दहिटणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इतर कामांसाठी रविंद्र ज्ञानेश्वर लगड. यांनी दिली देणगी. विद्यार्थी मुला मुलींना खाऊ वाटप.
By : Polticalface Team ,18-08-2024
दहिटणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इतर कामांसाठी रविंद्र ज्ञानेश्वर लगड. यांनी दिली देणगी. विद्यार्थी मुला मुलींना खाऊ वाटप.
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १८ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे
दहिटणे ता दौंड जिल्हा पुणे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट भारताचा ७८ व्या स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दहिटणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री रविंद्र ज्ञानेश्वर लगड यांच्या कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सुशोभिकरण करण्यासाठी रविंद्र ज्ञानेश्वर लगड यांच्या वतीने शाळा
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पेटकर. दिपक मेटे व इतर सदस्य यांच्याकडे देणगी देण्यात आली. तसेच पुढील काही दिवसांत दहिटणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मुला मुलींना बसण्यासाठी बेंच टेबल व प्राणांगणात लाल माती भरुन देण्या बाबत लगड यांनी आश्वासन दिले आहे.
या वेळी दहिटणे ग्रामपंचायतीचे मा.सरपंच दादासाहेब कोळपे ज्येष्ठ नेते भीमा पाटस कारखान्याचे संचालक बाळासाहेब पिलाणे सर. सोसायटीचे चेअरमन रघुनाथ मेटे. गाव पोलीस पाटील नवनाथ धुमाळ अजय शेलार. तसेच मुख्याध्यापक खेडेकर मॅडम शिक्षक धेंडे सर शिंदे सर पिसाळ सर लवांडे सर खेडेकर थोरात मॅडम. थोरात सर. गावातील ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पेटकर चेतन ढमढेरे सम्राट अशोक सेनाचे अध्यक्ष विनोद जी चव्हाण महिला अध्यक्ष आशाताई चौधरी रसाळ गुरुजी धेंडे सर सर्व शिक्षक इतर मान्यवर च्या उपस्थितीत १५ ऑगस्ट ७८ वा स्वातंत्र दिन उत्साहात आनंदाने साजरा करण्यात आला.
दहिटणे पंचक्रोशीतील सर्व नागरिक तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मुला मुलींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :