अनेक गोरगरीब लाभार्थींचे घरकुल पुर्ण झाले. ग्रामपंचायत कार्यालय, धावडा ता.भोकरदन जि जालना येथील. गावला 12 महिने शुद्ध पाणी पुरवठा केला. गावात नेसमी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जोडुन ठेवले. तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती करुन काम पूर्ण केले. धावडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व वैयक्तिक विविध योजना. जनते पर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामविकास अधिकारी श्री बालाजी बाबुराव सरवदे यांनी महत्वपूर्ण प्रयत्न करून नागरिकांना लाभ दिला. mregs चे वैयक्तिक व सार्वजनिक कामे केले. दौंड तालुक्यातील पंचायत समिती दौंड. तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायतीमध्ये श्री बालाजी बाबुराव सरवदे. ग्रामविकास अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कामकाजा बाबत गावातील नागरिकांनमध्ये समाधान व्यक्त केले जात असुन ईतर सर्व योजना राबविण्यात गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. वरील सर्व कामे यवत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथे आहे तो पर्यंत. विशेष लक्ष देऊन. पुर्ण करुन घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष